बिपाशा बासूने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो,करण सिंह ग्रोव्हर करतोय कौतुक

बिपाशा बासूने सोशल मीडियावर शेअर केले बोल्ड फोटो,करण सिंह ग्रोव्हर करतोय कौतुक

बिपाशा बासूचा बोल्ड आणि हॉट लुक आजही चाहत्यांना घायाळ करतो. बॉलीवूडमधील एक हॉट आणि सेक्सी अभिनेत्री अशी कधीकाळी तिची इमेज होती. जिस्म, राज, ओमकारा अशा चित्रपटातून तिचा सिझलिंग अवतार पाहायला मिळाला होता. आता मात्र बिपाशा चित्रपटसृष्टीपासून काहीशी दूरावली आहे. ती करण सिंह ग्रोवरसोबत लग्न करून तिच्या संसारात सुखी आहे. बॉलीवूडपासून लांब असली तरी बिपाशाचे सोशल मीडियावर अनेक फॉलोव्हर्स आहेत. नुकताच बिपाशाने तिचा  बोल्ड आणि हॉट लुक असलेला फोटो सोशल शेअर केला आहे. बिपाशाचा हा लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  एवढंच नाही तर तिचाहा ग्लॅम लुक पाहून तिचा नवरा करणसिंह ग्रोव्हर घायाळ झाला आहे. 

बिपाशाचा 'हॉट जलवा' आजही कायम

बिपाशा ही बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी प्रसिद्ध आणि सुपरमॉडेल होती. अभिनय, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता यांचं अफलातून मिश्रण बिपाशा बासूमध्ये आहे त्यामुळे आजही तिचे अनेक चाहते आहेत. बिपाशाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंनाही चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. यातील एका फोटोला बिपाशाने 'मूड... स्वतःवर प्रेम करा' अशी कॅप्शन दिली आहे. तर दुसऱ्या एका बिकनी लुकसोबत तिने शेअर केलं आहे की,'मी  कोणतंही फुल नाही जे तोडल्यावर सुकण्यासाठी टाकून दिलं जाईल. मला शोधणं कठीण आणि विसरणं अशक्य आहे.' या कॅप्शन आणि फोटोशूटमुळे बिपाशाा पुन्हा एका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या फोटोंसोबतच तिने  तिचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे. जो फोटो यापूर्वीदेखील व्हायरल झाला होता. या फोटोजनां पाहून चाहतेच नाही तर तिचा नवरा करण सिंह ग्रोव्हरही घायाळ झाला आहे करणने बिपाशाच्या या फोटोवर डॅम अशी कंमेट केली आहे. 

करण आणि बिपाशा बॉलीवूडचे हॉट कपल

लॉकडाऊनमुळे बिपाशा सध्या तिच्या पतीसोबत घरातच वेळ घालवत आहे. सोशल मीडियावर या दोघांची लव्ह केमिस्ट्री ती बऱ्याचदा पाहायला मिळते. कधी ती त्याच्यासाठी एखादी रेसिपी करतानाचे फोटो  शेअर करते तर कधी त्याच्यासोबतचे इंटिमेट फोटो शेअर करून बिपाशा करणावरील प्रेम सतत व्यक्त करत असते. बिपाशा आणि करण लग्नानंतर अनेकदा एकत्र दिसतात. सोशल मीडियावरील एक हॉट आणि सेक्सी जोडी म्हणून त्यांची ओळख आहे. बिपाशाने करणसोबत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं होतं. अनेक ब्रॅंडचे ते दोघंही ब्रॅंड अॅंम्बेसेडर आहेत. या शिवाय त्या दोघांनी 'अलोन' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. लग्नानंतर बिपाशा जरी चित्रपटसृष्टीपासून दूरावली असली तरी करण मात्र कसौटी जिंदगी की या हिंदी मालिकेच्या दुसऱ्या सिझनमध्ये 'मिस्टर बजाज'च्या भूमिकेत दिसला होता. मात्र काही काळानंतर त्याने ही मालिका सोडली. काही दिवसांपासून बिपाशाच्या प्रेंगन्सीच्या चर्चादेखील चाहत्यांमध्ये सुरू आहेत. मात्र याबाबत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. शिवाय आता बिपाशाचे हे हॉट आणि बोल्ड फोटो पाहून या गोड बातमीसाठी चाहत्यांना अजून काही दिवस वाट पाहावी लागेल असंच वाटत आहे.