बिग बी आणि तापसीच्या ‘बदला’चं ट्रेलर प्रदर्शित

बिग बी आणि तापसीच्या ‘बदला’चं ट्रेलर प्रदर्शित

बदला चित्रपटाचं नुकतचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलं. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरवरून पुन्हा 'पिंक' या चित्रपटाची पुनरावृत्ती होणार की काय असं वाटत आहे. ट्रेलरची सुरूवात महानायकाच्या भारदस्त आवाजातील संवादाने होते. “ बदला लेना हरबार सही नही होता... लेकीन माफ करना भी हरबार सही नही होता.” या चित्रपटात अभिताभ बच्चन 'बादल गुप्ता' या वकीलाची भूमिका साकारत आहेत. या वकीलाने चाळीस वर्षात एकही केस हरलेली नाही. पिंकप्रमाणेच यामध्येही तापसी पन्नू गुन्हेगार महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. मर्डर, सस्पेंस आणि विवाहबाह्य संबंध यावर आधारित या चित्रपटाचं कथानक असण्याची शक्यता आहे. बदला चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करत आहे. सुजॉय गुढ आणि रहस्यमय चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे या चित्रपटातून काहीतरी वेगळं प्रेक्षकांना पाहता येण्याची शक्यता आहे. 8 मार्च 2019 ला बदला ही मर्डर मिस्ट्री प्रदर्शित होत आहे. बदला चित्रपट The Invisible Guest या स्पॅनिश चित्रपटाचा रिमेक आहे.बदला 'पिंक'ची पुनरावृत्ती असण्याची शक्यता


बदला चित्रपटात महानायक अमिताभ आणि बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा हा एकत्र भूमिका असलेला दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या दोघांनी ‘पिंक’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यामुळे बदला हा चित्रपट पुन्हा पिंक चित्रपटाची पुनरावृत्ती तर नाही ना अशी चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

जाणून घ्या किंग खानची बदलामध्ये कोणती आहे भूमिका ?


शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्टमेंट आणि अजूर एंटरटेन्टमेंट प्रस्तूत ‘बदला’ या चित्रपटाची निर्मिती एल वन लिमीटेडने (AEL ONE LTD (UK) केली आहे. गौरव वर्मा या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लुक कालच प्रदर्शित करण्यात आला. या फर्स्ट लुकसोबतच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किंग खान आणि बिग बी यांच्यात ट्विटरवर एक बनावट हमरातुमरी पाहायला मिळाली. शाहरूख खाने त्याच्या ट्विटर अकाउंटवर अमिताभ बच्चन यांना आव्हान देणारं वाक्य शेअर केलं होतं. शाहरूख ने बिग बी यांना “मी बदला घ्यायला येत आहे बच्चन साहेब तुम्ही तयार रहा” असं म्हटलं होतं. शाहरूखच्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ माजली होती. शिवाय या दोन सूपरस्टारमध्ये नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता मात्र यावर बिग बींनी शाहरूखला  “अरे बदला घेण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली आता सर्वांना बदला द्यायची वेळ जवळ आली आहे” असं प्रतिउत्तर दिलं. ज्यामुळे चाहत्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला. बदलामधून बॉलीवूडचे हे सूपरस्टार पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहायला मिळणार असल्याचं वाटल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या चित्रपटात शाहरूख अभिनय करत नसून केवळ त्याची रेड चिलीज एन्टरटेन्टमेंट ही निर्मिती संस्था या चित्रपटाची निर्मिती करत असल्याचं आता उघड झालं आहे. अधिक वाचाः


‘या’ चित्रपटामध्ये दुनियादारी फेम संजय जाधव साकारणार नकारात्मक भूमिका


अभिनेत्री मृण्मयी कोलवालकर करणार ‘एंड काउंटर’


प्रेक्षकांना बेफिकर व्हायला लावतोय 'आम्ही बेफिकर'


फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम