सलमान खान आणि आलिया भट पहिल्यांदाच संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट सर्वच दृष्टीने खास आहे. सर्वात पहिले म्हणजे साधारण 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा सलमान आणि संजय लीला भन्साली एकत्र काम करणार आहेत. तर दुसरं म्हणजे सलमान आणि आलिया ही वेगळी जोडीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया लहानपणापासून भन्सालींची चाहती आहे आणि तिने याआधीही आपल्याला त्यांच्याबरोबर काम करायला खूपच वाट पाहायला लागली असं स्पष्ट केलं आहे. तिचं हे स्वप्नं आता सत्यात उतरलं आहे.
आलियाने ट्रोलर्सचं तोंड बंद केलं
आलिया आणि सलमान एकत्र काम करत आहेत हे कळल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया यायला लागल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सलमानच्या अपोझिट आलियाला कास्ट करण्यात आल्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. या दोघांमध्ये साधंसुधं नाही तर 27 वर्षांचं अंतर आहे. पण असं असलं तरीही यापूर्वीदेखील अनेक स्टार्सने आपल्यापेक्षा लहान अभिनेत्रींबरोबर काम केलं आहे. पण तरीही बऱ्याच लोकांनी आलियाला सलमानबरोबर काम करत आहे म्हणून ट्रोल केलं. पण आता या सगळ्या बाबींवर आलिया सडेतोड बोलली आहे.
आलियाला भन्सालीवर आहे विश्वास
आलियाने याबाबत आपलं मत मांडलं आहे. ‘मला याबद्दल काहीही वाटत नाही. कारण मला तर सगळीकडे उत्साहच पाहायला मिळाला आहे. मला वाटतं अशा बातम्यांमुळे उलट जास्त उत्साह वाढतो. मी या गोष्टीवरून अजिबात विचार करत नाही आणि मला नाही वाटत सलमान किंवा संजय सर पण विचार करत असतील किंवा त्यांना यावरून काही फरक पडत असेल. माझ्या मते भन्साली असे दिग्दर्शक आणि निर्माता आहेत ज्यांनी खूप सुंदर चित्रपट बनवले आहेत. ती अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचा सर्वच आदर करतात. मला वाटतं त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि त्यांच्या दृष्टीकोनाचाही आदर करायला हवा.’
सलमान आणि भन्साली करणार चित्रपटाची निर्मिती
‘इन्शाअल्लाह’ या चित्रपटाची निर्मिती सलमान खान आणि भन्साली दोघेही करणार असून हा चित्रपट 2020 मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे. सध्या सलमान खानने नुकतचं ‘भारत’चं चित्रीकरण संपवलं असून ‘दबंग 3’ च्या चित्रीकरणाला इंदूरमध्ये सुरुवात केली आहे. दरम्यान आलिया भटला नेहमीच संजय लीला भन्सालीबरोबर काम करायचं होतं आणि या चित्रपटाच्या निमित्ताने तिचं स्वप्न पूर्ण होत आहे. जेव्हा या चित्रपटाचं कास्टिंग फायनल झालं तेव्हा आलिया आणि सलमान दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही बातमी शेअर केली होती.
सलमाननेही आपला आनंद सोशल मीडियावर व्यक्त केला
दरम्यान सलमाननेही आपला उत्साह सोशल मीडियावर व्यक्त केला. ‘20 वर्ष उलटून गेली आहेत पण आता पुढच्या चित्रपटात पुन्हा संजय आणि मी एकत्र काम करत आहोत याचा मला आनंद आहे, इन्शाअल्लाह. आलियाबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे आणि या प्रवासात नक्कीच आम्ही कमाल करू, इन्शाअल्लाह’ असं सलमानने म्हटलं आहे. सलमान आणि संजय लीला भन्साली यांनी दोन चित्रपट एकत्र काम केलं आणि हे दोन्ही चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरले होते. पुन्हा एकदा ही जोडी नक्कीच कमाल करेल अशी आशा सर्वांनाच आहे.
फोटो सौजन्य – Instagram
हेदेखील वाचा –
‘इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र
आलिया भटला लागली लॉटरी, मिळाली एस.एस.राजमौलीची फिल्म
‘दबंग 3’ च्या गाण्याचं चित्रीकरण व्हायरल, चुलबुल पांडेला भेटले चाहते