योगासनांचा सराव करणे शरीराच्या आणि मनाच्या सर्वांगिण विकासासाठी योग्य ठरते. कारण योगामुळे तुमच्या शरीर आणि मनाचे योग्य संतुलन राखले जाते. आरोग्य समस्या अथवा मानसिक समस्या दूर ठेवण्याचा हा एक सोपा मार्ग आहे. योगासनांचा नियमित सराव केल्याने तुमचे शरीर लवचिक बनते, रक्तप्रवाह सुधारतो, प्रतिकार शक्ती वाढते, स्नायू बळकट होतात. यासाठी प्रत्येकाला Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे माहीत असायला हवे. योगासनांचे विविध प्रकार आहेत. निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे प्रकार | Types of Yoga For Health In Marathi जाणून घ्या आणि त्याचा सराव करा. त्यातील एक महत्त्वाचे आसन म्हणजे गोमुखासन (Gomukhasana in Marathi). या आसनामध्ये तुमच्या चेहऱ्याचा आकार गाईच्या तोंडाप्रमाणे होतो यासाठी या आसनाला योगासन असे म्हटले जाते. गोमुखासन हे एक बसून करण्यासारखे आसन आहे, या आसनामुळे हात, पाय, छाती, खांदे अशा सर्वांगावर चांगला ताण येतो. हे आसन योग्य पद्धतीने केल्यास त्याचे अनेक फायदे शरीराला मिळतात. यासाठी जाणून घ्या गोमुखासनाची संपूर्ण माहिती (Gomukhasana Information in Marathi).
गोमुखासन कसे करावे – How To Do Gomukhasana
गोमुखासनाचे योग्य फायदे मिळण्यासाठी ते तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आणि तंत्रशुद्ध पद्धतीने करायला हवे. योगासनांचा नव्याने सराव करणाऱ्या व्यक्तीला सुरुवातील गोमुखासन करणं थोडं कठीण जाऊ शकतं. मात्र नियमित सराव केल्यास कोणालाही गोमुखासन करणं नक्कीच कठीण नाही. यासाठी जाणून घ्या गोमुखासन (Gomukhasana Information in Marathi) करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत
- योगा मॅटवर निवांत बसा आणि तुमचे दोन्ही पाय समोर सोडून एकत्र जोडा
- डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या निंतबाखाली ठेवा.
- उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा.
- या स्थितीत तुमच्या दोन्ही पायांचे गुडघे एकमेकांवर चिकटतील अशा स्थितीत यायला हवे.
- उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या नितंबाजवळ खेचून घ्या.
- डावा हात पाठीवरून घेत कोपरातून वाकवा आणि त्या हाताने उजवा हात कोपऱ्यातून वाकवत पाठीकडून खालच्या दिशेने नेत दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडण्याचा प्रयत्न करा.
- मात्र या स्थितीत तुमच्या पाठीचा कणा ताठ राहील याची काळजी घ्या, हात एकमेकांपर्यंत पोहचत नसतील तर जिथपर्यंत पोहचतात तिथपर्यंत न्या, सरावाने तुम्हाला या आसनाची आदर्श स्थिती नक्कीच करता येईल.
- या स्थितीत तुम्हाला जितकं शक्य असेल तितकं स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. नव्याने शिकत असाल तर तुम्ही साठ सेंकद या स्थितीत राहू शकता. मात्र त्यानंतर सरावाने श्वासावर लक्ष ठेवत तुम्ही अधिक काळदेखील या स्थितीत स्थिर राहण्याचा प्रयत्न करा.
- आसन स्थितीतून बाहेर येताना श्वास सोडत हातांना मोकळं करा त्यानंतर पाय पुन्हा पूर्वस्थितीत न्या.
- पुन्हा दुसऱ्या पायाच्या बाजूने म्हणजे उजवा पाय डाव्या नितंबाजवळ नेत डावा पाय दुमडत गोमुखासन करा.
गोमुखासन करताना काय काळजी घ्यावी – Precautions Before Practicing Gomukhasana
गोमुखासन करणं सरावाने तुम्हाला जमू लागेल. मात्र त्यासाठी या आसनाचा सराव करताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. शिवाय तुम्हाला सरावाआधी गोमुखासन म्हणजे का. हे नक्कीच माहीत हवं. (Gomukhasana Marathi Mahiti)
- गोमुखासनाचा सराव करताना सुरुवातीला काही ठिकाणी ताण आल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास जाणवू शकतो. मात्र जर तुम्हाला खांदा, मान, मनगट अथवा पाठीमधून तीव्र आणि असह्य वेदना जाणवल्या तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
- गोमुखासनाचा सराव सकाळी करणं नेहमीच चांगलं, कारण जर तुम्ही हे आसन करण्यापूर्वी कमीत कमी दहा ते बारा तास उपाशी असाल तर याचे जास्तीत जास्त फायदे तुम्हाला मिळू शकतील.
- गोमुखासनाची आदर्श स्थिती गाठणं ही या आसनाचा सतत सराव करून शक्य होईल. पण तोपर्यंत तुम्हाला जितकं शक्य आहे तितकाच ताण घ्या. जास्त त्रास होत असेल तर खूप वेळ आसनस्थितीत राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्यामुळे तुमच्या आरोग्य समस्या वाढू शकतात.
- पहिल्यांदा गोमुखासन करताना नेहमी ते तज्ञ्जांच्या देखरेखीखाली करा. कारण चुकीचे आसन केले तर त्याचा फायदा होण्याऐवजी तोटेच जास्त होऊ शकतात.
- गोमुखासनाचा सराव करताना श्वासावर लक्ष देत सराव करण्याचा प्रयत्न करा.
गोमुखासनाचे फायदे – Gomukhasana Benefits In Marathi
योगासनामधील एक प्रमुख आसन असल्यामुळे या आसनचे अनेक फायदे आहेत. मात्र गोमुखासनाचे फायदे (Gomukhasana Benefits in Marathi) मिळण्यासाठी ते योग्य पद्धतीने करायला हवे.
बॉडी पोश्चर सुधारतो (Improves Body Posture)
गोमुखासन करताना तुमच्या गुडघा, घोटा, छाती आणि खांद्याचे स्नायू ताणले जातात. ज्यामुळे ते मजबूत होतातच शिवाय यामुळे तुमचा संपूर्ण बॉडी पोश्चर सुधारतो. याचं कारण हे आसन करताना तुमच्या शरीरातील जवळ जवळ सर्वच सांधे कार्यरत असतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. शरीराला पुरेसं रक्त मिळाल्यामुळे उत्साह वाढतो. ज्यामुळे भविष्यात घोटा, गुडघा, छाती, पाठ आणि खांद्याला दुखापत होण्याचा धोका टाळता येतो.
सायटिका इनफेक्शन बरे होते (Cures Sciatica Infection)
आजकाल अनेकांना सायटिकाचा त्रास होताना आढतो. सायटिकात कंबरेच्या खालच्या भागात तीव्र वेदना, बधीरपणा अथवा जडपणा येतो. कारण या आजारात दोन मणक्यांमधील असलेल्या डिस्कमध्ये दुखापत होते. मात्र या आजारात होणाऱ्या वेदना या तीव्र स्वरूपाच्या आणि सहन न होणाऱ्या असतात. गोमुखासनात पाठीच्या कण्याला योग्य ताण मिळत असल्यामुळे सायटिकाचा त्रास कमी करता येतो.
किडनीच्या कार्याला चालना मिळते (Stimulates The Kidney)
किडनी म्हणजेच मूत्राशयाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी गोमुखासन करणे नक्कीच फायद्याचे ठरते. अनेक संशोधनात असं आढळून आलं आहे की जे लोक गोमुखासनाचा सराव करतात त्यांना मुतखड्याचा त्रास होत नाही. कारण या आसनाच्या सरावामुळे तुमच्या लघवीद्वारे शरीरातील टॉक्सिन्सचा नीट निचरा होतो. लघवी अथवा मूत्राशयाबाबतच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी गोमुखासन अतिशय उत्तम आहे.
सेक्स लाईफमध्ये सुधारणा (Enhances Sexual Performance)
योगासनांचा अभ्यास करणारे सांगतात की, जर तुम्हाला तुमचे सेक्स लाईफ चांगले असावे असं वाटत असेल तर नियमित गोमुखासनाचा सराव करा. कारण यामध्ये तुमची जननेद्रिंये योग्य प्रमाणात ताणली जातता. सेक्स हॉर्मोन्सच्या निर्मितीसाठी, रक्तप्रवाह सुधारण्यासाठी आणि सेक्स लाईफसाठी हे योग्य ठरते. शिवाय यामुळे तुमच्या मांड्या, नितंब आणि जांघांमधील स्नायूंना चांगला आराम मिळतो. सेक्ससाठी या सर्व अवयवांमधील लवचिकचा फायदेशीर ठरते.
ताणतणाव आणि चिडचिड कमी होते (Relieves Stress and Anxiety)
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामाचा, नातेसंबधांचा अथवा इतर अनेक गोष्टींचा ताण असतो. मात्र जर तुम्ही नियमित गोमुखासन केले तर तुमचा ताण कमी होतो आणि तुमच्या शरीराला चांगला आराम मिळतो. ताण कमी करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक संतुलन राखता येणे आणि रक्तदाब आणि ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहणे गरजेचे असते. गोमुखासनातील तालबद्ध हालचाल आणि श्वासावरील नियंत्रण तुमचा ताण कमी करण्यास मदत करते.
शरीर लवचिक बनते (More Elasticity)
गोमुखासनामध्ये तुमच्या शरीरातील अनेक अवयवांवर जसं की, खांदे, हात, छाती, पोट, नितंब, मांड्या अशा सर्वांगावर ताण येतो. ज्यामुळे या आसनाचा नियमित सराव केल्यास तुमचे शरीर लवचिक आणि मजबूत बनते.
गोमुखासन करण्याचे फायदे – FAQs
प्रश्न – गोमुखासन हे हिप ओपनर आहे का ?
उत्तर – गोमुखासन हे एक उत्तम आसन असून त्यामुळे तुमच्या मांड्या आणि नितंबांवर चांगला ताण पडतो.
प्रश्न – गोमुखासन विविध पद्धतीने करता येते का ?
उत्तर – होय, गोमुखासन करण्याची वर सांगितलेली पारंपरिक पद्धत आहे. मात्र जर तुमच्या एखाद्या अवयवाला दुखापत झालेली असेल तर तज्ञ्ज त्यानुसार थोडे बदल करून या आसनाचा सराव करून घेतात.
प्रश्न – गोमुखासना आधी कोणते आसन करावे ?
उत्तर – योगासनामध्ये एखादे कठीण आसन करण्यापूर्वी पूर्व तयारीची आसने करणं गरजेचं असतं. ज्यामुळे शरीरातील जखडलेले स्नायू शिथील होतात. यासाठी तुम्ही आधी सूर्यनमस्कार अथवा पाय, खांदे, हात आणि पाठीचे काही व्यायाम प्रकार नक्कीच करू शकता.
प्रश्न – गोमुखासन कोण करू शकत नाही ?
उत्तर – ज्यांना खांदा, पाय, मांड्या अथवा हाताला गंभीर दुखापत झालेली आहे असे लोक गोमुखासन नक्कीच नाही करू शकत. त्यामुळे तज्ञ्जांच्या सल्लानुसार गोमुखासनाचा सराव करावा.
Conclusion – गोमुखासन हे शरीर आणि मन निरोगी राखणारे एक परफेक्ट आसन आहे. त्यामुळे वर दिलेल्या माहितीनुसार (gomukhasana information in marathi) या आसनाचा सराव करा आणि त्याचे तुम्हाला झालेले फायदे आमच्यासोबत नक्की शेअर करा.