Akash-Shloka Pre Wedding: आकाश-श्लोकाच्या प्रि-वेडींग सेलिब्रेशनचे खास फोटोज आणि व्हीडिओ

Akash-Shloka Pre Wedding: आकाश-श्लोकाच्या प्रि-वेडींग सेलिब्रेशनचे खास फोटोज आणि व्हीडिओ

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं प्रि-वेडींग सेलिब्रेशन सध्या जोरदारपणे स्वित्झर्लंडमधील सेंट मोरिट्ज इथल्या सर्वात महागड्या बडरुट पॅलेस (badrutt palace) येथे सुरू आहे. या सेलिब्रेशनचे फोटोजही सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. लेकसमोर असणाऱ्या या हॉटेलमधील एका रुमचा कमीतकमी खर्च 98,500 रूपये एवढा आहे. तर महागड्या सूटचा खर्च तब्बल 3,08,939 एवढा आहे.


 
 

 

 


View this post on Instagram


 

 

The locals too are loving the party as you. An hear from their cheer. #Akashambani #shlokamehta ❤️❤️❤️


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
एका व्हिडीओमध्ये आकाश अंबानी आपल्या होणारी बायको श्लोका मेहतासोबत बग्गीमधून येताना दिसत आहे.


52367752 383775852452018 1307931214525388374 n


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताचा हा फोटो त्यांच्या रॉयल एंट्रीचा आहे. या फोटोमध्ये आकाश आणि श्लोका पांढऱ्या रंगाच्या बग्गीमध्ये बसून सेलिब्रेशनच्या ठिकाणी एंट्री घेत आहेत. या खास प्रि-वेडींग सेलिब्रेशनसाठी आकाश अंबानीने मरून रंगाचं जॅकेट आणि निळ्या रंगाची जीन्स घातली होती. तर श्लोकाने ब्लॅक- ग्रे रंगाचं फर जॅकेट आणि पांढऱ्या रंगाच्या स्कर्टमध्ये दिसत आहे.

दो दिवस चालणाऱ्या या सेलिब्रेशनची थीम विंटर वंडरलँड आहे.
 

Hit like if you wish you were there right now!


A post shared by AkashWedsShloka (@akashwedsshloka) on
या सेलिब्रेशनसाठी हा व्हेन्यू विंटर कार्निवलसारखा सजवण्यात आला आहेखास पद्धतीने दिली प्रेमाची कबुली
 

Lovely display in the sky #akashambani #shlokamehta 🎥 @_marcohartmann_


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या प्रि-वेडींग सेलिब्रेशन्सच्या पहिल्या दिवशीची हाईलाईट ड्रोन शो होता. या ड्रोन शोचे एकापेक्षा एक व्हीडीओज समोर येत आहेत. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या व्हीडीओजमध्ये ड्रोनच्या मदतीने आकाशात असा रोमँटीक हार्ट शेप बनवण्यात आला होता.


52385048 139680657068676 5179088369647424654 n


51623768 297614367584030 5275019490771531543 n


51863909 2241620242777126 6575127411072028673 n


आता एवढं ग्रँड सेलिब्रेशन सुरू आहे म्हटल्यावर बॉलीवूड सेलेब्स कसे मागे राहतील. या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीजही सामील झाले आहेत. या सेलेब्समध्ये करण जोहर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर आणि मलाइका अरोराचा समावेश आहे.   800 लोकांची गेस्ट लिस्ट

आकाश अंबानीचं हे प्रि-वेडींग सेलिब्रेशन स्वित्झर्लंडमध्ये असलं म्हणून काय झालं. एवढ्या लांब असूनही या सेलिब्रशेनमध्ये तब्बल 500 ते 800 पाहूणे सामील झाले आहेत. या फंक्शनमध्ये पीटर पॅन आइस शो झाला. त्यानंतर तब्बल दहा मिनिटं ड्रोन शो झाला. पाहुण्यासाठीही खास स्टॉल लावण्यात आले आहेत.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Firecracker show done right! 💯 #ambanipreweddingcelebrations


A post shared by AkashWedsShloka (@akashwedsshloka) on
याशिवाय आकाश अंबानीची बॅचलर पार्टीही इथे होणार आहे. तर 8 मार्चला होणाऱ्या संगीतमध्ये प्रसिद्ध अमेरिकन पॉप रॉक बँड ‘मरून 5’ परफॉर्म करणार आहे.शाही लग्न आणि रिसेप्शन्स


51359128 429830807755631 5358218520782392246 n


आकाश अंबानी श्लोकासाठी 9 मार्चला मुंबईतील जियो गार्डनमध्ये वरात घेऊन येणार आहे. लग्नानंतर 10 मार्चला लग्नाचं पहिलं रिसेप्शन होईल. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड आणि उद्योगजगतातील प्रसिद्ध चेहरे सामील होतीलच. त्यानंतर 11 मार्चला दुसरं रिसेप्शन होणार आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेही वाचा -


आकाश अंबानी आणि श्लोकाच्या लग्नाचं ‘मंगल पर्व’ पत्रिका व्हायरल


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात