दीपिकाला गरोदरपणाचे वेध, शेअर केलेल्या फोटोमधून दिले संकेत

दीपिकाला गरोदरपणाचे वेध, शेअर केलेल्या फोटोमधून दिले संकेत

सहा महिन्यांपूर्वी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी घरगुती सोहळ्यात इटलीला जाऊन लग्न केलं. हे लग्न खूपच गाजलं. कारण या लग्नानंतर देण्यात आलेले रिसेप्शनची संख्या इतकी होती की, आतापर्यंत इतके रिसेप्शन कोणीही केले नव्हते. रणवीर आणि दीपिका ही जोडी प्रेक्षकांची सर्वात आवडती जोडी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आधी दीपिका आणि रणवीरच्या लग्नाचे वेध त्यांच्या चाहत्यांना होते आणि आता ही जोडी कधी एकदा ‘गुड न्यूज’ देणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. रणवीर आणि दीपिका एकमेकांबरोबर नेहमीच आनंदी असतात हे त्यांच्या वागण्याबोलण्यातून दिसून येतं. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. शिवाय सोशल मीडियावर दोघंही नेहमी अॅक्टिव्ह असतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंट्सही देत असतात. पण नुकताच एक फोटो दीपिकाने शेअर केला आहे आणि त्यावर तिने दिलेली कॅप्शन ही एखाद्या ‘गुड न्यूज’चा संकेत तर नाही ना? अशी शंकाही आता प्रेक्षकांच्या आणि त्यांच्या चाहत्यांच्या मनात येत आहे. दीपिकाला गरोदरपणाचे वेध तर नाही ना लागले अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.

दीपिकाचा फोटो होतोय व्हायरल

Instagram

दीपिकाने एका पुरस्कार सोहळ्यासाठी घातलेला हिरव्या रंगाच्या कपड्यांमध्ये एक फोटो काढला आहे. त्या फोटोमध्ये दीपिका नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत आहे. पण लक्ष वेधून घेतलं आहे ते तिने दिलेल्या कॅप्शनने. या फोटोखाली तिने कॅप्शन दिलं आहे, ‘विशिष्ट आकृती धारण करना’. ही कॅप्शन वाचल्यानंतर जर दीपिकाचा फोटो न्याहाळून पाहिला तर, त्या फोटोमध्ये पडलेली सावली ही गरोदर बाईची असल्याचं भासत आहे. त्यामुळे दीपिका नक्की कसला संकेत तर देत नाही ना? असा प्रश्न पडला तर नवल नाही. दीपिका आणि रणवीर जितके सोशल आहेत तितकंच त्यांनी आपल्या खासगी गोष्टी नेहमीच जपल्या आहेत. त्यामुळे दीपिका आणि रणवीर आता मुलाच्या तयारीला लागले आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

रणवीरची प्रतिक्रिया

या फोटोवर बेस्ट हडबंड अर्थात उत्कृष्ट नवरा असणाऱ्या रणवीरने प्रतिक्रिया दिली नसती तर नवलंच. यावर रणवीरने लगेचच प्रतिक्रिया दिली. त्याने ‘शुद्ध देसी कॅप्शन’ असं दीपिकाला म्हटलं. त्यावर दीपिकानेही त्वरीत रिप्लाय देत ‘जर माझं हृदय देसी आहे तसंच’ असं म्हटलं आहे. दीपिका आणि रणवीर यांचं नातं खूपच सुंदर असल्याचं नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि इतर ठिकाणी व्हायरल होणारे व्हिडिओ आणि फोटोंमधून दिसून येतं. नोव्हेंबर 2018 मध्ये या जोडीने लग्न केलं आणि त्याआधी सहा वर्ष एकमेकांना डेट केलं. बऱ्याचदा रणवीर फक्त दीपिकाला भेटण्यासाठी तिचं ज्या ठिकाणी शूटिंग चालू असेल तिथे काही तासांसाठी भेटून यायचा. या गोष्टी स्वतः रणवीरने शेअर केल्या आहेत. त्यामुळे दीपिकावरचं त्याचं प्रेम नेहमीच दिसून आलं आहे.

रणवीर - दीपिका पुन्हा दिसणार पडद्यावर एकत्र

Instagram

रणवीर - दीपिकाने नेहमीच एकत्र केलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. रणवीर सध्या वर्ल्ड कपवर आधारित 83 या चित्रपटात काम करत असून कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर याच चित्रपटात दीपिकाही त्यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर कमाल करणार असं म्हटलं जात आहे. ही भूमिका लहान असली तरीही रणवीर आणि दीपिकाची केमिस्ट्री पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार याचाच त्यांच्या चाहत्यांना आनंद आहे. हा चित्रपट पुढील वर्षी मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. तोपर्यंत दीपिका आणि रणवीर आपल्याकडील ‘गुड न्यूज’ शेअर करणार का याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना नक्कीच राहणार आहे.