Flashback : धर्मेंद्र यांनी उगारला होता शोमॅन सुभाष घईंवर हात, जाणून घ्या किस्सा

Flashback : धर्मेंद्र यांनी उगारला होता शोमॅन सुभाष घईंवर हात, जाणून घ्या किस्सा

पापाराझ्झींशी भांडण असो वा पार्टीतील एखादा वाद असो बॉलीवूड सेलेब्स नेहमीच काही ना काही कारणाने हेडलाईन्समध्ये चमकत असतात. मग तो बॉलीवूडचा भाईजान सलमानचा राग असो वा कोणा अभिनेत्रीचे टँट्रम्स असो. पण तुम्हाला माहीत आहे का, हे फक्त आत्ताच घडतंय असं नाहीतर जुन्या काळीही घडत होतंच. फक्त तेव्हा जितक्या वेगाने आजकाल बातम्या व्हायरल होतात तसं नव्हतं. त्यामुळे अनेकदा जुने किस्से समोर येतात. असाच एक किस्सा आहे धर्मेंद्र आणि सुभाष घई यांचा.

बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाने अनेक फॅन्सच्या मनात खास जागा मिळवली आहे. त्यांची आणि हेमामालिनीची शोले मधली व रिअल लाईफमधली जोडी आजही पसंत केली जाते. पण एक काळ असा होता जेव्हा धर्मेंद्र यांना खूप राग येत असे आणि त्यामुळे ते सतत चर्चेत असत. त्यांच्या रागाचा पार 39 वर्षापूर्वी अनेकांनी पाहिला होता. जेव्हा त्यांनी बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांना थोबाडीत मारलं होतं. हो...धर्मेंद्र यांनी रागाच्या भरात सुभाष घईंवर हात उगारला होता. तेव्हा त्या चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत हेमामालिनींच कास्ट करण्यात आलं होती.

बिकीनीचा आग्रह पडला महागात

या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सुभाष घई यांनी हेमामालिनी यांना एका सीनसाठी बिकीनी घालण्यास सांगितले होते. पण हेमा यांनी असं करण्यास नकार दिला. पण जेव्हा सुभाष यांनी आग्रह धरला तेव्हा हेमा यांनी स्विमिंगपूल सीनसाठी बिकीनी घातली. पण हे जेव्हा धर्मेंद्र यांना कळलं तेव्हा त्यांच्या रागाचा पार सातव्या आसमानात पोचला.

पुढे काय घडलं?

धर्मेंद्र यांनी शूटींगदरम्यान चक्क सुभाष घईंना थोबडवलं. नंतर निर्माते रंजीत यांनी मधस्थी करून त्यांचा राग शांत केला. पण या घटनेमुळे धर्मेंद्र यांनी तर चक्क सुभाष यांनी धमकीही दिली होती. या घटनेनंतर सुभाष घई फारच घाबरले होते. परिणामी सुभाष यांनी तो सीन चित्रपटातून डिलीट केलं. गंमत म्हणजे या सिनेमाचं नावंही क्रोधी असंच होतं. या सिनेमात धर्मेंद्र आणि हेमा यांच्यासोबत झीनत अमान आणि शशी कपूर यांचीही प्रमुख भूमिका होती.

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20%ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.