दिवसभर कष्ट केल्यावर माणसाला गरज असते रात्री शांत झोपेची… आरोग्य तज्ञ्ज सांगतात दिवसभरात माणसाला कमीत कमी सहा आणि जास्तीत जास्त आठ तास शांत आणि गाढ झोप मिळायला हवी. पण आजकाल अनेकांना अनिद्रा आणि अपुऱ्या झोपेचा त्रास होताना जाणवतो. आजकालची जीवनशैलीच अशी झाली आहे की रात्री लवकर झोपण्याची सवयच कोणाला राहिलेली नाही. उशीरा पर्यंत काम करायचे आणि झोप लागली नाही तरी मोबाईल, गॅजेट्स, टिव्ही पाहत जागरण करण्याच्या सवय हा या जीवनशैलीचा एक भाग होत चालला आहे. मात्र जर तुम्ही रात्री झोप पूर्ण झाली नाही तर तुमचा त्यानंतचा संपूर्ण दिवस कंटाळवाणा आणि आळसात जातो. झोप पूर्ण झाली नसेल तर कोणत्याच कामात माणसाचे मन लागत नाही. साध्या दैनंदिन गोष्टी करणं त्रासदायक वाटतं. याचाच अर्थ तुमच्या मेंदूला आरामाची गरज असते. जेव्हा तुम्ही नीट झोप घेत नाही तेव्हा तुमच्या मेंदूवर त्याचा परिणाम दिसू लागतो.
जाणून घ्या मोबाईलचे दुष्परिणाम (Mobile Che Dushparinam)
झोपेचा होतो आरोग्यावर परिणाम
जर तुम्ही दररोज पुरेशी झोप घेत असाल तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहते. पण जे लोक वेळेवर झोपत नाहीत त्यांच्या आरोग्य समस्या हळू हळू डोकं वर काढतात. कारण झोपेचा तुमच्या संपूर्ण शरीर आणि आरोग्यावर परिणाम होत असतो. झोप कमी घेणाऱ्या लोकांना उच्च रक्तदाब, मायग्रेन, संक्रमण, अॅसिडिटी असे त्रास लवकर जाणवतात. झोपेमुळे माणसाचे शरीरचक्र सुरळीत सुरू राहतं. यासाठीच निसर्गाने माणसाला झोप आणि जागृती या दोन गोष्टी दिलेल्या आहेत. निसर्गनियमानुसार माणसाने रात्री वेळेवर झोपणं आणि वेळेवर सकाळी उठणं गरजेचं आहे. निसर्गचक्राच्या विरोधात जाणं माणसाच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतं.
जाणून घ्या सकाळी लवकर उठण्याचे फायदे – Sakali Lavkar Uthane Ke Fayde
झोप न घेतल्यास मेंदूवर का होतो परिणाम
दिवसभर कष्टाची कामे केल्यामुळे माणसाच्या शरीराला आरामाची गरज असते. जरी तुम्ही कोणतेही काम केले नाही तरी सतत विचार करून तुमचा मेंदू थकलेला असतो. असं म्हणतात दिवसभरात माणूस नकळत साठ हजार विचार करतो. जर असं असेल तर तुमच्या मेंदूलाही आरामाची गरज असते. मेंदूला आराम फक्त तुम्ही जेव्हा गाढ झोपता तेव्हाच मिळतो. जे लोक पुरेशी झोप घेत नाहीत त्यांच्या मेंदूला योग्य आराम मिळत नाही. त्यामुळे त्यांना सतत आरोग्य समस्या आणि नैराश्याचा त्रास होतो. झोप व्यवस्थित न मिळाल्यामुळे तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. थकल्यामुळे मेंदूचे कार्य नीट होत नाही. गोष्टी लक्षात ठेवणे, समजून घेणे, सारासार विचार करण्याची क्षमता कमी होते. यासाठी माणसाने नियमित सहा ते आठ तास शांत झोपणं गरजेचं आहे.
बायपोलर डिसऑर्डर – एक मानसिक विकार (Bipolar Disorder In Marathi)