ADVERTISEMENT
home / फॅशन
What is fast fashion in marathi

फास्ट फॅशन म्हणजे काय, जाणून घ्या फायदे आणि दुष्परिणाम

फॅशनेबल दिसणं, स्टायलिश राहणं कोणाला नाही आवडणार. शिवाय सध्याचा काळच फॅशनचा आहे त्यामुळे स्टायलिश दिसण्यासाठी आवड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच दिसून येते. फॅशनच्या जमान्यात अपडेट राहण्यासाठी नवनवे फॅशनचे ट्रेंड आणि फंडे आपल्याला माहीत असायला हवे. फॅशनचे मुख्यतः दोन प्रकार मानले जातात. एक फास्ट फॅशन (Fast Fashion) आणि दुसरा आहे स्लो फॅशन (Slow Fashion) फास्ट आणि स्लो फॅशनमध्ये खूप फरक असला तरी सध्या फास्ट फॅशनची चलती आहे. ट्रेंडनुसार वागायचं म्हणजे नकळत तुम्ही या फास्ट फॅशनचा भाग बनता, पण या फास्ट फॅशनचे काही दुष्परिणामही माणसाला भविष्यात भोगावे लागू शकतात. यासाठी याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

काय आहे फास्ट फॅशन

फॅशन पूर्वी होती, आज आहे आणि भविष्यातही असेलच. पण पूर्वीच्या काळी ऋतूमानानुसार फॅशन बदलत असे. ऋतू बदलला की त्यानुसार कपडे तयार आणि डिझाइन केले जात असत. ज्याला स्लो फॅशन असं म्हटलं जात असे. ही फॅशन फक्त ऋतूनुसार बदलत होती. म्हणजे पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्यातील वातावरणानुसार तयार केले गेलेले स्टायलिश कपडे… पण आता फॅशन इडस्ट्री वेगाने धावत आहे. त्यामुळे फास्ट फॅशनला पुढाकार दिला जात आहे. सहाजिकच वेगाने फॅशनदेखील बदलत आहे, जलद गतीने कपडे तयार केले जातात, विकलेही जातात, एवढंच नाही तर ते त्याच गतीने कालबाह्यही होतात. याच गोष्टीमुळे आजकाल फॅशन इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर नफा मिळवला जात आहे. या फॅशनसाठी दर आठवड्याला नव्या ट्रेंडचे कपडे बाजारात आणले जातात.  जितक्या गतीने कपडे बाजारात येतात तितक्याच गतीने ते आऊट ऑफ ट्रेंडही होतात. ज्याला फास्ट फॅशन असं म्हटलं जातं. 

काय आहेत याचे फायदे आणि दुष्परिणाम 

फास्ट फॅशन जलद गतीने बदलत असल्यामुळे कंपनी कमी पैशांमध्ये फॅशनेबल कपडे लोकांसाठी उपलब्ध करून देते. स्वस्त असल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर कपड्यांची खरेदी करतात. पूर्वी फक्त ऋतूमानानुसार अथवा सणसमारंभांना खरेदी कपड्यांची खरेदी केली जात असे. मात्र आता दररोज लोक कपडे खरेदी करत असतात. कोणतंही कारण नसताना कपडे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. कारण निरनिराळ्या स्टाईलचे आणि साईजचे कपडे आजकाल सहज उपलब्ध असतात.  लोकांसाठी यामुळे फॅशनचे नवे पर्याय उघड होत असले, तरी यामुळे मोठ्या प्रमाणावर कपड्यांची निर्मिती होत आहे ही गोष्ट भविष्यासाठी घातक ठरू शकते. कारण या कपड्यांचे आयुष्य फार काळाचे नसल्यामुळे कपड्यांसाठी वापरण्यात येणारे फॅब्रिक हलक्या दर्जाचे असते. आऊट ऑफ ट्रेंड झाल्यावर कपडे फेकून दिले जातात. ज्याचा मोठा फटका पर्यावरणावर पडू शकतो. फास्ट फॅशनमुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. त्यामुळे या फास्ट फॅशनमुळे भविष्यात मोठा धोका मानवजातीसाठी निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना केली नाही तर ही फास्ट फॅशन मानवासाठी घात

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
01 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT