मिशन मंगलच्या यशानंतर विद्या बालन तिच्या आगामी चित्रपटासाठी तयार झाली आहे. विद्या बालन लवकरच एका नव्या बायोपिकमधून प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये ती गणितज्ञ्ज शकुंतला देवी साकारणार आहे. शकुंतला देवी यांना ह्युमन कंप्युटर या नावाने ओळखलं जायचं. त्यामुळे शकुंतला देवी या विद्या बालनच्या आगामी चित्रपटाबद्दल चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली आहे. कारण शकुंतला देवी या लहानपणापासून मोठमोठ्या गणितांची आकडेवारी सहज करण्यात पटाईत होत्या. लहानवयात त्या त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांची गणिते सोडवत असत. म्हणूनच त्यांना ह्युमन कंप्युटर अशी ओळख मिळाली होती. शकुंतला देवी यांच्याकडील या दैवी देणगीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलं होतं.
शकुंतला देवीसाठी विद्या बालनचा मेकओव्हर
शकुंतला देवी या चित्रपटाचं पोस्टर नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे.शकुंतला देवी चित्रपट 2020 साली प्रदर्शित होणार आहे. विद्या बालन या चित्रपटात शकुंतला देवी यांची प्रमुख भूमिका करत आहे. विद्या बालन नेहमीच निरनिराळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असते.यासाठी अभिनयासोबतच तिच्या पेहराव आणि लुक आणि हावभाव, भाषाशैलीत योग्य तो बदल ती करते. या चित्रपटाच्या पोस्टरमधील विद्या बालनचा लुक नेहमीपेक्षा फारच वेगळा आहे. या लुकमधून ती साकारत असलेल्या शकुंतला देवी यांची भूमिका साकारणं तिला नक्कीच सोयीचं जाणार आहे. विद्या बालनचा हा बॉय कट लुक या चित्रपटाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढवणारा आहे. नेहमीचाच साडीचा लुक असला तरी यामधून विद्या बालनचं एक आणखी वेगळं रूप तिच्या चाहत्यांना पाहता येणार आहे. विद्या बालनने आतापर्यंत भुलभुलैया, परिनिता, सलाम-ए- इश्क, गुरू, पा, कहानी, नो वन किल्ड जेसिका, किस्मत कनेक्शन, इश्किया, घनचक्कर, डर्टी, हमारी अधूरी कहानी, तुम्हारी प्यारी सुलू आणि बेगम जान या चित्रपटातून काम केलं आहे. या सर्वच चित्रपटातून विद्याने विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.
विद्या बालन आहे एकदम बिनधास्त
विद्या बालन नेहमीच आपलं मत बिनधास्त मांडते. बॉलीवूडमध्ये तिची अशीच ओळख आहे. एक वेळ अशीही आली होती की, विद्या बालनच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल अनेक चर्चा घडल्या होत्या. इतकंच नाही तर ‘किस्मत कनेक्शन’ आणि ‘हे बेबी’ या चित्रपटाच्या दरम्यान तिला अनेक ट्रोल्सना सामोरं जावं लागलं होतं. पण तिने त्यावेळीही कशाचाही विचार न करता आपल्याला ट्रोल करणाऱ्या लोकांचं तोंड बंद केलं होतं. या सगळ्याचा विचार न करता अभिनयावर लक्ष केंद्रीत करून विद्याने बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निश्चित केलं. इतकंच नाही तर विद्या बालनने ‘कहानी’, ‘डर्टी पिक्चर’ आणि ‘तुम्हारी सुलू’ यासारखे चित्रपट केवळ एकटीच्या खांद्यावर पेलून यशस्वी करून दाखवले. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांच्या मनावर विद्याने राज्य केलं. आता तिच्या आगामी शकुंतला देवीमधून तिच्या अभिनयाचा आणखी एक पैलू जगासमोर नक्कीच येणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा
POPxo सादर करत आहे #POPxoEverydayBeauty – POPxo Shop’s चं नवं कलेक्शन… त्वचा, केसांसाठी असलेली ही सौंदर्यप्रसाधने अतिशय परिणामकारक असून वापरण्यासाठी अगदी सोपी आहेत शिवाय या सर्व उत्पादनांवर तुम्हाला 25% ची घवघवीत सुट देखील मिळेल. तुम्ही ही उत्पादने POPxo.com/beautyshop खरेदी करू शकता. तेव्हा POPxo Shop ची ही सौदर्य उत्पादने खरेदी करा आणि तुमचं सौंदर्य आणखी खुलवा.
अधिक वाचा
Nach baliye 9 च्या सेटवर मनीष पॉलमुळे रवीना झाली नाराज