जुही चावलाच्या मुलाला व्हायचंय अभिनेता... जुहीने दिली माहिती

जुही चावलाच्या मुलाला व्हायचंय अभिनेता... जुहीने दिली माहिती

बॉलीवूडमधील स्टार्सच्या मुलांचे बॉलीवूडमधील पदार्पण काही आता आपल्याला नवीन नाही. पण एकेकाळची स्टार असलेली जुही चावला आणि तिची मुलं कधीच आपल्याला दिसली नाहीत. त्यामुळे तिची मुलं काय करतात अशी उत्सुकता अनेकांना होती. हाती आलेल्या माहितीनुसार जुही चावलाच्या मुलालाही अभिनेता व्हायचय. त्यामुळे आणखी एक स्टार किड येत्या काळात बॉलीवूडमध्ये दिसणार आहे. ही माहिती स्वत: जुही चावलाने एका मुलाखतीत दिली आहे.


सारा-कार्तिकमध्ये कुछ तो गडबड है


अर्जुन करणार अॅक्टिंग


जुही चावलाने 90च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण तिने तिचे खासगी आयुष्य नेहमीच बॉलीवूडच्या झगमगाटापासून लांब ठेवले. कोणत्याही पार्टीत किंवा समारंभात तिची मुलं दिसत नाही.त्यामुळेच तिची मुलं काय करतात याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिची मुलं काय करतात हे सांगितले.ती म्हणाली की, माझी दोन्ही मुलं सध्या लंडनला शिक्षणासाठी असून माझी दोन्ही मुलं शिकत आहे. माझा मुलगा अर्जुनमध्ये अभिनेता होण्याचे सगळे गुणधर्म असून त्याला अभिनेता व्हायचे आहे. तर माझी मुलगी जान्हवी हिला अभ्यासाची आवड आहे. त्यामुळे ती तिच्या शिक्षणानुसार करीअर निवडेल. पण अर्जुन अभिनयाकडे वळेल असे दिसत आहे.


पाहावी लागेल वाट


arjun chawla


पण आता अर्जुन मेहताच्या डेब्युसाठी तुम्हाला काही वर्ष वाट पाहावी लागणार आहे. कारण अर्जुन अजून लहान आहे.तो सध्या लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. जुहीची दोन्ही मुलं अभ्यात हुशार असल्याचे तिने सांगितले. तिची मोठी मुलगी जान्हवी अभ्यासात हुशार असून तिला या क्षेत्राशी काहीच घेणे देणे नाही. ती तिच्या अभ्यासातच खूश आहे. तिला आजही कोणते गिफ्ट हवे असा प्रश्न विचारला तर ती मला पुस्तक हवे असेच उत्तर देते. त्यामुळे ती तिच्या क्षेत्रातच काहीतरी करेल.


तुझे न्यूड फोटो पाठव, म्हणणाऱ्यांना सैराटच्या गायिकेने दिले असे सडेतोड उत्तर


जुही चावलाने दिले हिट चित्रपट


arjun chawla 2


शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान, अक्षय कुमार या सगळ्यांसोबत तिने काम केले आहे. कुरळ्या केसांची, गोड चेहऱ्याची ही अभिनेत्री त्यावेळी अनेकांच्या पसंतीस उतरली होती .1984 साली तिने मिस इंडिया ब्युटी पॅजेंटची स्पर्धा जिंकली. हिंदी चित्रपटांसोबतच तिने पंजाबी, मल्याळम, कन्नड, तेलुगु  चित्रपटातही काम केले आहे. डर, आईना, इश्क,कयामत से कयामत तक,यस बॉस यांसाख्या 50 हून अधिक चित्रपटात तिने काम केले आहे.


दीपिकाला मिळाला नीतू कपूरकडून आशीर्वाद, दिले सोन्याचे ब्रेसलेट


बिझनेसमनशी जुळल्या तारा


जुही चावला ही बॉलीवूडमध्ये राहूनही तिने तिच्या अफेअर्सच्या चर्चा होऊ दिल्या नाहीत. तिने थेट लग्न केले ते बिझनेसमन जय मेहता यांच्याशी. 1995 साली तिने जय मेहता यांच्याशी लग्न केले. त्यानंतर तिने काही चित्रपट केले. पण लग्नानंतर तिने बऱ्यापैकी चित्रपटातून काढता पाय घेतला. तिने त्यानंतर चित्रपट केले पण फारच कमी. तिचे लग्न अनेकांसाठी शॉकिंग न्यूज होती. कोणतीही माहिती नसताना तिने केलेले लग्न अनेकांना धक्का देणारे होते.


(सौजन्य- Instagram)