प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' सिनेमाचं पोस्टर लाँच

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'चोरीचा मामला' सिनेमाचं पोस्टर लाँच

प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित ‘चोरीचा मामला’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. या चित्रपटात जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. याव्यतिरिक्त लियो नावाच्या एका श्वानाची भूमिका देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. 31 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा टीझर लाँच करण्यात आला होता. जितेंद्र जोशीनं चित्रपटात 'नंदन'ची व्यक्तिरेखा साकारली आहे. तर अमृता खानविलकर ग्लॅमरस लुकमध्ये दिसणार आहे. अमृता सिनेमात 'श्रद्धा' नावाची भूमिका साकारत आहे. अनेक कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आपल्याला दिसणार आहेत. 

(वाचा : अक्षय कुमार 25 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत करणार रोमान्स)

प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून दुसरा सिनेमा

‘मस्का’ या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून चोरीचा मामला हा दुसरा चित्रपट आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि स्वरूप स्टुडिओजच्या सहकार्याने सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रियदर्शन जाधवनं या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चिनार महेश यांनी सिनेमाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरमधूनच चित्रपट धमाल आणि मनोरंजक असल्याचं समजतंय. चित्रपटातील व्यक्तिरेखा अर्कचित्राद्वारे मांडण्यात आल्या आहेत. एक चोरी, त्यात होणारा गोंधळ आणि वाढत जाणारा गुंता अशी चित्रपटाची कहाणी आहे.

(वाचा : भाईजान सलमानचा व्हिलनसोबत दोस्ताना, कोट्यवधींची कार केली गिफ्ट)

नवीन वर्षात हे सिनेमे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’  

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकाच चित्रपटात काम करणार आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटात हा योग जुळून आला आहे. त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे. ‘फटमार फिल्म्स एलएलपी’ या निर्मिती संस्थेकडून ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ची निर्मिती करण्यात येत आहे. हा सिनेमा 3 एप्रिल 2020 ला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

‘शहीद भाई कोतवाल’ 

'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग' असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या ‘शहीद भाई कोतवाल’ यांच्यावर आधारित चित्रपट 24 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.  या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  

 ‘इभ्रत’

एक अस्सल मराठमोळं प्रेमी युगुल आहे मल्हार मायडी. ही जोडी इभ्रत नावाच्या प्रेमकथेतून रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत. तरल आणि प्रेमाची गोष्ट सांगणारा इभ्रत 21 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

(वाचा : बॉलिवूडची ‘शांती’ पत्रकारावर भडकली, प्रेग्नेंसीच्या प्रश्नावर दीपिकानं दिलं ‘हे’ उत्तर)

 

हे देखील वाचा 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.