हिवाळ्यात वातावरणात सतत बदल होत असतात. अशा बदलत्या वातावरणाचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो आणि इनफेक्शनमुळे सर्दी, खोकला, ताप, पोटदुखीचे त्रास जाणवतात. अशा आजारपणापासून दूर राहायचं असेल तर रोग प्रतिकार शक्ती मजबूतत असायला हवी. या काळात प्रतिकार शक्ती वाढवण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे दुधातून खारीकचे सेवन करणे. कारण यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा आणि आजारपणातून लढण्याचे बळ मिळू शकते. खजूर सुकवून त्यापासून खारीक तयार केले जातात. खारीक हा सुकामेव्याचा एक अतिशय उत्तम प्रकार आहे. शिवाय कोरडे असल्यामुळे तुम्ही खारीक खूप दिवस साठवून ठेवू शकता. खारीकमध्ये व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम, फायबर्स, प्रोटिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात. खजूरपेक्षा खारीकमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे खारीक तुमच्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायक ठरतात. यासाठीच जाणून घ्या खारीक आणि दूध एकत्र करून खाण्याचे फायदे
अशक्तपणा कमी होतो –
ज्यांना अशक्तपणा अथवा अॅनिमियाचा त्रास आहे अशा लोकांसाठी खारीक वरदान ठरू शकते. दुधात खारीक उकळून ते दूध प्यायलास खारीक मध्ये असलेले गुणधर्म दुधात उतरतात. शिवाय या दोघांच्या मिश्रणामुळे तुमच्या शरीरासाठी एक पौष्टिक हेल्थ ड्रिंक तयार होते. वाढत्या वयातील लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी त्यांना असे दूध पिण्यास देणे नक्कीच फायदेशीर ठरू शकते. अशक्त लोकांच्या शरीरात यामुळे रक्ताची निर्मिती होण्यास चालना मिळते. एवढंच नाही यामुळे पुरूषांमधील वंधत्वही कमी होण्याची शक्यता असते.
ह्रदयासाठी उत्तम –
खारीकमध्ये फॅट्स कमी असतात त्यामुळे त्यांच्या सेवनामुळे तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी रक्ताची घनता वाढणार नाही अशा पदार्थांची गरज असते. खारीकमध्ये सोडिअमचे प्रमाण कमी तर पोटॅशिअम जास्त प्रमाणात असते. ज्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. थोडक्यात दुध आणि खारीक एकत्र खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
पचनशक्ती वाढते –
खारीकमध्ये अॅंटि ऑक्सिडंट भरपूर असतात ज्यामुळे तुमच्या चयापचयाचे कार्य सुधारते. पचनशक्ती वाढवण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी शरीराला आवश्यक फायबर्सची गरज असते. खारीक दुधात सहज विरघळतात शिवाय त्यामध्ये फायबर्स मुबलक असतात. पोट स्वच्छ होण्यासाठी आणि पचनशक्ती मजबूत होण्यासाठी दुध आणि खारीकचे मिश्रण लाभदायक ठरते. मात्र असं असलं तरी योग्य पोषणासाठी दिवसभरात दोन ते तीन पेक्षा जास्त खारीक खाऊ नयेत.
हाडे मजबूत होतात –
खारीकमध्ये कॅल्शिअम पुरेशा प्रमाणात असतात. दूधामध्येही कॅल्शिअम भरपूर असते. दूध आणि खारीक एकत्र खाण्यामुळे शरीराला पुरेशा कॅल्शिअमचा पूरवठा होतो. यामुळे आर्थ्राटीस अथवा हाडांचे आजार होण्याचा धोका टळतो. हाडांची घनता वाढण्यासाठी आणि हाडे मजबूत होण्यासाठी चाळीशीच्या पुढील महिला, वृद्ध अथवा लहान मुलांनी दूध आणि खारीक एकत्र करून घेणे नक्कीच लाभदायक ठरू शकते.
दूध आणि खारीक कसे एकत्र खावे –
दूध आणि खारीक एकत्र करून खाण्यासाठी एक कप दूध पातेल्यामध्ये गरम करत ठेवा. दुधाला उकळी येऊ लागली की त्यामध्ये तीन ते चार मध्यम आकाराच्या खारीक टाका. जर तुमच्याकडे खारीक पावडर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. कोमट झाल्यावर खारीक गाळून घ्या. कोमट असतानाच हे दूध प्या. रात्री झोपण्यापूर्वी हे दूध घेतल्यास जास्त लाभ मिळू शकतो.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम, शटरस्टॉक
अधिक वाचा –
प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)
वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी पिताय? तर मग वाचाच