FIRST LOOK : अक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज'मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर

FIRST LOOK : अक्षय कुमारचा सिनेमा 'पृथ्वीराज'मध्ये अशी दिसणार मानुषी छिल्लर

मिस वर्ल्‍ड मानुषी छिल्‍लर (Manushi Chhillar) लवकरच बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत पर्दापण करणार आहे. मानुषी सध्या बहुचर्चित आगामी सिनेमा ‘पृथ्‍वीराज’ (Prithviraj)च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) मुख्य भूमिकेत आहे. राजा पृथ्‍वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित या सिनेमामध्ये मानुषी छिल्‍लर त्यांची पत्‍नी संयोगिता यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारताना दिसणार आहे. नुकतंच मानुषी छिल्लरनं सिनेमातील आपला लुक शेअर केला आहे. मानुषीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत लिहिलं आहे की, संयोगिता #पृथ्‍वीराज (Sanyogita #Prithviraj). अक्षय कुमारसोबत मोठ्या बॅनर अंतर्गत बॉलिवूड सिनेमामध्ये झळकणाऱ्या मानुषीनं आपला आनंद जाहीररित्या व्यक्त केला आहे.

(वाचा : परी म्हणू की सुंदरा ! 'मलंग गर्ल' दिशा पटानीचं लेटेस्ट फोटोशूट व्हायरल)

View this post on Instagram

Sanyogita #Prithviraj

A post shared by Manushi Chhillar (@manushi_chhillar) on

माझ्यासाठी अभिमानास्पद बाब - मानुषी छिल्लर

'पृथ्वीराज' सिनेमासंदर्भात प्रतिक्रिया देताना मानुषी म्हटलं होतं की, ‘यशराज फिल्मसारख्या प्रोडक्शन हाउसनं त्यांच्या सिनेमासाठी प्रमुख अभिनेत्री म्हणून माझी निवड केली, ही माझ्यासाठी सन्मान आणि अभिमानाची बाब आहे. या प्रवासादरम्यान शिकण्यास मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टी प्रति मी आनंदीत आणि उत्साहीत आहे. मला माझं आयुष्य अगदी एखाद्या परीकथेप्रमाणे भासत आहे. सुरुवातीस मिस इंडिया, त्यानंतर मिस वर्ल्ड आणि आता बॉलिवूड पर्दापणातच एवढा मोठा प्रोजेक्ट मिळणं म्हणजे माझ्या आयुष्यातील एक थरारक गोष्ट आहे’. या ऐतिहासिक सिनेमामध्ये अक्षय कुमार (Akshay Kumar) पृथ्‍वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे. ‘पृथ्वीराज’ या सिनेमाची कथा पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे.  पृथ्वीराज आणि संयोगिता यांची प्रेमकहाणी तर अजरामर आहे. 2020 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

(वाचा : पद्मा लक्ष्मीनं सांगितलं फिटनेसचं रहस्य, 49व्या वर्षातही असं ठेवा स्वतःला हॉट)

अशी झाली मानुषीची निवड

‘पृथ्वीराज ’या बिग बजेट सिनेमाचं दिग्दर्शन डॉक्टर चंद्रप्रकाश द्विवेदी करणार आहेत. यापूर्वी द्विवेदींनी दूरदर्शनवरील मालिका ‘चाणक्य’, सिनेमा ‘पिंजर’ आणि मोहल्ला ‘अस्सी’चं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाबाबत द्विवेदी यांनी सांगितलं की, ‘पृथ्वीराज सिनेमासाठी आम्ही अतिशय सुंदर भारतीय तरुणीच्या शोधात होतो. यासाठी कित्येक तरुणींच्या ऑडिशन्स देखील घेण्यात आल्या. ‘संयोगिता’चं सौंदर्य मोठ्या पडद्यावर दर्शवण्यासाठी आम्हाला मानुषीच योग्य वाटली. ‘संयोगिता’ अतिशय सुंदर होती, आत्मविश्वासानं भरलेली होती. तिच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाला साजेशा अशा तरुणीच्या शोधात आम्ही होतो. ‘संयोगिता’च्या व्यक्तिमत्त्वाशी मिळतेजुळते गुण आम्हाला मानुषीमध्ये आढळले आणि आमचा शोध पूर्ण झाला'.

(वाचा : समंदर में नहाकर..., दिशा पटानीचा बिकिनीतील मादक फोटो व्हायरल)

‘संयोगिता’च्या भूमिकेसाठी मानुषी घेत आहे विशेष प्रशिक्षण

पुढे त्यांनी असंही सांगितलं  की, ‘मुख्य भूमिकेसाठी मानुषीची केलेली निवड निश्चित करण्यासाठी आम्ही तिची अनेकदा ऑडिशन्स घेतल्या. संयोगितासाठी आम्ही तिची केलेली निवड योग्यच असल्याचं मानुषीनं प्रत्येक ऑडिशनमधून सिद्ध केलं. यानंतर प्रत्येक आठवड्यातील सहा दिवस तिनं सराव करण्यास सुरुवात केली आहे. यशराज फिल्म्सची टीम या सिनेमासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून मानुषीला विशेष प्रशिक्षण देत आहे. 

अशी ठरली मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड 2017

चीनमधील सान्या येथे जगभरातून आलेल्या 130 सौंदर्यवतींमध्ये मिस वर्ल्ड 2017 स्पर्धा पार पडली होती. अवघ्या 21 वर्षांच्या मानुषीला परीक्षकांनी एक प्रश्न विचारला आणि त्यावरील तिचं उत्तर ऐकून सर्वच जण भारावून गेले. जगात सर्वात जास्त पगार आणि आदर कोणत्या प्रोफेशनला मिळायला पाहिजे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली की, 'माझ्या मते आईला आदर आणि प्रेम मिळायलाच पाहिजे. पगारापेक्षाही तुम्ही तिला जास्त प्रेम दिले पाहिजे. जगातील प्रत्येक आई तिच्या मुलांसाठी असंख्य तडजोड करत असते. त्यामुळे माझ्या मते ‘आई’ हे एक असं प्रोफेशन आहे, जिला सर्वात जास्त आदर आणि पगार असायला हवा'. मानुषीच्या या उत्तरानं उपस्थितांची मनं जिंकली.

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.