ADVERTISEMENT
home / आरोग्य
Why fruits should not be eaten with meals in marathi

जेवताना का खाऊ नयेत फळं, जाणून घ्या कारण

निरोगी राहण्यासाठी आहाराबाबत काही नियम नक्कीच पाळायला हवे. प्राचीन काळापासून आयुर्वेदात आहाराबाबत काही नियम सांगण्यात आलेले आहेत. प्रत्येक खाद्यपदार्थ खाण्याची एक वेळ आणि पद्धत असते. आजकालच्या धावपळीच्या युगात आहाराबाबत सर्व नियम पाळता नाही आले. तरी काही गोष्टींची योग्य काळजी घ्यायलाच हवी. कारण जर तुम्ही आहार चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या वेळी घेतला तर त्याचा फायदा होणार नाहीच उलट दुष्परिणामच जास्त भोगावे लागतील. आयुर्वेदानुसार जेवताना कधीच फळं खाऊ नयेत. जाणून घ्या काय असेल यामागचं कारण

फायबरयुक्त पदार्थ आणि फळं खाल्ल्यामुळे होणार फायदे (List of Fiber Rich Foods In Marathi)

का खाऊ नयेत जेवताना फळं

निरोगी आरोग्यासाठी आहारात फळं, भाज्या आणि सर्व प्रकारचा आहार असणं गरजेचं आहे. फळांमधुन शरीराला व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, फायबर्स मिळतात. त्यामुळे दिवसातून एकदा अथवा दोनदा फळं खायलाच हवीत. फळं खाण्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते आणि शरीर हायड्रेट राहते. फळांचा आहार केल्यामुळे वजनही नियंत्रणात राहते. मात्र यासाठी जर तुम्ही जेवणासोबत फळं खात असाल तर तसं मुळीच करू नका. कारण फळं इतर पदार्थांच्या तुलनेत लवकर पचतात. पण जेव्हा तुम्ही जेवणासोबत अथवा इतर पदार्थांसोबत फळ खाता तेव्हा शरीरात विषद्रव्ये निर्माण होतात. या विषद्रव्यांमुळे तुमच्या शरीरातील पाचक रसाची प्रक्रिया मंदावते. जेवण पूर्ण पणे पचत नाही तोपर्यंत तुमच्या आतड्यांमध्ये फळांचे कण अडकून राहतात. त्याचप्रमाणे जर फळांसोबत तुम्ही दूध अथवा दुधाचे पदार्थ सेवन केले तर त्यामुळे तुम्हाला सोरोयसिस अथवा इतर त्वचेचे आजार होण्याची शक्यता असते.

Why fruits should not be eaten with meals in marathi

सोरायसिस म्हणजे काय जाणून घ्या सर्व माहिती (Psoriasis Treatment In Marathi)

ADVERTISEMENT

फळं कशी खावीत 

दोन जेवणाच्या मधल्या वेळेत तुम्ही फळे खाऊ शकता. आयुर्वेदानुसार फळं खाण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी आहे. कारण त्यावेळी फळं खाण्यामुळे फळांचे पोषक घटक शरीराला सर्वात जास्त प्रमाणात मिळतात. त्याचप्रमाणे फळांचा रस पिण्यापेक्षा कच्ची फळं चावून खा. ज्यामुळे त्याचा तुमच्या शरीराला चांगला फायदा होईल. फळं चावून खाण्यामुळे शरीरातील पचनक्रिया सक्रिय होते.  शिवाय फळं कधीच शिजवून खाऊ नका, कारण फळं शिजवल्यामुळे त्यातील सर्व पोषक तत्त्वं नष्ट होतात.  त्याचप्रमाणे संध्याकाळी सहा नंतर फळं खाऊ नयेत. कारण फळं खाण्यामुळे तुमच्या रक्तातील साखर लगेच वाढते. रात्री फळं खाण्यामुळे तुमच्या झोप आणि पचनशक्तीवर याचा वाईट परिणाम होतो. 

वजन वाढवायचे असेल तर जाणून घ्या वजन वाढवण्यासाठी फळं (Weight Gaining Fruits In Marathi)

23 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT