आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म

आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म

हिंदी चित्रपटात उत्तम अभिनेत्रींच्या यादीत आलिया भटचे नाव आवर्जून घेतले जाते. कारण तिने उडता पंजाब, लव्ह यु जिंदगी, बद्री की दुल्हनिया, राझी असे काही चांगले चित्रपट केले आहेत. तिच्या नावाचा दबदबा ओळखूनच बाहुबलीच्या मेकर्सनी तिला एका चित्रपटासाठी साईन केल्याचे कळत आहे. एस.एस. राजमौली यांनी स्वत: आलियाकडून ही फिल्म साईन करुन घेतली असून बाहुबलीप्रमाणेच हा एक बीग बजेट सिनेमा असणार आहे. त्यामुळे आता आलियाला हिंदी चित्रपटातील बाहुबली होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.


बाहुबलीमधील शिवगामी करणार पॉर्नस्टारचे काम


चित्रपट कोणता?


बाहुबलीच्या यशानंतर एस.एस.राजमौली यांना खूप प्रसिद्धी मिळाली. ज्या बाहुबलीच्या स्क्रिप्टला बॉलीवूडमधील अभिनेत्यांनी नाकारले होते. त्यांना बाहुबलीच्या यशानंतर नक्कीच पश्चाताप झाला होता. त्यामुळे आता राजमौली कोणता नवा चित्रपट घेऊन येणार ही उत्सुकता सगळ्यांनाच होती पण ही लॉटरी आलियाला लागली आहे. कारण आलियाने एस.एस. राजमौली यांचा रामा रावणा राज्यम (RRR) ही फिल्म साईन केली आहे. या चित्रपटाची औपचारिक घोषणा अद्याप करण्यात आली नसली तरी हा चित्रपट आलियाने फायनल केला आहे असे कळत आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

ACTION!! The first shot of the MASSIVE MULTISTARRER has been DONE. #RRRShootBegins @jrntr #RamCharan @ssrajamouli #RRR @dvvmovies


A post shared by RRR Movie (@rrrmovie) on
बाहुबलीपेक्षाही ग्रँड चित्रपट


बाहुबली या चित्रपटाने इतिहास रचला. देशातच नाही तर परदेशातही हा चित्रपट चांगलाच चालला. रामा रावणा राज्यम हा चित्रपटही बीग बजेट आहे. ३०० इतके या चित्रपटाचे बजेट असून हैदराबादमध्ये या चित्रपटाचा नुकताच मुर्हुत करण्यात आला. आलियाच नाही तर या चित्रपटात अजय देवगणदेखील असणार आहे असे कळत आहे. या शिवाय प्रमुख भूमिकेत आलिया सोबत रामचरण आणि रामाराव ज्युनिअर यांचा विचार केला जात आहे.  हा चित्रपट १९२० च्या काळातील आहे. त्यामुळे तशापद्धतीचा सेट उभारण्याचे काम हैदराबादमध्ये सध्या सुरु आहे. या चित्रपटात बॉलीवूडमधील आणखी किती कलाकार असणार या बद्दल काहीच अधिक माहिती देण्यात आलेली नाही. शिवाय बाहुबलीप्रमाणे हा चित्रपट धर्मा प्रोडक्शन हिंदीत आणणार का? या बद्दलही अधिक माहिती नाही. पण हा चित्रपटही सुपरडुपर हिट असेल असे म्हटले जात आहे. 


प्रियांका-नीकच्या घरी नव्या पाहुण्याचं स्वागत

आलिया कलंकमध्ये व्यग्र


गली बॉयनंतर आलियाला उसंत नाहीए. कारण लगेचच ती करण जोहरच्या कलंकमध्ये बीझी झाली आहे. वरुण धवन, माधुरी दिक्षित, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर अशी स्टार कास्ट या चित्रपटात आहे.कालच या चित्रपटाता टीझर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी दीक्षित पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. कलंक हा चित्रपटदेखील १९४० ची गोष्ट आहे. त्यामुळे आलिया एका मागोमाग एक चांगले पिरियॉडिक चित्रपट करतेय. त्यामुळे तिला चांगल्या चित्रपटांची एकप्रकारे लॉटरी लागली असे म्हणायला हवे. 


कलंकमुळे माधुरी आणि संजय पुन्हा एकत्र

Subscribe to POPxoTV

नाही बनणार बाहुबली ३


आता बाहुबली फॅनसाठी निराशाजनक गोष्ट अशी की, बाहुबलीचा तिसरा भाग येण्याच्या प्रतिक्षेत तुम्ही असाल तर तसे काहीच होणार नाही. कारण स्वत: राजमौली यांनी  बाहुबली हा चित्रपट संपला आहे असे सांगितले. ही कथा दोन भागांपुरती होती त्यामुळे ती वाढण्याची शक्यता नाही. पण तुम्हाला माहीत असेलच की, शिवगामी या कॅरेक्टरवर आधारीत एक १० भागांची वेबसीरिज येणार आहे. जी एस.एस.राजामौलीच करणार आहेत.

(सौजन्य -Youtube,Instagram)