भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा 'सिंपल' लुक

भारत चित्रपटामध्ये कतरिना कैफचा 'सिंपल' लुक

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफच्या ग्लॅमरस लुकचे अनेक चाहते आहेत. कतरिना सध्या सलमान खानसोबत भारत चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच कतरिनाने तिचा भारतच्या सेटवरील एक फोटो इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये कतरिनाचा लुक नेहमीपेक्षा वेगळा आहे. कतरिना यात हलक्या पिच रंगाची साडी नेसली असून तिची केसभूषा कर्ली ठेवण्यात आली आहे. अगदी साधा पण सुंदर अशा लुकमध्ये कतरिनाचे मुळे सौंदर्य खुलून दिसत आहे. त्यामुळे सध्या कतरिनाच्या या 'सिंपल' लुकची सोशल मीडियावर फार चर्चा होत आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खूप आवडला आहे. कारण आतापर्यंत कतरिनाचा ग्लॅमरस लुकच प्रेक्षकांनी पाहिला आहे. कतरिना पहिल्यांदाच इतक्या साध्या आणि सुंदर लुकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’मध्ये कैतरिना सलमानखानच्या गर्लफ्रेन्डची भूमिका साकारणार आहे. ‘भारत’ चित्रपटामध्ये हिंदुस्तानच्या सत्तर वर्षांचा इतिहास दाखविण्यात येणार आहे. सलमान खान यामध्ये वीस वर्षापासून साठ वर्षांपर्यंतच्या पाच विविध भूमिका असणार आहेत. त्यामुळे कतरिना कैफही निरनिराळ्या लुकमध्ये दिसणार आहे. सध्या कतरिनाच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या 'सिंपल' लुकमुळे आणि सलमान खानसोबत ती पुन्हा काम करत असल्यामुळे या चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

ओन सेट 4 भारत


A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on
भारतच्या टीझरमधील सलमानची  दमदार एंट्री


बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या ‘भारत’ची चर्चा सर्वत्रच सुरू आहे. जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिना निमित्ताने भारत चित्रपटाचं टीझर रिलीज करण्यात आलं. या टीझरमधील सलमानची दमदार एंट्री आणि जबरदस्त डायलॉगमुळे चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली होती. भारत जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. भारतमध्ये कतरिनासोबतच अभिनेता जॅकी श्रॉफ, तब्बू, आणि दिशा पटनी अशी स्टारकास्ट असणार आहे. भारत चित्रपट देशप्रेमावर आधारित असून या चित्रपटात भारताच्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंतची कहाणी दाखवली जाणार आहे. सलमानच्या जबरदस्त संवादाने आणि एंट्रीने या टीझरमधून चित्रपटाची कल्पना येतच आहे. पुन्हा एकदा अली अब्बास जफर, कतरिता आणि सलमान खान हे त्रिकूट या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येत असून आतापर्यंत या त्रिकूटाने केलेल सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्यामुळे या चित्रपटकडूनही प्रेक्षकांना खूपच अपेक्षा आहेत. दमदार टीझरनंतर आता भारतच्या ट्रेलरकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Subscribe to POPxoTV

भारत सलमान - कतरिनाचा सहावा चित्रपट


सलमान आणि कतरिनाची जोडी नेहमीच हीट जोडी ठरते. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडते. सलमान आणि कतरिनाने यापूर्वी पाच चित्रपटात एकत्र काम केले असून या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात.  मैंने प्यार क्यू किया, पार्टनर, टायगर, टायगर जिंदा है, युवराज या पाचही चित्रपटांमध्ये यापूर्वी या जोडीने  एकत्र काम केलं होतं. आता भारत हा त्या दोघांचा एकत्र काम करत असलेला सहावा चित्रपट असणार आहे.


bharat salman


आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या लग्नाआधीच्या विधींना सुरूवात


सप्टेंबरमध्ये 'झुंड'मधून नागराज उलगडणार फुटबॉलपटूचं जीवनविश्व


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम