दत्तजयंतीचा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. सर्व भक्तांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…. दत्तगुरू विष्णूचा चौविसावा अवतार मानले जातात. दत्तगुरू हे अत्रि ऋषी आणि अनुसया यांचे पूत्र होते. दत्तगुरूंमध्ये एकदा माता अनुसया यांना ब्रम्हा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांच्या स्वरूपाचा साक्षात्कार झाला होता. तेव्हापासून दत्तगुरूंची त्रिमुर्ती स्वरूपात पूजा केली जाते. दत्तगुरू हे महान योगी असून नाथ संप्रदायाचे उपास्य दैवत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये दत्तांची अनेक तीर्थक्षेत्रे प्रसिद्ध आहेत. सहाजिकच दत्तजयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावात साजरी केली जाते. दत्तजयंतीच्या दिवशी केली जाणारी दत्तगुरूंची उपासना, पूजापाठ आणि नैवेद्यही खास असतो.
श्री दत्तगुरूंसाठी खास असावा नैवेद्य
दत्त संप्रदायात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्तजयंतीसाठी गुरू चरित्राचे पारायण आणि खास नैवेद्य केला जातो. दत्तगुरूंच्या नैवेद्यासाठी घेवड्याची भाजी आवर्जून केली जाते. नैवेद्याला हिंदू संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. भक्तीभावाने देवाला अर्पण केली जाणारे अन्न अथवा खाद्य वस्तू म्हणजे नैवेद्य. असं म्हणतात देवाला जे निवेदनिय तो नैवेद्य असतो. देवाला दिला जाणारा नैवेद्य पवित्र आणि खाण्यास योग्य असा असावा. शिव शंकराला दूध, गणपती बाप्पाला मोदक आणि देवीला पूरणपोळी, साटोऱ्यांचा नैवेद्य प्रिय असतो. त्याचप्रमाणे दत्तगुरूंना घेवड्याची भाजी प्रिय आहे. नैवेद्य करण्याची आणि देवाला दाखवण्याची खास पद्धत असते. भक्ताने स्वतः सूर्चिर्भूत होऊन नैवेद्य करायचा असतो. सूर्चिर्भूत होणे म्हणजे सौचविधी आणि अंघोळ इत्यादी स्वच्छता केल्यानंतर नैवेद्याची तयारी करावी. पण त्यासोबत भक्ताचे मनदेखील स्वच्छ आणि निर्मळ असावे. नैवेद्य दाखवताना मनात शुभविचार, नामस्मरण सुरू असेल तर दाखवलेला नैवेद्य देवाला नक्कीच पोहचतो. अशा नैवेद्याचे रूपांतर प्रसादात होते आणि प्रसाद हा भक्तांसाठी नेहमीच लाभदायक ठरतो. तुम्ही नैवेद्य काय दाखवता यापेक्षा तो दाखवताना तुमच्या मनात कशा भावना आहेत हे महत्त्वाचे असते.
दत्तगुरूंना का प्रिय आहे घेवड्याची भाजी
दत्तजयंती अथवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तभक्त गुरू चरित्राचे पारायण करतात. या गुरू चरित्राच्या त्रेपन्नाव्या अध्यायामध्ये घेवड्याच्या भाजीचा उल्लेख आढळतो.
स्वामी समर्थ कोट्स (Swami Samarth Quotes In Marathi)
गुरू चरित्र अध्याय त्रेपन्न –
घेवडा उपटोनिया दरिद्रियाचा । कुंभ दिधला हेमाचा । वर्णिला प्रताप श्रीगुरुचा । अष्टादशाध्यायांत ॥३६॥
दत्तगुरूंना सर्व भक्त समान असतात मग तुम्ही गरीब असा वा श्रीमंत, म्हणूनच दत्तगुरूंना तुमच्या घरची साधी घेवड्याची भाजीदेखील प्रिय असते. घेवड्याची भाजी फार महाग नसल्यामुळे गरीब, श्रीमंत असा कोणताही भक्त दत्तगुरूंना नैवेद्यात नक्कीच दाखवू शकतो. देवाला भक्ताचा भाव जास्त प्रिय असतो हेच यातून दिसून येते. यासाठीच नेहमी दत्तजयंतीला घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो. मात्र अनेकांना घेवड्याची भाजी स्वतः खायला आवडत नाही त्यामुळे घरी फक्त दत्त जयंतीला नैवेद्यासाठी घेवड्याची भाजी केली जाते. वास्तविक घेवड्याची भाजी फारच पौष्टिक असून चविलाही छान लागते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत घेवड्याच्या भाजीच्या रेसिपीज नक्की ट्राय करा आणि गुरूपौर्णिमा असो वा दत्त जयंती दत्तगुरूंना दाखवा खास घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य