ADVERTISEMENT
home / आरोग्य
Why Drinking Water Immediately After Eating Cucumber Is Not Good

काकडी खाल्ल्यावर लगेच पित असाल पाणी तर वेळीच व्हा सावध, होतील दुष्परिणाम

उन्हाळ्यात काकडी खाण्याचे प्रमाण जास्त वाढते. कारण काकडी पाणीदार असल्यामुळे तुमच्या शरीराला हायड्रेट आणि थंड ठेवते. सलाडच्या स्वरूपात काकडी खाणं जास्त फायद्याचं ठरू शकतं. पण या व्यतिरिक्त कोशिंबीर अथवा रायतं करूनही तुम्ही काकडी खाऊ शकता.  काकडीमध्ये असलेल्या फायबर्समुळे तुमची पचनशक्ती सुधारते. ज्याचा परिणाम तुमचं वजन कमी होतं. काकडी कापून त्यावर मीठ लावून खाणार असाल तर मीठामुळे तुम्हाला तहान लागू शकते. म्हणूनच लक्षात ठेवा काकडीवर पाणी का पिऊ नये. तसंच वाचा स्वयंपाक घरातील काकडीचे फायदे (Benefits Of Cucumber In Marathi)

काकडीवर पाणी पिण्याचे दुष्परिणाम

काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, तांबे, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, पोटॅशिअम असे अनेक पोषक घटक असतात. निरोगी राहण्यासाठी, प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी, शरीर हायड्रेट राहण्यासाठी या सर्व पोषक घटकांची शरीराला गरज असते. केस आणि त्वचेसाठीही काकडी खाणं खूप फायद्याचं ठरतं. काकडी खाण्यामुळे तुमची हाडं मजबूत होतात. काकडीमध्ये पाण्याचा अंश भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला लगेच पाणी पिण्याची गरज नसते. शिवाय कोणतेही कच्च्या भाज्या अथवा फळं खाल्ल्यावर लगेच पाणी पिऊ नये. कारण त्या भाज्या अथवा फळांमधील पोषक तत्त्वं त्यामुळे शरीराला मिळत नाहीत. काकडीमधील पोषकतत्त्वं देखील पाणी पिण्यामुळे शरीरात शोषली जात नाहीत. यासाठी काकडीवर लगेच पाणी पिऊ नये. एवढंच नाही तर शरीराचे योग्य पोषण न झाल्यामुळे तुमच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम दिसू शकतात. काकडी खाल्यावर तुम्ही अर्धा तासानंतर पाणी पिऊ शकता. मात्र त्याआधी पाणी पिल्यास तुमच्या पचनशक्तीवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होतो. 

काकडीवर पाणी पिण्यामुळे काय नुकसान होते

काकडी खाल्ल्यावर जर चुकून अथवा जाणिवपूर्वक तुम्ही पाणी प्यायला तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीराला भोगावे लागतात.

  • काकडीवर पाणी पिण्यामुळे तुमच्या शरीरातील पाचकरस नष्ट होतात. ज्यामुळे तुमची पचनशक्ती मंदावते आणि खाल्लेले अन्न पचत नाही.
  • अन्नाचे योग्य पचन करण्यासाठी शरीराचा पीएच बॅलन्स  संतुलित असायला हवा. मात्र काकडीवर पाणी पिण्यामुळे तुमचा पीएच बॅलन्स असंतुलित होतो.
  • काकडीवर पाणी पिण्यामुळे तुम्हाला जुलाब अथवा पोटाच्या इतर समस्या जाणवू शकतात.
  • काकडीवर लगेच पाणी पिलं तर तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढतो, ज्याचा परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
13 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT