ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
वर्क फ्रॉम होम सहज आणि सोपं होण्यासाठी टिप्स (Work From Home Tips In Marathi)

वर्क फ्रॉम होम सहज आणि सोपं होण्यासाठी टिप्स (Work From Home Tips In Marathi)

सध्या लॉकडाऊनमुळे आपण सर्वचजण शक्यतो वर्क फ्रॉम होम करत आहोत. काळाची गरज पाहता भविष्यातही वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड वाढणार आहे, यात शंका नाही. जर तुम्हालाही घरातून काम करणं पसंत असेल आणि तुमच्या करियर ग्रोथला कायम ठेवायचं असेल तर वर्क फ्रॉम करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठीच POPxoMarathi घेऊन आलं आहे काही टिप्स ज्या तुम्हाला वर्क फ्रॉम होम करताना नक्कीच उपयोगी पडतील.

लवकर करा सुरूवात (Start Your Work Early)

जेव्हा तुम्ही ऑफिसमधून काम करता तेव्हा तुम्हाला सकाळी उठून जायचं असल्यामुळे तुम्ही वेळेवर सगळं करता आणि ऑफिसला पोचल्यावर कामाला लागता. तसं घरी होत नाही. बरेच जण काम सुरू करण्याच्या काही वेळ आधी उठून ब्रश करून कामाला सुरूवात करतात. पण हे टाळा. उठल्यावर अगदी ऑफिस शेड्युलप्रमाणे तयार व्हा आणि मग कामाला लागा. म्हणजे तुमचं काम छान आणि वेळेवर होईल. नाहीतर बेडमधून उठून कामाला लागलात तर संपूर्ण दिवस आळसात जाईल आणि खाण्यापिण्याच्या वेळाही चुकतील.

ADVERTISEMENT

ऑफिसच्या वातावरणाची निर्मिती (Create An Office Environment)

ऑफिसच्या वातावरणाची निर्मिती - Tips For Work From Home In Marathi

Shutterstock

दिवसाच्या सुरूवातीलाच मनात ठरवून घ्या की, जणू आपण ऑफिसमधूनच काम करणार आहोत. घरात ऑफिससारखं वाटावं म्हणून तुम्ही तशी वातावरण निर्मितीही करू शकता. जसं ऑफिसला जाताना घालायचे नेहमीचे कपडे घालून काम करायला बसा. जेव्हा तुम्हाला प्रोफेशनलप्रमाणे वाटू लागेल तेव्हा तुम्ही प्रोफेशनली कामंही करू शकाल. यामुळे तुमच्या कामावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल आणि आत्मविश्वासही वाढेल.

ADVERTISEMENT

ऑफिसप्रमाणे दिवस आखा (Structure Your Day Like Office)

दिवसाचं रूटीन अगदी ऑफिसमधल्या वेळेप्रमाणे ठेवा. जसं ऑफिसमध्ये गेल्यावर चहा-कॉफीची सवय असल्यास ती घ्या आणि कामाला सुरूवात करा. ऑफिस शेड्युलनुसारच लंच ब्रेक घ्या आणि त्यानंतर पुन्हा कामाला लागा. असं केल्याने तुमचा संपूर्ण दिवस अगदी ऑफिसप्रमाणे जाईल. तसंच वेळेवर काम झाल्याने वर्किंग अवर्सनंतर घरच्यांनाही वेळ देता येईल. अधेमधे काही वेळ वाया गेल्यास तुमचे वर्किंग अवर्सही पुढे ढकलले जातील. परिणामी तुम्हाला जास्त थकल्यासारखं होईल. त्यामुळे ऑफिस टाईमिंगनुसार वर्क फ्रॉम होम करा आणि कामाचा वेळ सत्कारणी लावा.

वर्क फ्रॉम होमसाठी जागेची निवड (Choose A Dedicated Work Space)

वर्क फ्रॉम होम - Work From Home In Marathi

Shutterstock

ADVERTISEMENT

घरातून काम करणार असलात तरी ज्या ठिकाणी बसणार आहात, ती जागा ठरवून घ्या. रोज त्याच जागी बसून काम करा. लक्षात घ्या कामाच्या ठिकाणी सामानाची गर्दी टाळा. काम करताना शक्य असल्यास टेबल, खुर्ची, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप आणि लाईट्सची व्यवस्था उत्तम असायला हवी. ज्यामुळे घरातून काम करताना तुम्हाला अडचणी येणार नाही. तसंच जिथे काम करण्यासाठी बसणार आहात तिथे पुरेशी शांतताही हवी. जर तुम्ही खिडकीजवळ बसून काम करणार असाल तर तुमचं लक्ष भटकू शकतं. त्यामुळे अशा ठिकाणी बसा जिथे दरवाजा बंद असेल आणि खिडकीतून बाहेर लक्षही जाणार नाही.

सोशल मीडिया टाळा (Avoid Social Media)

सोशल मीडिया हे वर्क फ्रॉम होम करताना येणारी सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे घरातून काम करताना सोशल मीडिया वेबसाईट्सचे शॉर्टकट्स काढून टाका. प्रत्येक सोशल मीडिया अकाउंटमधून लॉग आऊट करा. ज्यामुळे तुम्हाला वारंवार फेसबुक किंवा इतर सोशल साईट्सवर जायची इच्छा होणार नाही. कारण सोशल मीडिया साईट्स या अगदी सहज सुरू करून वापरता येतील अशाच असतात. त्यामुळे ही आकर्षण टाळा.

कामाप्रती प्रामाणिकपणा (Commitment)

कामाप्रती प्रामाणिकपणा - Tips For Work From Home In Marathi

ADVERTISEMENT

Shutterstock

घरातून काम करतानाचा मुख्य फायदा ऑफिसमध्ये येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. जसं ऑफिस कलीग्ज्समधलं गॉसिप किंवा ऑफिसमधला गोंधळ. पण घरीसुद्धा काही अडचणी येऊ शकतात. जसं तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मुलांमुळे तुमच्या कामात व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे आधीच याबाबतच्या सीमा ठरवून घ्या. यामुळे तुम्हाला कामादरम्यान डिस्टर्ब होणार नाही. कोणत्याही इतर कामात ऑफिस वेळेदरम्यान अडकून घेऊ नका. कारण ऑफिसचं काम नीट करण्यासाठी तुम्हाला फोकस असणं आवश्यक आहे.

आवडीचा वेळ (Productivity Time)

कोणतीही व्यक्ती दिवसरात्र काम करू शकत नाही. काहीजण लवकर उठून कामाला सुरूवात करतात तर काहीजणांना संध्याकाळ होताना पटापट काम करण्याची सवय असते. तुम्हाला जशी सवय असेल त्याप्रमाणे चांगलं आणि क्रिएटिव्ह वर्क फ्रोम होम करा. त्यामुळे त्या वेळा निवडा आणि त्यानुसार जास्तीतजास्त काम करा. ज्यामुळे वर्क फ्रॉम होममध्येही तुमचा परफॉर्मन्स चांगला राहील.

ADVERTISEMENT

वेळेचं नियोजन (Time Management)

वेळेचं नियोजन - Tips For Work From Home In Marathi

Shutterstock

वर्क फ्रॉम होम करत असलात तरी पूर्ण दिवसाचं एक स्पष्ट रूटीन ठरवून घ्या. काहीजण टार्गेट पूर्ण करण्यासाठी 4 तासांचा ब्लॉक बनवूनही काम करतात. या चार तासात ऑफिसचं महत्त्वाचं काम झालंच पाहिजे. घरातून काम करताना अनेकदा आपण काही ना काही छोट्या कामात अडकतो. पण असं करू नका. घरातून काम करताना इतर काहीही काम करणं टाळा आणि ऑफिसचं काम आधी नेटाने पूर्ण करा.

प्लॅनिंग (Planning)

ऑफिसमध्ये काम करताना तुम्हाला मधेमधे रिमांइडर्स मिळत असतात. महत्त्वाच्या कामांसाठी टीम मेंबर्स आणि तुमचे वरिष्ठ तुम्हाला सूचना देत असतात. पण वर्क फ्रॉम होममध्ये हे तितकंस होत नाही. त्यामुळे या अभावी तुमचं लक्ष कामातून भटकू शकतं. यावर उपाय म्हणजे दिवसाच्या सुरूवातीलाच 15 मिनिट्स टास्क, गोल्स आणि डेडलाईन्सची एक लिस्टच तयार करा. जसं जसं तुम्ही काम संपवाल तसंतशी ही टास्क लिस्ट टीक करत जा. असं केल्याने तुम्ही दिवसभरात किती काम केलं याचा तुम्हालाही अंदाज येईल आणि कामंही पूर्ण होईल.

ADVERTISEMENT

टेकसॅव्ही व्हा (Be Tech Savy)

टेकसॅव्ही व्हा  - Tips For Work From Home In Marathi

Shutterstock

वर्क फ्रॉम होम करणार आहे म्हटल्यावर तुमच्याकडे चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असणंही गरजेच आहे. तुमच्याकडे वायफाय इंटरनेट असलं तरी बॅकअपसाठी एक इंटरनेट डोंगल असायलाच हवं. तुमच्या स्मार्टफोनमध्ये ईमेल आणि कम्युनिकेश एप्सची सुविधा असली पाहिजे. तुमच्या लॅपटॉपमध्येही कामासाठी आवश्यक सॉफ्टवेअर असलं पाहिजे. तसंच वर्क फ्रॉम होम आहे म्हटल्यावर ऑफिस सहकाऱ्यांशी कनेक्टेड राहण्यासाठी स्काईप आणि झूमसारख्या एप्सचीही माहिती तुम्हाला असली पाहिजे. या एप्स कशा वापरायच्या हे माहीत असल्यास तुमचं काम नक्कीच सोपं होईल. त्यामुळे स्वतःला टेक अपडेट ठेवा.

विश्रांतीच्या वेळा (Take Timely Breaks)

घरातून काम करणार आहे म्हटल्यावर स्वतःला कामात इतकंही गुंतवून घेऊ नका की बाकी गोष्टींवर अन्याय होईल. खाण्यापिणाच्या वेळा सांभाळा. काम करण्याचा कंटाळा आल्यास किंवा झोप आल्यासारखं वाटल्यास तुमच्या कामाच्या जागेपासून उठून थोडा वॉक घ्या किंवा कॉफी घ्या. माइंड आणि मूड फ्रेश करण्यासाठी वेळेवर आणि आवश्यक ब्रेक्सही नक्की घ्या. ऑफिस अवर्स संपल्यावरचा वेळ पूर्णतः कुटुंबालाच द्या.

ADVERTISEMENT

काम आणि म्युझिक (Work And Music)

काम आणि म्युझिक - Tips For Work From Home In Marathi

Shutterstock

काम करता करता तुम्ही म्युझिक ऐकू शकता. हो.. तुमच्या आवडीचं आणि कामात बाधा आणणार नाही असं म्युझिक ऐकायला काहीच हरकत नाही. उलट यामुळे तुम्हाला काम करण्याचा चांगला मूड येईल. या म्युझिक प्लेलिस्टमध्ये तुम्ही व्हिडिओ गेम्सचे साऊंडट्रॅक्सही ऐकू शकता. असं म्युझिक तुम्हाला फोकस करण्यात मदत करत. तसंच काही सूदिंग म्युझिक ट्रॅक्सही तुम्ही काम करता करता ऐकू शकता.

मग तुम्हीही वरील टिप्स वर्क फ्रॉम होम करताना नक्की फॉलो करा आणि घरातूनही जास्तीत जास्त चांगलं काम करा. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या हे आम्हाला नक्की सांगा. POPxoMarathi वर तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल तेही आम्हाला नक्की सांगा.

ADVERTISEMENT

हेही वाचा –

‘वर्क फ्रॉम होम’ करत आहात, या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

WFH अर्थात वर्क फ्रॉम होममध्येदेखील घ्या आपल्या त्वचेची काळजी

काम आणि वैयक्तिक आयुष्यात असा साधा समतोल

ADVERTISEMENT

गरोदरपणात नोकरी करताना महिलांनी अशी घ्यावी काळजी

23 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT