लग्न हा सगळ्यांच्या आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो. एखाद्या जोडीदारासोबत नव्या आयुष्याची सुरुवात करताना ती व्यक्ती आपल्या संसारासाठी पात्र आहे की नाही हे पारखून घेणे फारच गरजेचे असते. जोडीदार उत्तम मिळाला की, संसार हा चांगलाच होणार याचे समाधान पालकांना असते. पुढे संसारात येणारी व्यवधाने पार करत संसार टिकवणे हे प्रत्येकाचे काम असते. पूर्वी लग्नात कितीही बाधा आली तरी लग्न टिकवण्याचे प्रयत्न दोन्हीकडून व्हायचे. पण आता दिवसाला जेवढी लग्न होत नाहीत. त्याहून दुप्पट घटस्फोटाच्या केसेस वाढल्या आहेत. लग्न का टिकत नाहीत हे जाणून घेऊया.
नात्यात ‘मी’पणा आणू शकतो अनेक अडचणी
इगोने घेतली जागा
हल्ली नात्यात प्रेमापेक्षा इगो महत्वाचा झाला आहे. जोडीदाराने फक्त आपल्याला आदर द्यावा. असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे काहीही भांडण झाली की त्याचे रुपांतर हे एका मोठ्या भांडणात होते. मला तू असं का बोललास किंवा बोललीस? हे बोलणे इतके वाढते की, आता आपल्यापुढे तुझे काहीही चालायला नको असे एकमेकांना वाटत राहते. इगोमुळे आहे त्या परिस्थितीत खूश राहण्यापेक्षा एकमेकांचा अपमान करण्याचा खूप जण विचार करतात. त्यामध्ये हे नाते कधी तुटण्याच्या जागेवर येते हे कळत नाही. त्यामुळे नात्यात इगोला जास्त काळासाठी थारा देऊ नका. जर तुम्ही इगो जपलात तर त्याचा त्रास तुम्हाला पुढील आयुष्यासाठी होईल.
साथ सोडून जाण्याचा निर्णय
कितीही भांडण झाली तरी पूर्वी खूप जण एकाच घरात आणि एकाच छताखाली राहणे पसंद करत होती. पण आता अगदी काहीही झालं तरी पटकन सोडून जाणे किंवा दुरावा ठेवणे खूप लोकं पसंत करतात. त्यामुळे नात्यात दुरावा यायला सुरुवात होते. काही गोष्टी या सामुपचाराने आणि बोलून सोडवता येतात.उदा. एखाद्या भांडणातून जर कोणावर हात उचलणे झाले असेल तर पटकन संसार मोडणे किंवा कोणाचीही बाजू ऐकून न घेणे यामुळेही लग्न टिकवणे कठीण जाते.
ऐकून न घेण्याची वृत्ती
हल्ली कोणाच्याही कुटुंबात जास्त अपत्य नसतात. असले तर एक ते दोन अपत्य असते. त्यामुळे पालकांना आपले पाल्य फार जवळचे असते. त्यामुळे लाडात मुलगा-मुलगी दोन्हीही वाढलेले असतात. अशावेळी दुसऱ्या कुटुंबातील मुलगी आल्यानंतर किंवा मुलीने आपले घर सोडल्यानंतर नात्यात एडजस्टमेंट ही करावीच लागते. काही गोष्टी या बदलणार ते ऐकून घेण्याची वृत्ती हवी तरच नाते टिकते. एखाद्या गोष्टीवरुन तुम्हाला जर कोणी बोलत असेल तर त्यामध्ये वाद घालण्याची काहीही गरज नसते. त्यामुळे हे एक कारण हल्ली प्रकर्षाने दिसू लागले आहे.
पालकांचा सहभाग
आपल्या पाल्याचा विचार करण्यात पालक कुठेही कमी पडत नाहीत. पण हल्ली खूप पालकांचा मुलीच्या किंवा मुलाच्या संसारात अधिक अधिकार दिसून येतो. असेच व्हायला हवे. त्याने अमुक करायला हवे. असे म्हणत पालक जोडप्यांमध्ये बरेच गैरसमज निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात.जी दुर्देवाची गोष्ट आहे. पण या कारणामुळे देखील हल्ली अनेक लग्न सुरुवातीच्या काही काळातच तुटायला सुरुवात होते.
ही काही कारणं आहेत जी लग्न करणाऱ्यांनी लक्षात ठेवायला हवीत.
जोडप्याने सरोगसीचा पर्याय नक्की कधी वापरावा, जाणून घ्या