अभिनेता आयुषमान खुराना दिवसेंदिवस लोकप्रियतेचं नवं शिखर गाठत आहे. अभिनेता आयुषमान खुरानाने सात वर्षांपूर्वी बॉलीवूडमध्ये दमदार एन्ट्री केली. 2004 मध्ये झालेल्या एमटीव्ही रोडीजचं दुसरं पर्व त्याने जिंकलं आणि टेलिव्हिजन माध्यमात अॅंकर म्हणून आपलं स्थान मिळवलं. त्यानंतर 2012 साली विकी डोनर या आगळ्या वेगळ्या विषयासह बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने एकावर एक हिट चित्रपट देण्याचा तडाखाच लावला आहे. दम लगा के हैशा, बरेली की बर्फी, शुभ मंगल सावधान, बधाई हो, ड्रिमगर्ल, अंधाधुन, आर्टिकल 15 आणि आता बाला असे त्याचे लागोपाठ सात चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे त्याच्या नावावर नवा विक्रमाची नोंद झाली आहे. आयुषमानच्या आधी हा विक्रम महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर होता. मात्र बालाच्या अभूतपूर्व यशामुळे आयुषमान आता बॉलीवूडचा नंबर वन ठरला आहे. आयुषमानच्या अभिनयला चाहत्यांची चांगलीच दाद मिळत आहे. बाला चित्रपटात आयुषमानने केस गळतीच्या समस्येला तोंड देणाऱ्या नायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्सऑफिसवर जवळजवळ 25 कोटींहून अधिक कमाई केली आहे. बाला चित्रपट हिट झाल्यामुळे आयुषमान खुरानाचा बोलबोला प्रेक्षकांच्या मनात वाढला आहे.
आयुषमान बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता
आयुषमानने 2012 साली विकी डोनर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये एक वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं. या चित्रपटासाठी आयुषमानला बेस्ट डेब्यूचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर फक्त सातच वर्षांत ‘बाला’ चित्रपटापर्यंत बॅक टू बॅक हिट चित्रपट दिल्यामुळे आयुषमान बॉलीवूडचा नवा नंबर वन नायक ठरत आहे.आयुषमानने निवडलेले सर्वच चित्रपट अतिशय वेगळ्या विषय आणि धाटणीचे आहेत. या हटके विषयांमध्ये आयुषमानने आपल्या सक्षम अभिनयाने असे काही रंग भरले की हे सर्वच चित्रपट हिट झाले. एका पाठोपाठ चित्रपट हिट करणारा अमिताभनंतर आयुषमान हा दुसरा बॉलीवूड अभिनेता आहे. यापूर्वी अमिताभ यांच्या नावावर एका पाठोपाठ सहा चित्रपट हिट करण्याचा रॅकॉर्ड होता. मात्र आयुषमानने हा रॅकॉर्ड मोडून नवा रॅकॉर्ड निर्माण केला आहे. विशेष म्हणजे आगामी चित्रपट गुलाबो चिताबोमध्ये अमिताभ आणि आयुषमान हे दोघेही एकत्र काम करत आहे. ज्यामुळे या दोन्ही काळातील दिग्गज नायकांना एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
गुलाबो सिताबो’ नोव्हेंबरमध्ये होणार प्रदर्शित
2020 मध्ये गुलाबो सिताबो हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शूजीत सरकारचे चित्रपट नेहमीच वेगळ्या धाटणीचे असतात. या चित्रपटाचे कथानक जुही चतुर्वेदी आणि सुजीत यांनी केले आहे. शिवाय गुलाबो सिताबोची निर्मिती रॉनी लाहेरी आणि शील कुमार करत आहेत. हा चित्रपट उत्तर प्रदेशच्या बोली भाषेवर आधारित असणार आहे. नावावरूनच या चित्रपटात भरपूर कॉमेडी असण्याची शक्यता आहे असं वाटत आहे. या चित्रपटात अमिताभ आणि आयुषमान यांच्यासोबत कोण अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार हे अद्याप उघड करण्यात आलेलं नाही. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंंगला सुरूवात होणार आहे.
फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
दीपिका सहभागी होणार जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत