शिंक येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. पण जेव्हा तुमच्या तान्ह्या बाळाला लागोपाठ शिंका येतात. तेव्हा मात्र नव्याने आईबाबा झालेल्या पालकांना खूप चिंता वाटते. कारण अशी शिंक येण्यामागचं कारण त्यांना माहीत नसतं. बाळाला सर्दी, ताप झाला आहे का, अथवा बाळाच्या श्वासनलिकेत काही अडकलं आहे का, बाळाचे आरोग्य उत्तम आहे ना असे अनेक प्रश्न मनात येतात. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत बाळाला शिंक येणं नॉर्मल आहे का आणि त्यावर काय उपाय करावे.
नवजात बाळाला का येते शिंक –
शिंक येणे ही एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे. शिंक आपल्या मेंदूच्या कार्याद्वारे नियंत्रित होते. जेव्हा शरीरात एखादा विषाणू शिरण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा प्रोटेक्टिव्ह रिफ्लेक्स म्हणजे प्रतिक्रिया देत बचाव करण्यासाठी शिंक येते. याचाच अर्थ असा की आपली संपूर्ण शारीरिक नियंत्रण प्रणाली अथवा संस्था योग्य पद्धतीने सुरू आहे. एका संशोधनात तर असंही आढळलं आहे की बाळाला गर्भात असताना मिळणारी औषधं जन्मानंतर मिळणं बंद झाल्यामुळे नवजात बाळाला शिंक येऊ शकते. बऱ्याचदा एखादी अॅलर्जी अथवा सर्दी झाल्यामुळेही बाळाला शिंक येऊ शकते. यासाठीच बाळाला शिंक येणं कधी नॉर्मल आहे हे पालकांना माहीत असायला हवं. जर बाळाला सतत लागोपाठ शिंका येत असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
का रडते तान्हे बाळ, शांत करण्यासाठी जाणून घ्या कारण
बाळाला शिंक येणं कधी आहे नॉर्मल
जर बाळाला लागोपाठ शिंक येत नसेल तर काही वेळा एखादी शिंक येणं नक्कीच नॉर्मल आहे. जसं की,
- बाळाने लाळ गिळल्यामुळे शिंक येणे
- बाळाच्या नाकाची स्वच्छता करताना संवेदना झाल्यामुळे बाळाला शिंक येणे
- स्तनपानादरम्यान बाळाचे नाक दाबले गेल्यामुळे शिंक येणे
- वातावरणातील हवा खेळती नसल्यास घुसमट झाल्यामुळे शिंक येणे
- अंघोळ करताना नाकात पाणी गेल्यामुळे शिंक येणे
- झोपून दूध पाजल्यामुळे शिंक येणे
- धुळ, मातीमुळे कधीतरी शिंक येणे
तान्ह्या बाळासाठी अस्वच्छता ठरु शकते धोकादायक, तुम्ही करत नाही ना या चुका
बाळाला शिंक येणे कधी आहे चिंताजनक
बाळाला लागोपाठ काही मिनीटे शिंक येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
- यासाठी जाणून घ्या बाळाला शिंक येणे कधी आहे चिंताजनक
- बाळाला शिंकेसोबत श्वास घेताना त्रास होत असेल
- लागोपाठ वीस ते तीस शिंक येणे
- शिंकेसोबत बाळाला खोकला, ताप अथवा सर्दी असणे
- काही ठरविक वेळेत सतत शिंक येणे
- शिंकेमुळे बाळ दूध पित नसेल
- शिंक आल्यामुळे बाळ निस्तेज, चिडचिडे झाले असेल
लहान मुलांना का करू नयेत गुदगुल्या
आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेल्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि पालकत्त्वाविषयी तुम्हाला आणखी काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.