ADVERTISEMENT
home / आपलं जग
#sareetwitter हॅशटॅगला मागे टाकून मुंबई पोलिसांचा ‘हा’ हॅशटॅग होतोय ट्रेंड

#sareetwitter हॅशटॅगला मागे टाकून मुंबई पोलिसांचा ‘हा’ हॅशटॅग होतोय ट्रेंड

सोशल मीडियाच्या या काळात रोज कोणता ना कोणता तरी नवीन हॅशटॅग किंवा चॅलेंज रोज ट्रेंड होत असतं. अनेकजण सोशल नेटवर्किंग साईट्सवर तासंतास वेळ घालवताना दिसतात. मग ते तरूण असोत वा मध्यमवयीन असोत वा म्हातारे असोत. सगळ्यांनाच आजकाल फेसबुक, इन्स्टा आणि ट्विटरचे अपडेट पाहिल्याशिवाय चैन पडत नाही. एखाद्याने एक व्हिडिओ शेअर केला की, लगेच बाकीचेही तो व्हिडिओ शेअर करू लागतात. सोशल मीडियावरील काही ट्रेंड्सने तर अनेकजण रातोरात फेमस झाले आहेत. पण या ट्रेंड्समध्ये आणि हॅशटॅगमध्ये कधी कधी काहीतरी चांगलंही घडतं. 

#sareetwitter हॅशटॅगला टक्कर

सध्या ट्विटरवर #sareetwitter हा हॅशटॅग ट्रेंड करतोय. या आधी आलेला #BottleCapChallenge हा हॅशटॅग तुम्हाला आठवतोय का, असो सोशल मीडियामध्ये सतत काही ना काही व्हायरल होतच असतं. आपण तरी किती लक्षात ठेवणार.

नौवरी साडीच्या प्रकारांबद्दलही वाचा

तर गेल्या दोन दिवसात #sareetwitter हॅशटॅग चांगलाच ट्रेंड करत होता. अनेक बॉलीवूड आणि मराठी सेलिब्रिटीजनी हा हॅशटॅग असलेले फोटोजही सोशल मीडियावर शेअर केले. अनेक महिलांनीही आपले साडीतील फोटोज शेअर केले. 

ADVERTISEMENT

अभिनेता आयुषमान खुरानानेही #sareetwitter हॅशटॅगच्या ट्रेंडमध्ये साडीचा पदर घेतलेला फोटो टाकत उडी घेतली.

त्यानंतर अचानक या हॅशटॅगची खिल्ली उडवत ट्विटरवर #KurtaTwitter आणि #JhumkaTwitter हे हॅशटॅग व्हायरल होऊ लागले. ज्यामध्ये अनेक पुरूषांनी त्यांचे कुर्त्यातील फोटो शेअर केले.

#sareetwitter हॅशटॅगला सडेतोड हॅशटॅग

या सगळ्या ट्रेंडमध्ये मुंबई पोलिसांनी मात्र एक अर्थपूर्ण आणि अभिमानास्पद हॅशटॅग सुरू केला. जो खरोखरच ट्रेंड करण्यासारखा आहे. हा हॅशटॅग आहे #KhakiSwag आणि #KhakiTwitter. जो खऱ्या अर्थाने शेअर करण्याचा हॅशटॅग आहे.

एवढंच नाहीतर मुंबई पोलिसांनी देशभरातील पोलिसांना हा हॅशटॅग वापरून फोटो शेअर करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे देशभरातील पोलिसही याला चांगलाच प्रतिसाद देत आहेत.

ADVERTISEMENT

खरंच सोशल मीडियाचा वापर जर योग्यरित्या केला तर काही अर्थपूर्ण गोष्टीही होतात. फक्त हे माध्यम कसं आणि कशासाठी वापरायचं आहे, हे आपण ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं?

18 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT