‘अप्सरा आली’, साडीमधील सोनालीच्या मनमोहक अदा

‘अप्सरा आली’, साडीमधील सोनालीच्या मनमोहक अदा

सोनाली कुलकर्णी हे नाव घेतलं की, डोक्यात सर्वात पहिले गाणं येतं ते म्हणजे ‘अप्सरा आली’. महत्वाचं म्हणजे हे गाणं डोक्यात का येऊ नये? सोनालीच्या अदा नक्कीच अप्सरेपेक्षा कमी नाहीत. सोनाली सोशल मीडिया अकाऊंडवर नेहमीच अॅक्टिव्ह असते. बऱ्याचदा आपण पाहिलं तर सोनालीचा साडीतील लुक आपल्याला दिसून येतो. सध्या सोनालीने साडीतील दोन लुक पोस्ट केले आहेत. त्यापैकी एक आहे ती म्हणजे कॉटन पैठणी साडी आणि दुसरा लुक म्हणजे सौंदर्याचा कहरच! विस्कटलेला आंबाडा आणि भारदस्त नथीमधील सोनालीच्या या लुकने केवळ चाहत्यांनाच नाही तर अगदी तिच्या इंडस्ट्रीतील मित्रमैत्रिणींनाही तिच्या सौंदर्याची दखल घ्यायला भाग पाडली आहे असं म्हणावं लागेल.

विस्कटलेला आंबाडा आणि भारदस्त नथ

सोनालीने नुकताच लाल साडीमधील आपला एक लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर तोंडातून वाह असा शब्द निघाला नाही तर नवलच. आपल्याकडे साडी ही फॅशन कधीच जुनी होत नाही. पण साडी कशी योग्यरित्या कॅरी करायची आहे आणि त्यावर नक्की कसा लुक करायचा आहे हे जास्त महत्वाचं ठरतं. याबाबत सोनाली कुलकर्णीच्या मनमोहक अदा अधिक सरस ठरतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘जरतारी साडी लाल गं’ असे कॅप्शन देत सोनालीने आपले तीन मनमोहक फोटो पोस्ट केले असून या फोटोजना अनेक लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. सोनालीची स्टायलिस्ट चैताली कुलकर्णीने तिला इतके सुंदर दिसण्यासाठी मदत केली आहे. सोनालीची ही अदा आणि पैठणी दोन्ही मनात भरल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

माझी बाजू कोणालाच नाही माहीत, पहिल्यांदाच अंकिता बोलली ब्रेकअपबाबत

कॉटन पैठणीतील मराठमोळा साज

लाल साडीआधी गडद निळ्या चंद्रकला पैठणी साडीमध्ये सोनालीच्या सौंदर्याचा मराठमोळा साज वाढला आहे. त्यावर घातलेले मोत्याचे दागिने आणि कपाळावरील अगदी मराठमोळी टिकली आणि कुंकू असा साज सोनालीकडे पाहातच राहावं असा आहे. एका सन्मान सोहळ्यासाठी सोनालीने केलेला हा लुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. साडीमध्येही सुंदर दिसता येतं हे सोनाली नेहमीच दाखवून देते. अगदी जुन्या पद्धतीचा ब्लाऊज आणि त्यावर आधुनिकतेचा साज असा सुंदर लुक सोनालीने केला आहे. 

दीपिका पादुकोणच्या 'द्रौपदी'नंतर रणवीर सिंह साकारणार आता सूर्यपुत्र 'कर्ण'

सोनालीचे साडीप्रेम

सोनाली कुलकर्णीने ‘हिरकणी’ हा चित्रपट केला आणि त्याच्या प्रमोशनलादेखील सोनाली विविध साड्यांमध्ये दिसून आली. सोनालीचे साडी कलेक्शन बघून कोणत्याही स्त्री चाहतीला नक्कीच हेवा वाटेल. सोनालीच्या साडी कलेक्शनमध्ये अगदी पैठणीपासून ते डिझाईनर साड्यांपर्यंत सर्व साड्या दिसून येतील. अगदी नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यातही सोनालीने साडी नेसली होती. सोनालीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तुम्हाला साडीसाठी कोणतीही फॅशन करायची असेल अथवा लुक हवा असेल तर तुम्ही नक्कीच पाहू शकता. सोनालीने साडीच्या इतक्या वेगवेगळ्या स्टाईल्स कॅरी केल्या आहेत की तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमासाठी तिचा लुक नक्कीच परिधान करता येईल. तसंच साधा पण तरीही तितकाच वेधून घेणारा असा सोनालीचा लुक असतो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणजेच सुंदर दिसण्यासाठी नेहमीच गॉडी आणि गडद लुकची गरज नाही हे सोनालीने दाखवून दिले आहे. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'आनंदी गोपाळ'ची बाजी

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक