ADVERTISEMENT
home / पालकत्व
What Really Happens When You Tickle Babies

लहान मुलांना का करू नयेत गुदगुल्या

लहान बाळ घरात आले की घरातील सर्वांच्या आनंदाला पारावार राहत नाही. सतत बाळाला घेऊन बसावे, त्याच्यासोबत खेळावे असं घरातील लहानांपासून मोठ्यांना वाटत असतं. बाळाच्या हसण्या आणि खेळण्यामुळे हातातील काम करण्याची देखील शुद्ध राहत नाही. मग बाळाला सतत हसत ठेवण्यासाठी हळुच गुदगुल्या करण्याची सवय लागते. बाळ गुदगुल्या केल्यावर खुदकन हसते आणि मग तुम्हाला असं सतत करावसं वाटत राहतं. तुम्हाला वाटतं गुदगुली केल्यामुळे तुमचे  बाळ सतत हसतमुख राहिल. मात्र असं करण्याची  सवय असेल तर ती लगेच थांबवा… कारण बाळाला गुदगुली करणं त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. का रडते तान्हे बाळ, शांत करण्यासाठी जाणून घ्या कारण

बाळाला गुदगुल्या केल्यामुळे काय होतात दुष्परिणाम

गुदगुल्या केल्यामुळे शरीरात संवेदना निर्माण होतात ज्यामुळे तुमचे बाळ हसू लागते. वास्तविक बाळाकडे हसणं आणि रडणं या दोन गोष्टी प्रतिक्रिया देण्यासाठी असतात. तुम्ही  केलेल्या गुदगुल्यांना ते हसून प्रतिक्रिया देत असते. मात्र ही गोष्ट बाळाला आवडत आहे की नाही ते यातून स्पष्ट होत नाही. ज्याला आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत अशा मुक्या प्राण्याला अथवा लहान बाळाला गुदगुल्या करणं  अमानुष आहे. शिवाय गुदगुल्या केल्यावर बाळ जोरजोरात हसू लागते. कारण  त्याला होणाऱ्या संवेदना  सहन  होत नसतात. अशा वेळी हसण्यामुळे त्याला ठसका लागण्याची अथवा श्वास अडकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. बऱ्याचदा अशा गुदगुल्या केल्यामुळे बाळाला अचानक उचकी लागते. बाळ सतत अशी गुदगुल्यांना फक्त हसून प्रतिक्रिया देत नाही. ज्यामुळे ते चिडचिडे होते. भरपूर हसण्यामुळे तुमचे बाळ थकून जाते. अंग चोरण्यासाठी जोरात अंग झटकण्यामुळे कदााचित त्याला आतून अथवा बाहेरून  एखादी दुखापत होऊ शकते. यासाठी बाळाला मुळीच गुदगुल्या करू नयेत. तसंच जाणून घ्या सर्वांसमोर का हट्ट करतात लहान मुलं, करा हे उपाय

What Really Happens When You Tickle Babies

बाळाला गुदगुली करण्याबाबत असलेले समज

बाळ चार ते सहा महिन्याचे झाल्यावर हसून अथवा रडून प्रतिक्रिया देण्यास शिकते. मात्र या वयात त्याला गुदगुलीच्या संवेदना समजताच असं नाही. बाळासाठी गुदगुली म्हणजे फक्त एक स्पर्श असतो. बाळाला पहिल्यांदा होणारा स्पर्शाचे ज्ञान गुदगुलीतून झाले तर त्याच्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ज्याचा परिणाम पुढे भविष्यात होणाऱ्या स्पर्श ज्ञानावर होण्याची शक्यता असते. काही लोकांना असं वाटतं की  बाळाला गुदगुल्या केल्यामुळे ते लवकर प्रतिक्रिया देण्यास शिकते. यासाठीच बाळाला हसवण्यासाठी, त्याला लवकर बोलायला शिकवण्यासाठी, एक प्रकारचा व्यायाम म्हणून, अथवा बाळावर प्रेम करण्यासाठी त्याला गुदगुल्या केल्या जातात. मात्र सूजाण पालकांनी याचा  नीट विचार करावा आणि  बाळाला योग्य मार्गाने हाताळावे. गुदगुल्या करण्याऐवजी तुम्ही बाळाला कुरवाळून, त्याचा पापा घेत,हलक्या हाताने मसाज करत त्याला स्पर्श ज्ञान आणि प्रेमाचा बॉंड निर्माण करू शकता. उशीरा का बोलू लागतात मुलं, उच्चार शिकवण्यासाठी या टिप्स आहेत फायदेशीर

03 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT