बॉलीवूड सेलिब्रेटीज नेहमीच काही ना काही कारणांवरून चर्चेत असतात. शिवाय चाहत्यांना त्यांचे आवडते कलाकार कुठे राहतात, कसे जीवन जगतात, त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यात नेहमीच रस असतो. बऱ्याचदा कलाकारांचे चुकीच्या पद्धतीने काढलेले फोटो, वैयक्तिक आयुष्य, अफेअर्स, वादविवाद यामुळे त्यांना सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं. मात्र एवढंच नाही तर बॉलीवूडमधील काही कलाकार त्यांच्या अगदी विचित्र सवयींमुळे देखील ओळखले जातात. यासाठीच आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांच्या अशा काही विचित्र सवयी सांगणार आहोत ज्या ऐकून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.
सलमान खान –
बॉलीवूडचा भाईजान आणि लाखों तरूणींना आजही घायाळ करणाऱ्या सलमान खानला एक अतिशय विचित्र सवय आहे. यश आणि किर्तीच्या शिखरावर असणाऱ्या या सेलिब्रेटीची ही सवय ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. कारण सलमान खानला फक्त नैसर्गिक आणि होममेड साबण वापरायला आवडतात. त्यामुळे मोठ मोठ्या ब्रॅंडची जाहिरात करणारा हा तुमचा आवडता अभिनेता स्वतःसाठी मात्र घरगूती आणि नैसर्गिक पद्धतीने बनवलेले साबण गोळा करत असतो.
करिना कपूर –
बॉलीवूडची बेबो आणि सैफची सैफिना तिच्या नखरेल अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. करिना आता तिच्या करिअरच्या उच्च शिखरावर पोहचली आहे. शिवाय ती आता पतौडी घराण्याची सून आणि तैमूरची आईदेखील आहे. मात्र असं असूनही करिनाला लहान मुलांप्रमाणे एक विचित्र सवय आहे. करिनाला लहान मुलांप्रमाणे नखे चावण्याची घाणेरडी सवय आहे जिला सोडवण्याचा ती आटोकाट प्रयत्न करत असते.
अमिताभ बच्चन –
बॉलीवूडचे महानायक आणि चाहत्यांचे बिग बी अमिताभ बच्चन आता वयाच्या अशा वळणावर आहेत. जिथे त्यांच्या वयाची माणसं चालण्यासाठीदेखील इतरांवर अवलंबून असतात. मात्र सत्तरी पार केलेल्या या महानायकाचा दरारा बॉलीवूडमध्ये आजही कायम आहे. कारण आजही ते तरूण नायकांना लाजवेल अशा उत्साहात काम करताना दिसतात. मात्र अमिताभ बच्चन यांना एक विचित्र सवय आहे. जेव्हा ते त्यांच्या कुटुंबियांपासून दूर दुसऱ्या देशात जातात अथवा त्यांच्या कुटुंबियांपैकी एखादी व्यक्ती कामानिमित्त परदेशी जाते. तेव्हा ते चक्क दोन घड्याळे वापरतात. ज्यामुळे त्यांना दुसऱ्या देशात चालु असलेली वेळ समजणं सोपे जाते.
शाहरूख खान –
बॉलीवूडचा किंग खानदेखील विचित्र सवयी असण्यात मुळीच पाठी नाही. कारण असं म्हणतात की शाहरूखकडे जवळजवळ हजारो जीन्स आहेत. त्याचप्रमाणे त्याला निरनिराळे व्हिडिओ गेम आणि गेमिंग गॅझेट गोळा करण्याचा छंद आहे. त्यामुळे कामातून वेळ काढून बॉलीवूडचा हा बादशाह त्याचे हे छंद पूर्ण करत असतो.
सनी लिओनी –
सनी लिओनी म्हणजे अनेक तरूणांच्या ह्रदयाची धडधड. तिच्या दिलखेचक अदांचे चाहते जगभरात आहेत. मात्र सनी लिओनीलादेखील एक विचित्र सवय आहे. सनीला सतत तिचे पाय धुण्याची सवय आहे. ज्यामुळे थोड्या थोड्या वेळाने ती तिचे पाय धुत राहते. मात्र या तिच्या सवयीमुळे तिला नेहमीच महत्त्वाच्या कामांसाठी वेळेवर पोहचण्यास उशीर होत असतो.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
अधिक वाचा –
अरबाज खानची गर्लफ्रेंड करणार वकिली
corona virusमुळे चित्रपटांवर होणार परिणाम, थिएटर राहणार 31 मार्चपर्यंत बंद
इन्स्टाग्रामवरुन अरमान मलिकने फोटो केले ‘डिलीट’, फॅन्स चिंतेत