अनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ

अनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ

अनुष्का आणि विराटच्या प्रेमाबद्दल जितके सांगू तितके कमी आहे.नुकताच त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अनुष्का आणि विराट त्यांची एक टूर एन्जॉय करताना दिसत आहे. ही टूर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी केली अशी सुत्रांनी माहिती दिली असून दोन महिन्यांनंतर त्यांचा हा क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. लग्नानंतर विराट आणि अनुष्का वेळ मिळेल तेव्हा फिरत असतात. त्यांच्या न्युझीलंड दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचे देखील कळत आहे.


अखेर मलायकाने अर्जुनसोबतच्या लग्नाचा केला खुलासा


अनुष्काने घेतला विराटचा गालगुच्चा


सेलिब्रिटी लग्नाला सुरुवात करणारे अनुष्का- विराट यांच्या लग्नाला नुकतेच वर्ष पूर्ण झाले आहे. विराटच्या मॅचेस आणि अनुष्काच्या शुटींगच्या वेळा सांभाळून परदेशवारी करत असतात. त्यांचा क्वालिटी टाईम ते चांगला घालवत असतात. हा व्हिडिओ इयर एंड दरम्यानच्या आहे. अनुष्का झीरोच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होती. तर विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता.चित्रपटाचे प्रमोशन संपल्यानंतर अनुष्का विराटला भेटायला थेट ऑस्ट्रेलियामध्ये गेली. त्यानंतर दोघांनी थेट ऑस्ट्रेलिया गाठले. त्यावेळी त्यांनी स्पीड बोडचा आनंद लुटला. या व्हिडिओमध्ये अनुष्का स्पीड बोट चालवण्याचा प्रयत्न करत आहे आणि विराट अनुष्काकडे कुतूहलाने पाहत आहे. स्पीड बोटच्या स्टेरिंगवरुन हात काढल्यानंतर अनुष्का हबी विराटकडे पाहून इतकं गोड असते. इतकचं नाही तर त्या व्हिडिओत ती तिच्या डार्लिंग हबीचा गालगुच्चा घेत आहे. ज्यामुळे अनेकांच्या तोंडून Aww आल्यावाचून राहात नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

#viratkohli #anushkasharma ❤️❤️❤️😍


A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
सध्या ब्रेकवर?


अनुष्का ‘परी’नंतर  शाहरुखसोबत झीरो या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट फार चालला नाही.या तिने एका दिव्यांग तरुणीची भूमिका साकारली होती. तिच्या या रोलविषयी जरी चर्चा झाली असली तरी हा चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे अनुष्काच्या या रोलचे फारसे कौतुक झाले नाही. पण त्याआधी आलेला  वरुणसोबतच्या ‘सुई धागा’ या चित्रपटाला मात्र अनेकांनी पसंती दिली होती. पण त्यानंतर अनुष्काने कोणताही चित्रपट केलेला नाही. शिवाय तिच्या कोणत्याही आगामी प्रोजेक्टबद्दलची अधिक माहिती नाही. त्यामुळे अनुष्काने झीरोनंतर एक ब्रेक घेतला आहे, असेच म्हणायला हवे. अनुष्काच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही तिने चित्रपटासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. केवळ तिने तिचे शेअर केलेले काही फोटोज पाहायला मिळत आहे. 


प्रियांकाच्या घरी नव्या पाहुण्याचं जंगी स्वागत


virushka 1


अनुष्काने केली सुरुवात


अनुष्का आणि विराटच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा सुरु असताना अचानक त्यांच्या लग्नाच्या बातम्या झळकू लागला. इटलीत अगदी कमी पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. पण अनुष्काने लग्नासाठी इतर सेलिब्रिटींना खो दिला असेच म्हणायला हवे कारण त्यानंतर प्रियांका चोप्रा - नीक जोनस, दीपिका- रणवीर सिंह, ईशा अंबानी- आनंद पिरामल, आकाश अंबानी- श्लोका मेहता यांची लग्ने झाली आणि अजूनही काही जोड्याही या वर्षात लग्न करणार आहेत.त्यामुळे याची सुरुवात अनुष्काने केली असे म्हणायला हवे.


माधुरी- संजय पुन्हा एकत्र


viruska 2


लव्ह इज इन एअर


अनुष्का आणि विराटचे सोशल अकाऊंट पाहिल्यानंतर ‘लव्ह इज इन एअर’ असेच म्हणावे लागेल. कारण हे दोघे सेलिब्रिटी कपल नाही तर आकंठ प्रेमात बुडालेले परफेक्ट कपल वाटतात. इतर कोणत्याही कपलसारखे एकमेकांसोबत वेळ घालवायला ते नक्कीच विसरत नाही. म्हणून त्यांच्या नात्यातील गोडवा टिकून आहे आणि तो त्यांच्या फोटोमध्ये देखील दिसून येतो.


(फोटो सौजन्य- Instagram)