आरोग्य हा महिलांसाठी नेहमीच दुय्यम मुद्दा असतो. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिला तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. पण चाळीशीनंतर महिलेनं स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक करणं गरजेचं आहे. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महिलांना महागात पडू शकतं. आजारानं गंभीर स्वरूप धारण केलं की महिला डॉक्टरांकडे जातात. अशावेळी बऱ्याचदा खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच चाळीशी ओलाडंल्यानंतर प्रत्येक महिलेलं स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक रहाणं आवश्यक आहे. यासाठी नियमित वैद्यकीय चाचण्या करून घ्यावेत. आजार वेळीच लक्षात आल्यास उपचार करणं सहज सोपं होतं. महिलांनी कोणकोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात याबाबत रेडिओलॉजिस्ट डॉ. तरन्नुम खलीफे प्राईम डायग्नोस्टिक्स तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत.
अधिक वाचा – दीर्घायुषी व्हायचं असेल तर आताच स्वतःला लावा ‘या’ चांगल्या सवयी
काय आहे तज्ज्ञांचे मत
तज्ज्ञांच्या मते, वयाच्या तिशीत हृदयरोग, मधूमेह, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा आणि कॅन्सरसारखे जीवनशैलीशी निगडीत आजार डोकं वर काढण्याची भीती असते. कामाच्या व्यापात खाण्या-पिण्याच्या सवयीत बदल झाल्याने, शरीराकडे दुर्लक्ष होऊन आजारांना आयतं आमंत्रण मिळतं.
महिलांनी कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात…
रक्त तपासणी – CBC म्हणजे ‘Complete Blood Count’ ही रक्ताची अत्यंत सोपी टेस्ट आहे. यात रक्तातील पेशींच्या संख्येबाबत पूर्ण माहिती मिळते.” ही टेस्ट केल्याने अनिमिया, इतर संसर्ग, काही प्रकारचे कॅन्सर ओळखता येऊ शकतात. भारतात महिलांमध्ये अॅनिमियाचं प्रमाण खूप मोठं आहे. यात रक्तातील लालपेशींमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे पेशींपर्यंत योग्य ऑक्सिजन पुरवठा होत नाही. ही टेस्ट वर्षातून एकदा तरी करावी असा तज्ज्ञ सल्ला देतात
थायरॉईड टेस्ट – सध्याच्या काळात चाळीशीनंतर महिलांनी थायरॉइड चाचणी अवश्य करून घ्यावी. थकवा जाणवणं, स्नायू दुखणं, वारंवार भूक लागणे अशी लक्षणं दिसून असल्यास थायरॉईड चाचणी करून घेणं गरजेचं आहे. यासाठी रक्त चाचणीद्वारे टी ३, टी ४ आणि टीएसएच यांच प्रमाण बघितलं जातं.
रक्तातील साखरेची तपासणी – वैद्यकीय भाषेत याला शूगर टेस्ट असे म्हणतात. रूग्णाला मधुमेह आहे की नाही हे पाहण्यासाठी ही चाचणी केली जाते. रक्तातील साखरेचं प्रमाण ११० पेक्षा कमी असेल तर सामान्य मानलं जातं. ज्यांच्या रक्तात साखर जास्त आहे त्यांची HBA1C चाचणी केली जाते.
लिपिड प्रोफाईल – या मधे रक्तातील चरबीचे प्रमाण तपासले जाते सिरम ट्रायग्लिसराईड्स आणि कोलेस्ट्रोलची तपासणी होते. दरवर्षी एकदा ही चाचणी करणे आवश्यक आहे. पण लठ्ठ, मधुमेही व हृदयरोगींनी ही चाचणी नियमित करणं गरजेचं आहे.
ईसीजी – हृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का नाही हे पाहण्यासाठी ईसीजी चाचणी केली जाते.
पॅप स्मिअर टेस्ट – गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी एक आहे. ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) संसर्ग, धूम्रपान, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, वय आणि उच्च-जोखीम लैंगिक वर्तन यासारख्या काही कारणांमुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी स्क्रीनिंग ही सर्वोत्तम पद्धत आहे. पॅप चाचणी ही पॅप स्मीअर म्हणून ओळखली जाते, हे कर्करोगाचे लवकर निदान करण्यासाठी आणि मृत्यू आणि विकृती दर कमी करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे. ३०-४० वयोगटातील महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर दर २ वर्षांनी ही चाचणी घ्यावी.
स्तनाची चाचणी – स्तनाच्या कर्करोगाबद्दल अपुरी माहिती हे कर्करोगाचे उशीरा निदान होण्यामागील मुख्य कारणं आहे. म्हणून स्तनांमध्ये कोणताही बदल दिसून आल्यास त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्यावा. वयाच्या चाळीशीनंतर दर दोन वर्षीनी मॅमोग्राफी करण्याचा सल्ला दिला जातो. ही चाचणी क्ष-किरण व सोनोग्राफी या दोन प्रकारे केली जाते.यात क्ष-किरणांच्या साह्याने स्तनांची तपासणी केली जाते. ही एक अत्यंत महत्त्वाची चाचणी मानली जाते. जेणेकरून स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होऊन उपचार करणे सोपं होतं.
अधिक वाचा – चाळीशीनंतर झोप झाली असेल कमी तर वापरा सोप्या टिप्स
स्तन कर्करोगाच्या निदानासाठी डॉक्टर महिलांना घरच्या घरी स्तनांची तपासणी करण्यास सांगतात. याला Self-Breast Examination म्हणतात. महिलांनी स्तनांची घरच्या घरी तपासणी केली पाहिजे. स्तनात गाठ लागते का? निप्पलमधून स्राव होतोय? त्वचेचा रंग बदललाय का, याची तपासणी करावी. स्तनात काही बदल दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन एक्स-रे आणि सोनोग्राफीच्या सहाय्याने मेमोग्राफी करून घ्यावे.
या गोष्टींची चाचणी होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हीही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि वेळीच या चाचण्या करून घ्या.
अधिक वाचा – चाळीशीनंतर करा या हेअरस्टाईल, दिसणार नाही वयस्कर
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक