ADVERTISEMENT
home / आरोग्य
Why you should always avoid bed tea

त्वरित बदला बेड टीची सवय, वजनासह वाढू शकतो ताणतणाव

सकाळ फ्रेश आणि उत्साही करण्यासाठी अनेक घरांमध्ये उठल्याबरोबर सर्वात आधी चहा केला जातो. एवढंच नाही तर “सकाळी उठल्याबरोबर मला पहिला चहा लागतो” हे वाक्यही अभिमानाने बोलणारे आपण अनेकदा पाहतो. चहाला अमुताची उपमा दिलेली असल्यामुळे चहा पिणं यात  काहीच वावगं नाही. उलट चहा हा विषय भारतात इतका प्रिय आहे की चहाप्रेमींची या विषयावर तासनतास चर्चा चालू शकते. पण तरिही हे अमृततुल्य पेय किती आणि कधी प्यावे यावर काही बंधने असायलाच हवीत. यासाठीच जर तुम्हाला बेड टी शिवाय आमची सकाळ फ्रेश होत नाही असं वाटत असेल तर तुम्हाला ही सवय आताच थांबवायला हवी. कारण चहाने जरी तुम्हाला सकाळी बरं वाटत असलं, प्रांतःविधी उरकण्यासाठी मदत होत असती, तरतरीत वाटत असलं तरी उपाशीपोटी  चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. सकाळी काहिही न खाता फक्त बेड टी घेण्यामुळे तुमच्या अनेक शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठी जाणून घ्या बेड टी घेणं का टाळावे.

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी चहामध्ये टाका या तीन गोष्टी

का टाळावा बेड टी –

बेड टी म्हणजे सकाळी उठल्यावर उपाशीपोटी घेतलेला चहा. असा चहा घेतल्यामुळे तुमच्या चयापचयावर दुष्परिणाम होतो. कारण रात्रभर जवळजवळ सात ते आठ तास तुमचे पोट उपाशी असते. अशा रिकाम्या पोटी फक्त चहा घेतल्यामुळे तुमच्या शरीरातील आम्लीय पदार्थांचे संतुलन बिघडते. ज्याचा परिणाम चयापचय यंत्रणेवर होतो आणि दिवसभर तुम्हाला पित्त,अपचनाचा त्रास जाणवतो. एका संशोधनानुसार चहा मध्ये दूध मिसळलं जातं तेव्हा दुधामधील पोषक तत्त्व नष्ट होतात. दूधाच्या चहाने पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो आणि तुमची पचनशक्ती मंदावते. यासाठी कधीच सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी दूध आणि साखरेचा चहा  घेऊ नये. मग याचा अर्थ सकाळी चहा घ्यायचाच नाही का ? तर असं नाही फक्त बेड टी  घेणं आवर्जून टाळायचं. जाणून घ्या यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण

चहा पिण्याचे फायदे करतील तुम्हाला आश्चर्यचकित (Tea Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

हे फायदे वाचाल तर रोज प्याल ‘गवती चहा’

बेड टीमुळे वजनासह वाढू शकतो ताणतणाव –

वजन कमी करणं ही आज काळाची गरज झाली आहे. कारण चुकीची जीवनशैली आणि अयोग्य  आहारामुळे आजकाल लठ्ठपणा ही एक समस्या निर्माण झाली आहे. जर तुम्ही वजन कमी  करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही बेड टी घेणं त्वरित बंद करायला हवं. कारण सकाळी उपाशीपोटी चहा घेतल्यामुळे तुमच्या शरीरात रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढते. ज्याचा वाईट परिणाम  तुमच्या वजनावर होतो आणि तुमचे वजन कमी करण्याचे प्रयत्न असफल होतात. बेड टीचा परिणाम तुमच्या संपूर्ण शरीरावर होतोच. मात्र यामुळे तुमचे स्ट्रेस हॉर्मोन्स असतुंलित होतात. सकाळी एक कप चहा जरी तुम्हाला फ्रेश करत असला तरी त्यामुळे तुमच्या शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. ज्यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स वाढून रात्री झोप न लागण्याची समस्या  वाढते. ज्याचा परिणाम तुमच्या मानसिक स्वास्थावर होतो आणि तुमची  चिंता काळजी वाढू लागते. यासाठीच सकाळी उठल्यावर आधी दूध, फळं, सुकामेवा असे पौष्टिक पदार्थ खा आणि मग नाश्ता करताना तुमचा प्रिय एक कप चहा नक्की घ्या. 

04 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT