भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Indian Foreign Minister Sushma Swaraj) लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. सोशल मीडियावर जितके वेळा कोणी आपली व्यथा मांडली आहे त्या प्रत्येक वेळी त्या त्या व्यक्तींना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न सुषमा स्वराज यांनी केल्याचा आतापर्यंत रेकॉर्ड आहे. नुकताच सोशल मीडियावर एक मजेशीर किस्सा समोर आला आहे. यामध्ये सुषमा स्वराज यांच्याकडून मदत मागणाऱ्या व्यक्तीला त्याच्या अडखळणाऱ्या इंग्रजीसाठी बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे.
अडखळणाऱ्या इंग्रजीमध्ये मागितली मदत
@SushmaSwaraj @BBCNews @BBCBreaking
I from India in Punjab but I’m now in Malaysia here one my friend mental I want send go back to India but immigration say we are cannot help you first here treatment your friend after can I send India your friend can you ask immigration— Gavy (@Gavy34196087) March 11, 2019
भारतातील प्रत्येक व्यक्तीला हे माहीत आहे की, भारतीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या सोशल मीडियावर मागितलेली मदत पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. असं बऱ्याच वेळा दिसून आलं आहे की, ट्विटरद्वारे सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागण्यात आली आणि त्यानंतर सुषमा स्वराज यांनी त्या त्या व्यक्तींचं काम मंत्रालयातून पूर्ण केलं आहे. नुकतंच पंजाबमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीनेही सोशल मीडियाद्वारे सुषमा स्वराज यांना आपल्या मलेशियामध्ये आपला मित्र फसवणूकीने अडकला असल्याची शक्यता सांगितलं. या व्यक्तींचं इंग्रजी अजिबातच योग्य नव्हतं. या व्यक्तींने अडखळणाऱ्या इंग्रजीमध्ये याची माहिती दिली होती. त्यामुळे या व्यक्तीला अनेक लोकांनी ट्रोल केलं. बऱ्याच लोकांनी तर या व्यक्तीला हिंदी वा इंग्रजीमध्ये लिही असा सल्लाही दिला होता.
सुषमा स्वराजच्या उत्तराने जिंकली सर्वांची मनं
There is no problem. After becoming Foreign Minister, I have learnt to follow English of all accents and grammar. https://t.co/2339A1Fea2
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 11, 2019
पीडित व्यक्तीच्या या ट्विटनंतर सुषमा स्वराज यांनी त्याला मदत करण्याचं आश्वासन दिलं. वास्तविक यावेळी सुषमा स्वराज यांनी अशा तऱ्हेने हे आश्वासन दिलं आहे की, अनेक लोक त्यांचे चाहते बनले आहेत. वास्तविक, पीडित व्यक्तीला ट्रोल करणाऱ्या लोकांना सुषमा स्वराज यांनी उत्तर देत म्हटलं, ‘यामध्ये काहीच समस्या नाही. मी स्वतः परराष्ट्र मंत्री बनल्यानंतर इंग्रजी भाषा उच्चारण आणि व्याकरणाचा अभ्यास केला आहे.’ इंग्रजी भाषा महत्त्वाची नसून त्याने व्यक्त होणं महत्त्वाचं होतं हेच एका अर्थी सुषमा स्वराज यांनी जाणवून दिलं आहे. शिवाय त्या व्यक्तीला एक विश्वास देण्याचं कामही त्यांनी केलं. त्यामुळेच सध्या सुषमा स्वराज यांची चर्चा सुरु असून बरेच चाहतेही झाले आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे बरेच लोक त्यांचे चाहते होत आहेत.
इथोपिया विमान अपघाताबद्दल व्यक्त केली हळहळ
I have spoken to the bereaved family members of Shikha Garg, Manisha and Vaidyas. Please be assured that Indian missions in Ethiopia and Kenya are there to help you in all matters including identification of their remains and belongings. @IndiaInEthiopia @IndiainKenya
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) March 11, 2019
हल्लीच इथोपिया (Ethopia) मध्ये एक विमान अपघात झाला होता त्यामध्ये चार भारतीय व्यक्तींचं निधन झालं. सुषमा स्वराज यांनी ट्विट करून या अपघाताची माहिती दिली आणि हळहळ व्यक्त केली. या अपघातमध्ये पर्यावरण मंत्रालयातील सदस्य शिखा गर्ग हिचंही निधन झालं आहे. शिखा संयुक्त राष्ट्र पर्यावरणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नैरोबीला जात होती. शिखाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियाद्वारे शिखाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचा सुषमा स्वराज यांनी प्रयत्न केला होता. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, शिखाच्या नवऱ्याला अनेक कॉल केले आहेत. तिच्या कुटुंबीयांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. सुषमा स्वराज या नेहमीच अनेक लोकांची सोशल मीडियाद्वारे मदत करत असतात. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते आहेत.
हेदेखील वाचा –
Learn English : फ्लुएंट इंग्रजी बोलायचं असल्यास जाणून घ्या टीप्स
अनुष्का- विराटने केली स्पीडबोटची सफर, पाहा व्हिडिओ
पंच प्रवीण तरडे करणार ‘सूर सपाटा’चा निवाडा