आजकाल मोबाईल हा लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग झाला आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन स्कुलमुळेतर घरातील प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल असतो. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वानाच मोबाईल नावाच्या व्यसनाने ग्रासलं आहे. मोबाईल वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच अनेक तोटेसुद्धा आहेत. काही जणांना तर मोबाईलची सवय इतकी असते की ते झोपताना मोबाईल त्यांच्या उशीजवळ ठेवून झोपतात. रात्री फोन कॉल, मेल, मेसेज तपासण्यासाठी अंथरूणातून उठायला लागू नये यासाठी ते हा पर्याय निवडतात. त्यामुळे दिवसाचा शेवट आणि दुसऱ्या दिवशीची सुरूवात त्यांची मोबाईलच्या दर्शनानेच होते. फोनमुळे तुमची झोपमो़ होतेच शिवाय त्याचे दुष्परिणाम शरीराला भोगावे लागतात. तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या फोनची SAR व्हॅल्यु तपासू शकता. ज्यावरून तुम्हाला तुमच्या फोनमधील रेडिएशनचे प्रमाण समजू शकते. काही असलं तरी जीवाशी खेळ नको यासाठी रात्री झोपताना फोन जवळ ठेवण्याची सवय त्वरीत बदला आणि जाणून घ्या या सवयीचे काय वाईट परिणाम होऊ शकतात.
जाणून घ्या मोबाईलचे दुष्परिणाम (Mobile Che Dushparinam)
मोबाईल उशीजवळ ठेवल्याचे दुष्परिणाम
जर तुम्ही रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवून झोपत असाल तर ही माहिती तुम्ही वाचायलाच हवी.
- मोबाईल फोनमधून सतत रेडिओ फ्रिक्वेंसी निघत असतात. ज्याचा तुमच्या मेंदू आणि शरीरावर वाईट परिणाम होतो. काही संशोधनात यामुळे गंभीर आजार होत असल्याचे आढळून आले आहे. मॉर्निंग वॉक करताना याकारणासाठी दूर ठेवा मोबाईल
- मोबाईलच्या अती वापरामुळे रात्री झोपूनही तुम्हाला दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि निरूत्साही वाटू शकते.
- फोनमधून येणाऱ्या या हानिकारक लहरींचा तुमच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे अल्झामरसारखे विकार होऊ शकतात.
- कर्करोग अथवा इतर घातक आजाराचा धोका या सवयीमुळे वाढण्याची शक्यता आहे
- रात्री झोपताना उशीखाली फोन ठेवल्यामुळे तुमच्या शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात ज्यामुळे तुम्हाला अनिद्रा आणि इतर मानसिक आजार होऊ शकतात.
- मोबाईलच्या या लहरींमुळे माणसाच्या डिएनए स्ट्रक्चरवर परिणाम होत असल्याचं काही संशोधनात आढळून आलं आहे.
- मोबाईल पाहत रात्री झोपल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही ज्यामुळे तुमच्या मेंदूच्या नसांना आराम मिळत नाही. अपुऱ्या झोपेमुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा होत नाही. ज्याचा परिणाम तुमच्या मेंदूच्या कार्यावर होण्याची शक्यता असते. कमोडवर बसून मोबाईल वापरणाऱ्यांनी वेळीच व्हा सावधान
- जे लोक रात्री झोपताना मोबाईल सोबत ठेवतात त्यांना जास्त प्रमाणात डिप्रेशन आणि ताणतणावाचा धोका असतो.