उन्हाळ्यात अनेक समस्या आपल्याला त्रासदायक ठरत असतात. शरीराचे तापमान असंही उन्हाळ्यात जास्त असतं त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे उन्हाळ्यात खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. तसंच शरीराचे तापमान अधिक थंड कसं राहील याकडे लक्ष द्यावे लागते. अशावेळी अनेक जण तांब्यांच्या भांड्यातील पाण्याचा वापर करतात अथवा अन्नही तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवताना दिसून येतं. पण तुम्ही कधी तांब्यांच्या भांड्यातून उन्हाळ्यात खाऊ – पिऊ नका असे सल्ले ऐकले आहेत का? खरं आहे उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्याचा वापर हा आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. याची कारण नक्की काय आहेत आणि असं का करावं हे समजून घ्या आणि तुम्हीही तांब्याच्या भांड्यातून अन्न खात असाल तर वेळीच थांबवा.
तांब्याच्या भांड्यांत अन्न का शिजवू नये?
तांब्याच्या भांड्यात (Copper) तुम्ही पाणी पिऊ शकता. मात्र तुम्ही यामध्ये अन्न शिजवणे उन्हाळ्याच्या दिवसात चुकीचे ठरते. कॉपरच्या भांड्यात अन्न शिजवल्याने यामध्ये तांबे उतरतं आणि त्याचा शरीरावर दुष्परिणाम होताना दिसून येतो.
- नाक फुटून नाकातून रक्त येणे
- भूक कमी लागणे
- शरीरात अधिक उष्णता निर्माण होणे
- डायरिया
- ब्लोटिंग (Bloating)
अशा समस्या यामुळे उद्भवताना दिसून येतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अन्न तांब्याच्या भांड्यात शिजवू नका आणि अन्न तांब्याच्या ताटातून वा वाटीतून खाऊ नका
कोणते पदार्थ तांब्याच्या भांड्यात शिजवू नयेत
तज्ज्ञांच्या मते तांब्याच्या भांड्यात उन्हाळ्यात दूध अथवा कोणतेही आंबट पदार्थ अजिबात उकळवू नयेत. कारण यामुळे एसिडिक रिअॅक्शन होण्याचा धोका असतो. यामुळे अनेकदा दूध फाटते आणि आंबट पदार्थ कॉपरमुळे खराब होतात. यामुळे तुमच्या आरोग्यालाही धोका पोहचू शकतो. त्यामुळे असे पदार्थ अजिबातच तांब्याच्या भांड्यात उन्हाळ्यात ठेऊही नयेत, अन्यथा हे पदार्थ फारच लवकर खराब होतात हे लक्षात ठेवा. उन्हाळ्यात तांब्यांच्या भांड्यामध्ये असे पदार्थ शिजवल्यास, शरीरावर होणारे परिणाम –
- उलटी होणे
- दस्त अर्थात जंत होणे
- ब्लोटिंग होणे
तर लहान मुलांसाठी तांबे अजिबातच योग्य नाही. उन्हाळ्याच्या दिवसात तांब्याच्या भांड्यात जेवण शिजवणे हे लहान मुलांसाठी योग्य नाही. त्यामुळे मुलांना चक्कर येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते अथवा मुलं दिवसभर अजिबातच अॅक्टिव्ह राहात नाहीत. त्यामुळे मुलांना तांब्याच्या भांड्यांपासून दूरच ठेवा.
उन्हाळ्यात तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणेही खराब?
तांबे अर्थात कॉपर हे उष्ण आहे आणि उन्हाळ्याच्या दिवसात याचा अधिक परिणाम होताना दिसून येतो. पण जिथे पाण्याचा प्रश्न आहे तिथे मात्र काहीही त्रास नाही. तुम्ही तांब्याच्या भांड्यातून पाणी पिऊ शकता. मात्र कोणत्याही वेळी कधीही पाणी पिऊ नका. रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा आणि सकाळी उठून रिकाम्या पोटी तुम्ही हे पाणी पिऊ शकता. पण तुम्ही कायम तांब्याच्या भांड्यातूनच पाणी पित असाल तर मात्र उन्हाळ्याच्या दिवसात जरा हे कमी करा.
उन्हाळ्याच्या दिवसात अल्युमिनिअमच्या भांड्यातही जेवण गरम करणे तसं तर योग्य नाही. मात्र तांब्याच्या तुलनेत याचा वापर चालू शकतो. उन्हाळ्यात खूपच उष्णता असल्यामुळे या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा आणि तुम्हाला कोणत्याही समस्या होत असतील तर त्वरीत डॉक्टरांना मात्र संपर्क साधायला विसरू नका.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक