रितेशला जेनेलियाच्या हटके शुभेच्छा

रितेशला जेनेलियाच्या हटके शुभेच्छा

रितेश आणि जेनेलिया ही चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली जोडी आहे आणि दोघेही एकमेकांसाठी सोशल मीडियावरूनही प्रेम व्यक्त करत असतात. जेनेलियाने असंच रितेशबद्दल पुन्हा एकदा प्रेम व्यक्त केलं आहे आणि गोष्टही तशीच खास आहे. कारण आज रितेशचा वाढदिवस आहे. 17 वर्षांपूर्वी रितेश आणि जेनेलिया ‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर भेटले तेव्हाच्या आठवणी जागवत जेनेलियाने रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही आणि मला इतके वर्ष तुझ्याबरोबर तुझा वाढदिवस साजरा करायला मिळत आहे. तुझा वाढदिवस हा माझ्यासाठी नेहमीच खास असतो कारण आजच्या दिवशी जगाला सर्वात चांगली निर्मिती अर्थात सर्वात चांगला माणूस जन्माला अाल्याचं पाहायला मिळालं आणि अर्थात ती व्यक्ती माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि किती प्रेम आहे हे सांगण्याची ही संधी या निमित्ताने मिळाली...तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा’, असा प्रेमळ मेसेज इन्स्टाग्रामवरून रितेशसाठी जेनेलियाने पोस्ट केला आहे.


रितेश आणि जेनेलिया दोघांचीही एकत्र सुरुवात


रितेश आणि जेनेलियाने ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट 2003 मध्ये एकत्र केला. त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. राजकारण घराणं असूनही रितेशने वेगळी वाट धरली आणि त्यामध्ये यश मिळवून दाखवलं. असं असलं तरीही रितेशने आपलं शिक्षण आर्किटेक्चरमध्ये पूर्ण केलं आहे. रितेश आणि जेनेलियाला रियान आणि राहील अशी दोन मुलं आहेत. दोघंही नेहमीच एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात. इतकंच नाही तर कामातून वेळ काढून रितेश आपल्या पत्नीला आणि मुलांना व्यवस्थित वेळ देतो.


आवडत्या कपलसाठी लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छानुकताच प्रदर्शित झाला ‘माऊली’


रितेशचा ‘माऊली’ नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. मराठीमध्ये फार कमी अॅक्शन चित्रपट येत असतात आणि ‘माऊली’ हा त्यापैकी एक आहे. रितेशच्या वाढदिवसाला प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगला प्रतिसाद देऊन एकप्रकारे रितेशला गिफ्टच दिलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटाची निर्मिती रितेशची पत्नी जेनेलियाने केली आहे. प्रेक्षकांची नस ओळखून एक चांगला मसालापट देण्याचा दोघांनीही प्रयत्न केला असून पुन्हा एकदा पडद्यावर साधारण 4 वर्षांनंतर ही जोडी एका गाण्यातून समोर आली आहे. या चित्रटातील ‘धुवून टाक’ हे गाणंदेखील प्रेक्षकांना आवडत आहे.


mauli poster FI


फोटो सौजन्य - instagram