ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
हिवाळ्यात होत असेल त्वचा टॅन, तर करा उत्तम आणि सोपा उपाय

हिवाळ्यात होत असेल त्वचा टॅन, तर करा उत्तम आणि सोपा उपाय

थंडीच्या दिवसात उन्हात बसल्यानंतरही खूप बरं वाटतं. पण जर उन्हात जास्त वेळ बसलं तर त्वचा टॅन होण्याची भीती असते. इतकंंच नाही तर हिवाळ्यात त्वचा बऱ्याचदा सहजपणेदेखील टॅन होते. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे टॅन होते. अशावेळी मॉईस्चर अथवा सनस्क्रिनचा वापर केला जातो. पण तरीही हिवाळ्यात त्वचा कोरडी होतेच आणि टॅनही होते. त्वचेला टॅन होऊ न देण्यासाठी आपण सनस्क्रिनचा वापर करतोच. पण सनस्क्रिचा अधिक वापर केल्याने त्वचा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्वचेला टॅन होण्यापासून वाचविण्यासाठी तुम्ही नैसर्गिक घटकांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे आणि याकडे जास्त लक्ष द्यायला हवे. त्वचेला हिवाळ्यात टॅन होण्यापासून वाचविण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काय उपाय करू शकता ते आम्ही या लेखातून तुम्हाला सांगणार आहोत. अतिशय साधे आणि सोपे उपाय असून तुम्हाला यासाठी जास्त त्रास घ्यायची गरज नाही. जाणून घेऊया उपाय.

नारळाचे तेल

Shutterstock

हिवाळ्याच्या दिवसात उन्हात बसल्याने अथवा बाहेर पडल्याने त्वचा पटकन टॅन होते. तसंच तुमची त्वचा पटकन कोरडी पडते. त्यामुळे नैसर्गिक घटक म्हणून तुम्ही यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करून घेऊ शकता. तुमची त्वचा टॅन होण्यापासून वाचवायची असेल तर तुम्ही नारळाचे तेल संपूर्ण अंगाला रात्री झोपताना लावा. यामुळे त्वचा टॅन होणार नाही आणि कोरडीही होणार नाही. तसंच यामध्ये कोणतेही रासायनिक पदार्थ नसल्याने त्वचेला त्रासही होत नाही. 

ADVERTISEMENT

tanning oil वापरण्याचे फायदे माहीत आहेत का?(Best Tanning Oils In Marathi)

तिळाचे तेल

Shutterstock

तिळाचे तेल हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. विशेषतः थंडीच्या दिवसात. तुमची त्वचा हिवाळ्यात जर टॅन होत असेल  तर तुम्ही तिळाचे तेल आणि अव्हाकॅडो ऑईल मिक्स करून घ्या. हे मिक्स केलेले तेल तुम्ही तुमच्या शरीराला नियमित लावा. यामुळे त्वचा टॅन होणार नाही आणि तुमची त्वचा अधिक चमकदार होण्यासाठीही याची मदत मिळेल. तिळाचे तेल हे आरोग्यासाठीही हिवाळ्यात उत्तम ठरते. त्यामुळे तुम्ही याचा योग्यरित्या उपयोग करून घ्या. 

ADVERTISEMENT

नैसर्गिक उपायांनी करा तुमच्या त्वचेला डीटॅन, जाणून घ्या घरगुती उपाय

कोको बटर

कोको बटर आजकाल अनेक मॉईस्चराईजरमध्येही असते. कोको बटर हे त्वचेसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा अधिक कोरडी होत असेल आणि त्रास होत असेल तर तुम्ही अर्धा चमचा कोको बटर किसून घ्या, त्यामध्ये थोडेसे नारळाचे तेल आणि गुलाबपाणी मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावा आणि तुमच्या चेहऱ्यावरील टॅन काढून टाकण्यास आणि कोरडी त्वचा अधिक मुलायम आणि मऊ करण्यासाठी याचा उत्तम उपयोग करून घेता येतो. 

त्वचेला डीटॅन करण्यासाठी उत्कृष्ट उत्पादनं, जे करतील तुमच्या त्वचेचं संरक्षण

ADVERTISEMENT

टीप – हे अत्यंत घरगुती उपाय आहेत.  तुम्हाला यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता. विशेषतः ज्या व्यक्तींची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी नक्की डॉक्टरांचा सल्ला घेऊन याचा वापर करावा. कोणत्याही त्वचेविषयी उपाय करताना आधी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे कधीही चांगला पर्याय असतो. त्यामुळे तुम्हाला जर काही त्रास असतील तर त्याआधी तुम्ही याचा हातावर पॅच लाऊन वापरही करून पाहू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

31 Dec 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT