ADVERTISEMENT
home / Budget Trips
What is a Staycation

स्टेकेशन म्हणजे काय, कोविडच्या काळात का आहे याची गरज

कोविडच्या काळात सध्या स्टेकेशनचे प्रमाण वाढताना दिसत आहे. स्टेकेशन म्हणजे एक अथवा दोन दिवसांसाठी तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत घरापासून जवळ एखाद्या ठिकाणी राहणे. स्टे म्हणजे राहणे आणि वेकेशन म्हणजे सुट्टी घालवणे या दोन शब्दांपासून स्टेकेशन हा शब्द प्रचलित झाला आहे. स्टेकेशनसाठी तुम्ही कुठेही एक दिवस, एक आठवडा तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत एकत्र राहू शकता. यात महत्त्वाचं असतं घरापासून जवळच कुठेतरी स्टे करणं. कोविडच्या काळात सर्वांना घरात राहून फार कंटाळा आला आहे. पूर्वी कंटाळा आला की आपण मस्त सुट्टी घेत वेकेशन साजरा करत होतो. मात्र कोविडच्या काळात सर्वच बदललं आहे. त्यामुळे फिरण्याची हौस असली तरी काही बंधनांमुळे फिरायला जाणं शक्य नाही. मात्र स्टेकेशनसाठी तुम्हाला शहराबाहेर अथवा भारताबाहेर जाण्याची गरज नाही. शिवाय यासाठी तुम्हाला पासपोर्ट, व्हिसा, फ्लाईट बूक करण्याची गरज नाही. एखाद्या पंचतारांकित हॉटेल मध्ये रूम, रिसॉर्ट अथवा व्हिला बूक करून तुम्ही स्टेकेशन करू शकता.  कोविडच्या काळात पुन्हा एकदा वेकेशनचा आनंद घेण्यासाठी स्टेकेशनचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. ज्यामुळे तुम्ही एक ते दोन दिवसांत मस्त फ्रेश होऊन पुन्हा तुमच्या दैनंदिन जीवनात व्यस्त होऊ शकता. यासाठीच जाणून घ्या स्टेकेशनचे काही महत्त्वाचे फायदे… यासोबत वाचा ट्रॅव्हल कोट्स Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

का करायला हवं स्टेकेशन

स्टेकेशनचे अनेक फायदे आहेत. जोपर्यंत पूर्वीसारखा वेकेशनचा आनंद घेता येत नाही तोपर्यंत तरी तुम्ही नक्कीच स्टेकेशन करून तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता.

सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं 

तुम्ही डोमेस्टिक टॅव्हल करा अथवा इंटरनॅशन ट्रॅव्हल तुम्हाला विमानाचं बूकिंग, ट्रॅव्हल पॅकेज, शॉपिंग, पासपोर्ट, व्हिसा, करंसी चेंजसाठी चांगलेच पैसे मोजावे लागतात. पण मागील दोन वर्षांपासून कोविड महामारीमुळे अनेकांना आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे वेकेशनचा खर्च सर्वांना परवडणारा नक्कीच नाही. मात्र स्टेकेशनवर तुम्हाला एवढा खर्च करावा लागत नाही. यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवस राहण्याचा आणि जेवणाचा खर्च करावा लागतो. पण जर तुम्ही कुटुंबासोबत आणि मित्रमंडळींसोबत स्टेकेशनवर गेला तर हा खर्च तुमच्या खिशाला तर परवडतोच शिवाय त्याचा खऱ्या अर्थाने आनंदही घेता येतो. 

पिकनिकसाठी बेस्ट आहेत मुंबईतील ही ’25’ ठिकाणं (Picnic Places In Mumbai In Marathi)

ADVERTISEMENT

सुरक्षेच्या दृष्टीने आहे महत्त्वाचे

कोविडच्या काळात स्टेकेशनवर जाणं सुरक्षित आहे कारण या काळात भारतात आणि भारताबाहेर फिरायला जाणं ही सोपी गोष्ट नक्कीच नाही. कोविड-19 ने संपूर्ण देशभराला व्यापलं असल्यामुळे कुठे जाणं सुरक्षित आणि कुठे जाणं सुरक्षित नाही हे कोणीच सांगू शकत नाही. मात्र इतर शहर, राष्ट्र अथवा परदेशात जाण्यापेक्षा आपल्याच शहरात असं स्टेकेशन करणं त्या मानाने नक्कीच सुरक्षेचं आणि सोयीचं ठरू शकतं. कारण यामुळे तुम्ही स्वतःचे आणि इतरांचे आरोग्य नक्कीच धोक्यात टाकणार नाही. 

पंचतारांकित हॉटेलमध्ये स्टेकेशनवर असताना ‘या’ गोष्टी करायलाच हव्या

What is a Staycation

लहान मुलं आणि वयस्कर लोकांसोबत प्रवास

जर तुमच्या घरी लहान मुलं असतील अथवा वयस्कर आईवडील असतील तर त्यांच्यासोबत मोठा प्रवास करणं शक्य होत नाही. मात्र अशा लोकांनी यासाठी घरातच अडकून राहण्याची गरज नाही. थोडा विरंगुळा आणि दैनंदिन जीवनातून ब्रेक घेण्यासाठी ते स्टेकेशनचा आनंद घेऊ शकतात. घरापासून जवळ एखाद्या चांगल्या ठिकाणी तुम्ही एक ते दोन दिवस असा स्टे करून तुमच्या कुटुंबासोबत काही क्षण आनंदाचे घालवू शकता. यासाठी पाहा  नाशिक पर्यटन स्थळे (Nashik Tourist Places In Marathi)

तुमचे पाळीव प्राणी तुम्ही सोबत नेऊ शकता

वेकेशनवर जायचं असेल तर तुमच्या पाळीव प्राण्यांना तुम्हाला नातेवाईक अथवा केअर सेंटरमध्ये ठेवावं लागतं. घरातील पाळीव प्राणी म्हणजे तुमच्या कुटुंबाचा एक भागच असतात. मात्र त्यांच्यासोबत तुम्ही विमानातून प्रवास करू शकत नाही अथवा परदेशी जाऊ शकत नाही. पण तुम्ही तुमच्या लाडक्या पेटला घेऊन एखाद्या डोंगराळ भागात अथवा रिसॉर्टमध्ये स्टेकेशन नक्कीच करू शकता. पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं (Places To Visit In Pune In Marathi)

ADVERTISEMENT

स्थानिक अर्थव्यवस्थेला पाठबळ

कोविड महामारीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला पाठबळ देण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपल्या शहराच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी अशा स्टेकेशनवर जाणं यामुळे नक्कीच देशासाठी फायद्याचं ठरेल. कारण सध्या पर्यटनाचा व्यवसाय ठप्प झाला आहे. आपल्या देशातील पर्यटन उद्योग आणि इतर व्यवसायांना मदत करण्यासाठी शहरातील एखाद्या चांगल्या हॉटेल, कॅफे, रेसॉर्ट, लोकल मार्केटला भेट द्या. ज्यामुळे तुमच्या शहरातील अर्थव्यवस्थेला नक्कीच चालना मिळेल. 

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे (Historical Tourist Places In Maharashtra In Marathi)

कुटुबांसोबत वेळ घालवण्याची चांगली संधी

तुम्ही यापूर्वी वर्षातून एकदा अथवा दोनदा खास कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेकेशनवर जात होता. मात्र कोविड महामारीमुळे सर्वांना आता ते शक्य होईल असं नाही. शिवाय सतत घरात राहून कुटुंबामध्ये वाद आणि दुरावा होताना दिसून येत आहे. नातेसंबध पुन्हा दृढ करण्यासाठी कुटुंबासोबत काही क्षण आनंदाने घालवणं गरजेचं आहे. यासाठीच या काळात स्टेकेशन सर्वांसाठी मस्ट आहे. 

21 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT