ADVERTISEMENT
home / Care
वेट डॅन्ड्रफ म्हणजे काय आणि त्यावर कसे करावे उपाय

वेट डॅन्ड्रफ म्हणजे काय आणि त्यावर कसे करावे उपाय

केसात कोंडा होणं ही समस्या प्रत्येकाने कधी कधी ना कधी तरी नक्कीच अनुभवली असेल. कोंडा झाल्यावर सर्वात जास्त चिडचीड होते की डोक्यात येणाऱ्या खाजेमुळे. आजकाल सगळीकडेच कोंडा कमी करण्यासाठी अनेक नैसर्गिक उपाय शेअर केले जात असतात. मात्र बऱ्याचदा हे उपाय करूनही काहीच उपयोग होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला वेट डॅन्ड्रफ असून तुम्ही ड्राय डॅन्ड्रफचे उपचार करत असता. जर हे वाचून तुम्ही आणखीनच संभ्रमात पडला असाल तर जाणून घ्या वेट डॅन्ड्रफ (Wet Dandruff) आणि ड्राय डॅन्ड्रफ (Dry Dandruff) मध्ये नेमका फरक काय आणि त्यावर काय उपचार करावेत. 

Shutterstock

वेट डॅन्ड्रफ (Wet Dandruff) म्हणजे काय –

आपल्या केसांच्या मुळांखाली सेबेशिअस ग्रंथी असतात ज्यांच्यामधून नैसर्गिक तेल म्हणजेच Sebum निर्माण होत असतं. या तेलामुळे तुमचे  केस मऊ आणि स्काल्प मुलायम राहण्यास मदत होते. Sebum मुळे तुमचे केस कोरडे आणि निस्तेज होण्यापासून संरक्षण होते. तुमच्या केसांसाठी Sebum गरजेचं असलं तरी जेव्हा सेबेशिअस ग्रंथी उत्तेजित होतात आणि अती प्रमाणात Sebum ची निर्मिती करतात तेव्हा तुमच्या केसांमध्ये अनेक समस्या निर्माण होतात.यामुळे तुमच्या स्काल्पवर अतिरिक्त Sebum जमा होते ज्यामुळे तुमचा स्काल्प तेलकट आणि चिकट होतो. तेलकट स्काल्पवर वातावरणातील धुळ, माती, घाण आणि डेडस्कीनअडकून राहते आणि तुमच्या केसांमध्ये पिवळसर रंगाचा पदार्थ म्हणजेच चिकट कोंडा निर्माण होतो. ज्यामुळे तुमचा स्काल्पवर अती खाज येते आणि जळजळ जाणवते.  या प्रकारच्या कोंड्याला वेट डॅन्ड्रफ असं म्हणतात. 

ADVERTISEMENT

Shutterstock

ड्राय डॅन्ड्रफ ( Dry Dandruff) म्हणजे काय –

ड्राय डॅन्ड्रफमध्ये स्काल्पवर पांढऱ्या रंगाचे लहान लहान कण निर्माण होतात. जे तुमच्या स्काप्लवरून घरंगळत तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर, अंगावर, कपड्यावर पडत राहतात. वेट डॅन्ड्रफप्रमाणे हे कण पिवळसर, चिकट आणि मोठ्या आकाराचे नसतात. त्यामुळे या दोन्हीमधील फरक तुम्हाला लगेच ओळखता येऊ शकतो.  शिवाय वेट डॅन्ड्रफप्रमाणे यात अती खाज, त्वचा लालसर होणे आणि जळजळ जाणवत नाही. 

 

ADVERTISEMENT

Shutterstock

वेट डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी घरगुती उपचार –

वेट डॅन्ड्रफ ड्राय डॅन्ड्रफपेक्षा जास्त काळ राहणारा आणि त्रासदायक असल्यामुळे त्यावर योग्य उपचार करणं गरजेचं आहे. यासाठी हे घरगुती उपचार अवश्य करा. 

मेथी –

मेथी तुम्ही केसांच्या कोणत्याही समस्यांवर वापरू शकता. वेट डॅन्ड्रफ कमी करण्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. 

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

  • दोन चमचे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवा 
  • मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा
  • स्काल्पवर सगळीकडे  ही पेस्ट ब्रशच्या मदतीने लावा
  • तीस मिनिटांनी केस स्वच्छ धुवून टाका
  • आठवड्यातून दोनदा हा उपाय करा

Shutterstock

लिंबू आणि आवळ्याचा रस –

लिंबू आणि आवळा या  दोन्ही घटकांमध्ये स्काल्प स्वच्छ करणारे आणि कोंडा कमी करणारे घटक असतात. कारण या दोन्ही पदार्थांमध्ये अॅंटि मायक्रोबाईल असतात ज्यामुळे वेट डॅन्ड्रफ कमी होतो.

ADVERTISEMENT

कसा कराल वापर –

  • दोन चमचे लिंबाचा रस आणि दोन चमचे आवळ्याचा रस एकत्र करा
  • कापसाच्या मदतीने हा रस स्काल्पवर व्यवस्थित लावा
  • तीस मिनिटांनी केस स्वच्छ धुवून टाका
  • आठवड्यातून दोनदा हा उपाय तुम्ही करू शकता

कोरफडाचा गर –

कोरफडामधील नैसर्गिक घटकांमुळे केस स्वच्छ होतात शिवाय केसांचे योग्य पोषणदेखील होते. यातील व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ईमुळे कोंड्यामुळे होणारा दाह कमी होतो. 

कसा कराल वापर –

ADVERTISEMENT
  • तीन ते चार चमचे कोरफडाचा गर घ्या 
  • कोरफडाचा गर व्यवस्थित मिक्स करून केसांच्या मुळांना लावा
  • त्यानंतर केसांना स्टीम द्या अथवा केसांवर गरम पाण्यात बुडवून पिळलेला टॉवेल गुंडाळा
  • वीस मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवून टाका
  • तुम्ही एक दिवस आड हा उपाय केसांवर करू शकता

वेट डॅन्ड्रफ आणि ड्राय डॅन्ड्रफ ओळखून त्यावर उपचार केल्यास तुम्हाला लवकर फायदा होऊ शकतो. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

घरच्या घरी बनवा हेअर जेल,जाणून घ्या कसं

मोहरीचा हेअरमास्क वापरून केस होतील अधिक घनदाट

जाणून घ्या थंड की कोमट, कोणत्या पाण्याने धुवावे केस

18 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT