कपिल शर्माची ‘रिंकू भाभी' शोमध्ये परतणार ?

 कपिल शर्माची ‘रिंकू भाभी' शोमध्ये परतणार ?

कॉमेडीचा तडका घेऊन कपिल शर्मा पुन्हा एकदा नव्या रुपात परतला आहे. अनेक अडचणींचा सामना करत त्याच्या शो चा श्री गणेशा झाला आणि त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कॉमेडीचा दुप्पट, तिप्पट डोस या नव्या सीझनमध्ये आहे. पण तुम्हाला या शोमध्ये रिंकू भाभीची कमी जाणवत आहे का ? रिंंकू भाभी म्हणजे आपला सुनील ग्रोवर.. जर तुम्हाला त्याची या शो मध्ये कमी जाणवत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या कपिल शर्माच्या शोमध्ये सुनील ग्रोवर परतण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आनंदाच्या बातमीची घोषणा झाली नसली तरी ती  कपिल आणि सुनीलमध्ये समेट झाल्यानंतर ही घोषणा करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

पाहा आदिती द्रविडचा हा नृत्याविष्कार


 का होत आहे चर्चा?


कपिल आणि सुनीलमध्ये झालेल्या वादानंतर त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिली नाही. शो मिळण्यासाठी त्याची धडपड सुरु झाली. त्या दोघांनी एकत्र यावे यासाठी अनेकजण प्रयत्न करताना दिसत आहे. पण सोशल मीडियावर सुनीलचा हा फोटो आल्यानंतर चर्चांना अधिक उधाण आले आहे. कॉमेडी नाईटस विथ कपिलमध्ये काम करणारी रोशल आणि सुनीलचा हा फोटो चर्चेचे कारण ठरत आहे.


sunil grover


नुकताच नोरा फतेहीचा वाढदिवस झाला. त्यावेळी सुनील, रोशेल, नोरा एकत्र भेटेले होते. आता यात सुनील परतण्याचे कारण काय? असा प्रश्न पडला असेल तर रोशेल,नोरा, सुनील, कपिल हे चांगले मित्र आहे. रोशेल कपिलसोबत अजूनही काम करत आहे. कदाचित सुनीलला या शोमध्ये आणण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे. शिवाय हे दोघे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे.


सूर्यवंशी चित्रपटाच्या शुटींग आधी शूट झाला टीझर


 '...खुरानाजला' मिश्र प्रतिसाद


कपिल आणि सुनीलच्या कॉमेडीच्या डोसवर लोक खूपच खूश होते. या दोघांची जोडी फिस्कटली आणि कपिल शर्माचे ‘बुरे दिन’ सुरु झाले. कारण कपिलचा शो बंद पडला. शो अचानक बंद पडल्यामुळे लोकांनाही काही कळत नव्हते. पण कपिल आणि सुनीलच्या वादामुळे हे झाले हे सगळ्यांनाच माहीत होते. त्यावेळी शोचे नाव कॉमेडी नाईटस विथ कपिल शर्मा होते. त्यानंतर पुन्हा एकदा द कपिल शर्मा नावाने एक शो सुरु झाला पण तो आठवडाभरदेखील चालला नाही. आठवडाभर चाललेल्या शोमध्ये किकू शारदा आणि शिमोना होते. पण हा शो दुर्देवाने चालू शकला नाही. तर दुसरीकडे सुनील ग्रोवरही अनेक लहान मोठ्या कार्यक्रमातून आला होता. आणि सध्या त्याचा ‘खुरानाज’ हा शो सुरु आहे. पण त्यालाही संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे या दोघांनी वाद मिटवून एकत्र यावे अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे.

सारा अली खानने का सोडले आईचे घर?


 ‘कानपूरवाले खुरानाज’ होणार बंद


सुनील ग्रोवरचा शो ‘कानपूरवाले खुरानाज’ विशेष चालत नाही. सांगायचे झाले तर या शोमध्ये म्हणावी तशी मजा येत नाहीए. कपिल शर्मासोबतच्या भांडणानंतर अली असगर सुनीलसोबत बाहेर पडला होता. अली असगरदेखील कानपूरवाले खुरानाजमध्ये आहे. पण आता हे दोघे पुन्हा कपिलच्या कंपूत जाण्याची शक्यता असल्यामुळे कानपूरवाले खुरानाजचे दुकान बंद होईल, अशी देखील चर्चा आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

@whosunilgrover @ranveersingh @starplus


A post shared by कानपुर वाले खुरानाज़ (@kanpur_wale_khurana) on
(फोटो सौजन्य- Instagram)