आंबा, फणस, पेरू, चिकू खाल्यावर पाणी पिऊ नये असं घरात नेहमी सांगण्यात येतं. फणसाच्या गरांवर पाणी पिलं तर पोटात दुखतं असंही सगळे बोलतात. वास्तविक फळं खाल्यावर जास्त तहान लागते. काही लोकांना पेरूला तिखटमीठ लावून खाण्याची सवय असते. कलिंगडाच्या फोडी कितीपण पाणी दार असल्या तरी ते खाल्ल्यावर हमखास तहान लागते. कोणतंही फळ खाल्ल्यावर कमीत कमी एक ते दोन तास पाणी पिऊ नये असं सांगण्यात येतं. यामागे खरंच काही कारण आहे का की हा एक गैरसमज आहे हे आज आपण पाहण्याचा प्रयत्न करू या
फळांवर का पिऊ नये पाणी
आर्युवेदात आहारशास्त्राबद्दल अनेक गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. पूर्वीच्या काळी फळं, कंदमूळं हेच माणसाचे मुख्य आहार होते. त्यामुळे आयुर्वेदातही फळांवर पाणी न पिण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. फळं खाल्ल्यावर पाणी पिणं शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकतं. कारण फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. जर तुम्ही फळांसोबत पाणी पित असाल तर त्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पचनशक्तीवर याचा चुकीचा परिणाम होतो. यासाठीच फळ खाल्ल्यावर एक तास पाणी पिऊ नये. जर तुमची पचन शक्ती मंदावली तर त्यामुळे तुम्ही खाल्लेलं अन्न पचत नाही. मग तुम्ही कितीही फळं खाल्ली तरी तुम्हाला त्याचा काहीच फायदा होत नाही. वास्तविक फळांमध्ये असलेल्या पाण्याच्या अंशामुळे तुमचं शरीर हायड्रेट राहतं. म्हणूनच अशा वेळी तुमच्या शरीराला पाण्याची गरज नसते. शिवाय पोटाच्या समस्यांसोबत यामुळे तुमच्या शरीराचा पीएच बॅलेन्सही बिघडू शकतो. असं झाल्यास तुमच्या शरीरात फॅट जमा होते. इन्सुलीनचे प्रमाण अनियंत्रित होते. आंबट फळांवर पाणी पिल्यास तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता असते.
कोणत्या फळांवर मुळीच पाणी पिऊ नये
वास्तविक कोणतेही फळ खाल्ल्यावर पाणी पिणे योग्य नाहीच. मात्र तुम्ही जर कलिंगड, केळं, आंबा, फणस, पेरू, आंबट फळे खाल्ल्यावर पाणी पित असाल तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. आरोग्य बिघडू नये यासाठी घरातील मोठी माणसं तुम्हाला फळांवर पाणी पिण्यास मनाई करतात. आता हा सल्ला ऐकायचा का नाही हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. कारण एकदा तुमच्या पचनशक्तीवर परिणाम व्हायला लागला की, पुढे अनेक आरोग्य समस्या यामुळे निर्माण होण्याची शक्यता वाढते.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक