ADVERTISEMENT
home / योगासन
yoga_books_in_marathi

योगवरील मराठी पुस्तके | Yoga Books In Marathi

योग हा निरोगी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे. म्हणूनच हल्ली अनेक जण योग नियमित आणि नित्यनेमाने करतात. योगामध्ये अनेक योगासनांचा समावेश असतो. भुजंगासन, बकासन, गोमुखासन अशी अनेक आसनं आपल्याला माहिती असतील.काही आसनं ही सोपी तर काही आसनं कठीण आहेत. पण योगाचे शरीराला कमालीचे फायदे होण्यास मदत मिळते. योग करण्यासाठी तो नीट करणे आणि त्याबद्दलची योग्य माहिती असणे देखील तितकेच गरजेचे आहे. योग मुद्रा योग्य जाणून घेण्यासाठी त्याचे उत्तम ज्ञान आपल्याला हवे. त्यासाठीच Yoga Books In Marathi म्हणजेच योगाची माहिती देणारी पुस्तके तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला त्याचे योग्य ज्ञान मिळण्यास मदत मिळते. पुस्तकातून मिळणारे ज्ञान हे नेहमीच सखोल आणि अभ्यासपूर्ण असते. त्यामुळे योग या विषयांवरील Books On Yoga In Marathi आपल्याकडे अगदी हमखास असायला हवीत. त्यासाठीच आम्ही पुस्तकांची एक खास यादी केली आहे.

दररोजची योगासने पुस्तक मराठी (Darroj chi Yogasane Book Marathi)

योग नियमितपणे करण्याचा विचार केला असेल तर तुम्ही कोणती योगासने करायला हवीत हे माहीत असायला हवे. काही योगासने ही दररोज केल्याने मन आणि तन दोन्हीही शांत होते. अशी योगासने कशी कोणत्या क्रमाने करावीत हे सांगणारे असे हे पुस्तक आहे. वेगवेगळ्या व्याधींनुसार कोणता योगा हा तुमच्यासाठी उत्तम आहे हे देखील यामध्ये सांगण्यात आलेेले आहे.

पुस्तकाचे लेखक: बाजीराव पाटील
पुस्तकाची किंमत : 120/-

वाचाचमकणार्‍या त्वचेसाठी पावर योगा आणि त्याचे फायदे

ADVERTISEMENT

संपूर्ण योगविद्या पुस्तक मराठी (Sampoorna Yogvidya Book Marathi)

योगाच्या साहाय्याने जगण्याची कला शिकता येते. योगामुळे निरोगी जीवन चांगले राहते. मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी योगा मदत करते. योग करताना काय खावे आणि काय खाऊ नये हे देखील जाणून घेणे महत्वाचे असते.  योग करताना काय वर्ज्य आहे ते देखील जाणून घ्यायला हवे.  या पुस्तकात योगच नाही तर ॲक्युप्रेशर, ताणतणावाला प्रतिबंधित योगाची माहिती असे सगळे काही देण्यात आलेले आहे. 

पुस्तकाचे लेखक: राजीव जैन
पुस्तकाची किंमत: 276/-

शालेय मुलांसाठी योगासने आणि सूर्यनमस्कार (Shaleya Mulansathi Yogasane Aani Suryanamskar Book Marathi)

मुलांना योगाची गोडी जर योग्य वेळी लावली तर ते नक्कीच पुढे जाऊन चांगल्या सवयी लागू शकतात. खास मुलांसाठी लिहिलेले योगाभ्यासाचे हे पुस्तक प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलांना द्यायला हवे असे आहे. खास तुमच्या लहान मुलांसाठी शालेय मुलांसाठी योगासने आणि सूर्यनमस्कार हे पुस्तक तुम्ही घ्यायला हवे. 

पुस्तकाचे लेखक:  आनंद भागवत
पुस्तकाची किंमत : 50/-

ADVERTISEMENT

वाचावजन कमी करण्यासाठी, करून पाहा ‘हे’ योगासने

 सर्वांसाठी योगासने पुस्तक मराठी (Sarvansathi Yogsane Marathi Book)

पुस्तक वाचण्याचा कंटाळा अनेकांना असतो अशांसाठी लहान पण उपयुक्त असे पुस्तक म्हणजे सर्वांसाठी योगासने. या पुस्तकात वेगवेगळ्या योगासनांविषयी माहिती देण्यात आलेली आहे. इतकेच नाही. तर यामध्ये चित्रांचा समावेश करण्यात आल्यामुळे ही आसनं करणे फारच सोपे जाते. चित्र पाहून आसन करणे अधिक सोयीस्कर असल्यामुळे हे पुस्तक प्रत्येकाकडे असायलाच हवे.

पुस्तकाचे लेखक: डॉ. संजय खळतकर
पुस्तकाची किंमत : 26 रुपये

स्त्रियांसाठी योग पुस्तक मराठी (Striyansathi Yog Marathi Book)

महिलांना घर आणि काम असा दोन्ही बॅलन्स साधायचा असतो. हे साधताना अनेक आजारांना सामोरे जावे लागते.  आर्थिक ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या महिला त्यांना आलेला शारिरीक थकवा विसरुन जातात. त्यांच्या मनावरील आणि शरीरावरील थकवा काढण्याचे काम योग करते. अशा स्त्रियांसाठीच या पुस्तकामध्ये डॉ. गीता अय्यंगार यांनी योग्य असे मार्गदर्शन केले आहे. यामध्ये योगत्वे, आसनं, प्राणायाम, ध्यानधारणा अशा सगळ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. 

ADVERTISEMENT

पुस्तकाचे लेखक: डॉ. गीता अय्यंगार
पुस्तकाची किंमत : 296/-

वाचायोग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाचे नियम

योगसाधना पुस्तक मराठी (Yogsadhna Book Marathi)

योगामधील आसनांची योग्य माहिती तुम्हाला या पुस्तकामध्ये मिळेल. यामध्ये योगसाधना, प्राणायम,जप, ध्यान आणि विपश्यना याचा समावेश करण्यात आलेला आहे. योगसाधना करतानाची संपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे. या पुस्तकाचा हेतू हा शरीरातील सप्तचक्रांच्या साहाय्याने सप्तचक्रांच्या स्थानावर योगसाधना कशी करावी. एकाग्र आणि एकचित्त कसे व्हावे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक वाचायला हवे.

पुस्तकाचे लेखक : जय जोशी
पुस्तकाची किंमत : 150 रुपये

ADVERTISEMENT

ओशो-योगाचे नवे पैलू पुस्तक मराठी (Osho- Yogache Nave Pailu Marathi Book)

योगशास्त्रावर ओशो यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांनी अनेक प्रवचने देखील दिले आहेत. ओशो यांचे लोकांच्या मनातील स्थान फारच वेगळे आहेत. ज्यांनी ओशो यांना वाचले नाही. त्यांनी पुस्तकाच्या रुपातून त्याचे वाचन करायला हवे. म्हणजे तुम्हाला त्याचे योग्य ज्ञान मिळेल

पुस्तकाचे लेखक: ओशो
पुस्तकाची किंमत: 150/-

योगदीपिका पुस्तक मराठी (Yogdeepika Marathi Book)

योगावर प्रकाशझोत टाकणारे असे हे पुस्तक असून या पुस्तकामध्ये योगाची उत्तम माहिती देण्यात आलेली आहे. योग दीपिका हे प्रसिद्ध योगाकार बी.के. एस. आयंगर यांनी लिहिलेले असून यामध्ये योगाचे महत्व देखील सांगण्यात आलेले आहे.  ही पुस्तके अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आलेली आहे. मराठीमध्ये हे पुस्तक योग प्रकाश नावाने प्रसिद्ध केलेले आहे.

पुस्तकाचे लेखक: बी.के. एस. अय्यंगार
पुस्तकाची किंमत:  293/-

ADVERTISEMENT

आरोग्य तुमच्या हातात रोगानुसार योगा पुस्तक मराठी (Aarogya Tumchya Hatat )

योगामध्ये अनेक रोगांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे. तुम्हाला काय त्रास होतो त्यानुसार तुम्ही कोणता योगा करायचा याचे योग्य ज्ञान देणारे असे हे पुस्तक आहे. शरीराल होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा तुम्ही तुम्हाला असणाऱ्या त्रासानुसार कोणता योगा करायला हवा ते जाणून घेतले तर त्याचा अधिक फायदा तुम्हाला मिळण्यास मदत होईल.

पुस्तकाचे लेखक : प्रा. दिनेश भाळके
पुस्तकाची किंमत : 224/-

सुलभ योगासने आणि व्यायाम पद्धती पुस्तक मराठी (Sulabh Yogasane Ani Vyayampadhati)

योगाचे नेमके फायदे काय ? हे आपण जाणतोच. पण शरीरातील नाड्या आणि इतर अवयवांना तो नेमका कसा फायदेशीर ठरतो हे देखील जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे.  योगी व्यायाम करतात असे म्हणताना त्यांच्या अनुभवातून योग साधना करुन दीर्घायुषी कसे व्हावे ते जाणून घेण्यासाठी सुलभ योगासने हे पुस्तक वाचायला हवे. या पुस्तकात आसनांची माहिती अगदी खोल देण्यात आलेली आहे.

पुस्तकाचे लेखक: गोपाळ महादेव चिपळूणकर
पुस्तकाची किंमत:  20/-

ADVERTISEMENT

पातंजल योगसुत्रे / योगसुत्रे पुस्तक मराठी (Patanjal Yogsutra Book Marathi)

पातंजल योगसूत्रे’ हा महर्षी पतंजलींनी सिध्द केलेला भारतीय योगपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ आहे. चार भागात  विभागलेल्या या ग्रंथात अष्टांग योगसाधनेची सूत्रात्मक पध्दतीने समग्र मांडणी केलेली आहे. याची माहिती तुम्हाला असणे हे फारच गरजेचे आहे. योग सुत्रे खऱ्या अर्थांनी जाणून घ्यायची असतील तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचायला हवे. 

पुस्तकाचे लेखक:  बी. के. एस. अय्यंगार
पुस्तकाची किंमत: 200/-

पुस्तकं ही आपले खरे मित्र आणि योग्य मार्गदर्शक आहेत. योगवरील माहितीपूर्ण मराठी पुस्तके | Yoga Books In Marathi ची ही यादी आम्ही शेअर केली आहेत. ही पुस्तके तुम्ही नक्की विकत घ्या आणि वाचा.

26 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT