‘या’ अभिनेत्रीने समुद्रकिनारी बिकनीत शेअर केल्या हॉट योगा पोझ

‘या’ अभिनेत्रीने समुद्रकिनारी बिकनीत शेअर केल्या हॉट योगा पोझ

एफ. आय. आर फेम चंद्रमुखी चौटाला म्हणजेच ‘कविता कौशिक’ सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. एकेकाळी एफ. आर. आय. ही कॉमेडी मालिका प्रेक्षकांना फारच आवडत होती. ज्यामुळे त्या मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहेत. कविता कौशिकने या मालिकेत एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. पोलिसांच्या वर्दीतील कविताने साकारलेली चंद्रमुखी चौटालाने टेलिव्हिजनवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. कविता आता मात्र तिच्या फिटनेसमुळे पुन्हा लोकप्रिय होत आहे. सोशल मीडियावर कविता सतत तिच्या योगा पोझेस शेअर करत असते. नुकतंच कविताने तिचे बिकनीमधील काही हॉट फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती समुद्र किनारी बिकनीत योगा करताना दिसत आहे. आजकल फिटनेसबाबत सर्वजण फारच जागरुक झालेले आहेत. आजच्या पिढीला अशा हॉट योगा पोझ नक्कीच आकर्षित करतात. कविताने समुद्रकिनाऱ्यावरून शेअर केलेल्या या हॉट योगा पोझेस सध्या तरूणाईला भुरळ घालत आहेत. ज्यामुळे तिचे हे हॉट फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर कविता ठरत आहे फिटनेस फ्रिक

कविता कौशिकने आतापर्यंत अनेक हिंदी मालिकांमधून काम केलेलं आहे. कहानी घर घर की, अरे दिवानो मुझे पहचानो, दिल क्या चाहता है, घर एक सपना आणि एफ. आर. आय. अशा मालिकांमधून तिने काम केलं होतं.  मात्र सध्या कविता अभिनय क्षेत्रापासून दूर गेलेली दिसतआहे. ज्यामुळे तिने तिच्या फिटनेसवर जास्त लक्ष केंद्रित केलं आहे. लाईम लाईटमध्ये नसूनही कविताचा सोशल मीडियावर एक खास चाहता वर्ग आहे. ज्यामुळे तिच्या सोशल मीडियावरील फोटोजनां चांगली पसंती मिळत आहे. 

असं आहे कविताचं वैयक्तिक जीवन

कविता काही वर्षांपूर्वी अभिनेता नवाब शहासोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर तिने रोनित बिस्वाससोबत विवाह केला. त्याआधी ते दोघं एकमेकांना अनेक वर्ष डेट करत होते. कविता आणि रोनित याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. सोशल मीडियावरील त्यांचे फोटो या प्रेमाची नेहमीच साक्ष देतात. रोनितसोबत योगा करताना कविता तिचे फोटो शेअर करत असते. रोनित आणि  कविता फिटनेसबाबत एवढे जागृत असूनही त्या दोघांनी लग्नानंतर आईबाबा होण्याचा विचार केलेला नाही. याबाबत कविताचं म्हणणं स्पष्ट आहे. तिला आता या वयात बाळाला जन्म द्यायचा नाही. कारण ती सध्या चाळीशीच्या पुढे गेलेली आहे. या वयात ती बाळाचे योग्य संगोपन करू शकत नाही. कारण तच्या मते आता जर तिला बाळ झालं तर त्या बाळाच्या किशोरवयात ती स्वतः म्हातारी झालेली असेल. असं करून तिला एका निष्पाप जीवावर अन्याय करायचा नाही. ज्यामुळे या वयात ती आई होण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. मात्र असं असलं तरी स्वतःच्या शरीर आणि फिटनेसबाबत ती नेहमीच जागृत आहे. स्वतःला फिट ठेवण्यासाठी  ती निरनिराळ्या योगासनांचा सराव करत असते. तिच्या या योगापोझ पाहून तिचे चाहते देखील फिटनेसबाबत जागरूक होतील असं तिला वाटत आहे. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम  

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

अक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज'मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर

अभिनेत्री हिना खानच्या व्हायरल व्हिडिओने फॅन्स हैराण

शाहरूखने चाहत्याला सांगितले आपल्या 'मन्नत' बंगल्याच्या एका रूमचे भाडे, जिंकले मन