पुरुषांची छाती महिलांप्रमाणे ? हे असे वाचूनच तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असे कसे होऊ शकते. पण खूप पुरुषांची छाती ही महिलांच्याही तुलनेत मोठी असते. त्यांचा आकार हा छातीसारखा नसतो. तर तो स्तनांसारखा असतो. अशी शरीरयष्टी असली की, अशा मुलांचे किंवा पुरुषांचे चारचौघात हसू उडवले जाते. पण ही अशी शरीरयष्टी कशाचे लक्षण आहे हे तुुम्हाला माहीत आहे का? लहान मुलांमध्ये जर अशाप्रकारची लक्षणं जाणवत असतील तर त्यांना एक मेडिकल कंडिशन असण्याची शक्यता आहे ज्याला गायनेकोमास्टिया ( Gynecomastia) असे म्हणतात. हे लक्षण म्हणजे नेमकं काय आणि यासाठी काळजी कशी घ्यायला हवी ते जाणून घेऊया.
दुधात तूप घालून प्या, मिळतील फायदेच फायदे
गायनेकोमास्टिया ( Gynecomastia) म्हणजे काय?
स्त्री आणि पुरुष यांच्या शरीरातील हार्मोन्समुळे त्यांच्या शरीरात असलेले बदल हे ठळकपणे जाणवत असतात. पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये असलेल्या हार्मोन्सचे प्रमाण वाढू लागले की, मग त्यांच्या शरीरात काही बदल दिसू लागतात. पुरुषाच्या शरीरात मेल हार्मोन्स अर्थात टेस्टोस्टेरॉन (Testosterone) असते. शरीरात जर हे घटक कमी होऊन महिलांमध्ये असणारे औईस्ट्रोजन ( Oestrogen) हे वाढल्यामुळे पुरुषांच्या शरीरात काही बदल होऊ लागतात. हे बदल होऊ लागतात. पुरुषांची छाती ही महिलांप्रमाणे दिसू लागते. पुरुषांची छातीला थोडी सूज आलेली दिसू लागते. अशी छातीही काही जणांना त्रास देऊ शकते.
त्वचेसाठी बेस्ट आहेत लोशन बार, असे बनवा घरच्या घरी
तुम्हाला आहे का गायनेकोमास्टिया
आता तुम्हाला हा त्रास आहे की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला आधी निरिक्षण करावे लागेल .आरशासमोर उघडे उभे राहा. तुमच्या छातीचा आकार मोठा झाला असेल. तुमचे निप्पल्स वेगळे दिसत असतील. शिवाय इतरांच्या तुलनेत तुमची छाती थोडीशी जड वाटत असेल तर तुम्हाला गायनेकोमास्टिया असण्याची शक्यता आहे. याशिवाय जर तुमच्या छातीत दुखत असेल तरी देखील तुम्हाला हा त्रास असू शकतो.
वजन कमी करण्यासाठी प्या कडीपत्त्याचा रस, जाणून घ्या फायदे
अशी घ्या काळजी
जर तुम्हाला गायनेकोमास्टिया आहे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा. त्यांनी सांगितलेले रिपोर्ट्स केल्यानंतर तुम्हाला हा त्रास आहे की नाही याची माहिती मिळू शकेल. जर तुम्हाला हा त्रास झाला हे कळलं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने काळजी घ्या.
- गायनेकोमास्टिया या आजाराला घाबरण्याचे तसे काही कारण नाही. कारण यामध्ये काही औषधोपचार केले जातात. त्यामुळे छातीची सूज कमी होण्यास मदत मिळते.
- वजन वाढीमुळे देखील हा त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे खूप वेळा वजन कमी करण्याचा सल्ला देखील दिला जातो.
- खूप रेअर केसमध्ये सर्जरी हा पर्याय सुचवला जातो. या सर्जरीनंतर तुम्हाला काही खास वेस्ट कोट दिले जातात. ज्यामुळे
- छातीचा आकार हा ओघळत नाही. तो पूर्ववत होण्यात मदत मिळते.
शरीरातील हार्मोन्स नियंत्रित करणाऱ्यासाठीही काही खास औषधे दिली जातात.
आता तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही त्याची योग्यवेळी खातरजमा करुन घ्या म्हणजे तुम्हाला त्याचा त्रास मुळीच होणार नाही.