‘लक’ किंवा ‘लकी असणं’ आपण सगळेच थोड्याफार प्रमाणात मानतो. पण ज्या चित्रपटाचं नावच ‘लकी’ आहे, म्हंटल्यावर काय म्हणावं. तर लवकरच ‘लकी’ नावाचा धम्माल चित्रपट तुमच्या भेटीला येणार आहे. या पिक्चरच्या गाण्यातील फेमस ओळ आहे, हा लकी याच्या नावातच आहे ‘ल’. आता हा ‘ल’ लकी असण्याबाबत आहे की विरोधाभासी आहे, ते चित्रपट बघितल्यावर कळेलच. पण लकी या चित्रपटाच्या नावाच्या अनुषंगाने लकीच्या टीमकडून POPxo मराठीने एक खास गोष्ट जाणून घ्यायचा प्रयत्न केला. ते म्हणजे या सगळ्यांचा ‘लक’ या गोष्टीवर किती विश्वास आहे. चला तर मग जाणून घेऊया. लकीच्या टीमचं काय म्हणणं आहे लकी असण्याबाबत.
लकीच्या निमित्ताने दिग्दर्शक संजय जाधव यांनी केलं कन्फेशन
हे मी खूप करतो. माझ्या फिल्मच्या प्रमोशनला जिथेजिथे बाहेर जातो. दुनियादारीच्या वेळी ज्या हॉटेलमध्ये राहायलो होतो तिथेच आजही मी दरवेळी राहतो. दुनियादारीच्या वेळी माझ्या फिल्मला प्रभातमध्ये प्रोजेक्टरची पूजा करून सुरूवात केली होती. आजही मी ती प्रत्येक वेळी करतो आणि पहिला शो चालू होतो. दुनियादारीचा प्रीमियर शो जूहू पीव्हीआरला झाला होता. त्यामुळे मी प्रत्येक सिनेमाचा प्रीमीयर तिकडेच करतो.
लकी चित्रपटाचे ‘लकी’ हिरो आणि हिरोईन
या चित्रपटातून पहिल्यांदाच आपल्यासमोर अभय महाजन आणि दीप्ती सती ही जोडी येत आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांच्या चित्रपटात या नवख्या जोडीला संधी मिळाली आहे. मग काय म्हणणं आहेत त्यांचं लकी फॅक्टरबद्दल.
जे जेव्हा घडायचं असेल ते घडतं, माझी आई माझा लकी चार्म
मला वाटतं लकने आपलं काम करावं आणि आपल काम करत राहावं. ज्यावेळी जी गोष्ट मिळणं अपेक्षित आहे, ती आपल्याला मिळते. जर ती नाही मिळाली तर आपल्याला ती मिळणं अपेक्षित नाही.असं मी मानणारा मुलगा आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या आईला माझा लकी चार्म मानते. जेव्हा ती माझ्यासोबत असते तेव्हा मी स्वतःला लकी मानते. कारण मी जेव्हा मिस केरलाचा किताब जिंकले तेव्हा ती माझ्याबरोबर होती. पण मिस इंडियाला ती नव्हती आणि मी जिंकू शकले नाही. फक्त पहिल्या पाचमध्ये आले. त्यामुळे माझी आईच माझ्यासाठी लकी चार्म आहे.
संगीतकार अमितराज आणि पंकज पडघण या संगीतकार जोडीने ‘लकी’ चित्रपटातील चार गाणं केली आहेत. या चित्रपटातील सर्व गाणी ही प्रसंगानुरूप आलेली आहेत. यातील चारही गाणी मेलोडियस असून एकमेंकापासून वेगळी आहेत. तर लक या फॅक्टरबाबत या संगीत जोडीला विचारलं असतं त्यांनी ही सांगितले मजेदार किस्से.
अमितराजना अभिनेता सिद्धार्थने दिला होता ‘लकी मंत्र’
मी खरं सांगू का, मला अभिनेता सिद्धार्थ एक खूप चांगली गोष्ट सांगितली होती. आम्ही दोघं ही एक चित्रपट एकत्र करत होतो आणि प्रमोशनला आम्ही पहाटेच्या विमानाने निघालो होतो. आम्ही सगळे पेंगलेले होतो. पण सिध्दू आला आणि त्याने सगळ्यांची झोप उडवली. तेव्हा मी त्याला विचारलेलं की तू इतका चार्ज कसा, तेव्हा सिद्धार्थने मला सांगितलं होतं की, अमित आपण दिवसाची सुरुवात ज्या नोटने करतो ना तीच नोट दिवसभर लागते. म्हणून मी दिवसाची सुरूवातच जबरदस्त करतो. दिवसाची सुरूवात पॉझिटीव्ह नोटने केलीत तर पूर्ण दिवस चांगला आणि लकी जातो. तर पंकज पडघण यांनीही यालाच दुजोरा दिला आणि सांगितलं की, मी कधी असा विचार केला नाही. कधीकधी एखादी चांगली गोष्ट घडली की, ती पुन्हा त्याच पद्धतीने घडेल असं वाटतं पण असं नसतं. तो एक प्रोसेसचा भाग असतो. त्यामुळे मी ही गोष्ट मानत नाही.
लोकांंचं प्रेम मिळणं हे ‘लकी’ – वैशाली सामंत
लकीमध्ये ‘कोपचा’ हे गाणं साक्षात बप्पी दा बरोबर गायलंय गायिका वैशाली सामंत यांनी. आपल्या लकी असण्याबाबतचा विचार त्यांनी POPxo मराठीला सांगितला तो असा, ‘मी लकी आहे असं म्हणेन, कारण बप्पी दांबरोबर गाण्याची संधी मला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. लकी या चित्रपटांमुळे मलाही संधी मिळाली. मास अपील असणार हे गाणं गायला कठीण आहे. मला त्यांच्याबरोबर गाताना थोडं टेन्शनही आलं होतं. या गाण्यामुळे आणि लकीमुळे माझ्या करिअरचा ग्राफ एक लाईन पुढे गेलाय हे निश्चित. अजून एक लकी गोष्ट म्हणजे एक कलाकार म्हणून लोकांचं प्रेम मिळणं, आम्हाला लोकांनी ओळखणं, मोठ्या लोकांबरोबर काम करायला मिळणं. या सगळ्या प्रोफेशनली माझ्या लक्षात राहणाऱ्या अनेक लकी मूमेंटस आहेत. पण गंडे दोरे, अंगठ्या, लकी चार्म किंवा लकी कलर या सगळ्या गोष्टीपासून मी प्रकर्षाने लांब ठेवलंय. कारण यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे. मी असं काहीच मानत नाही. कारण ही कुठेतरी अंधश्रद्धा असते. मग कुठेतरी आपण त्यावर अवलंबून राहतो.
मग आता पाहूया ‘लकी’ या चित्रपटाला ‘लक’ आणि प्रेक्षक कशी साथ देतात ते.
हेही वाचा
एम-टाऊनच्या नव्या कपलचं सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन
‘लकी’साठी ‘लकी’ ठरला पुणे दौरा
‘लकी’ बॉय चैतन्य देवढेचं पहिलंवहिलं ‘माझ्या दिलाचो’ गाणं झालं रिलीज