निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि त्याची बेस्ट फ्रेंड काजोल यांनी नुकतीच कॉमेडीयन कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. या दरम्यान करण आणि काजोल या दोघांनीही खूप एन्जॉय केलं. तसंच आपल्या गप्पांनी प्रेक्षकाचं खूप मनोरंजनही केलं.
जसं करण जोहर आपल्या कॉफी विद करण या शोमध्ये बॉलीवूड सेलेब्सना बोलवून त्यांना अनेक कठीण प्रश्न विचारून पेचात पाडतो. तसंच कॉमेडीयन कपिल शर्मानेही त्याच्या शोमध्ये यावेळी करण जोहरला ट्रीकी प्रश्न विचारले. कपिलने त्याला बरेच प्रश्न विचारले ज्याची उत्तर देताना करणची चांगलीच पंचाईत झाली.
‘कितीतरी रात्री मी झोपू शकलो नाही’ – करण जोहर
करण जोहरचं बॉलीवूड मंत्रिमंडळ
या शोमध्ये आल्यावर करण जोहर कधी नव्हे तो कपिलच्या प्रश्नांच्या जाळ्यात अडकला. कपिल शर्माने करणला विचारलं की, त्याला बॉलीवूडचा प्रधानमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल. तर करणने लगेचच बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारचं नाव घेतलं. तसंच त्याने अक्षय कुमारला आरोग्य खातं आणि वरूण धवनला सोशल मीडियाचं खातं देण्याचंही म्हटलं. खरी मजा तेव्हा आली जेव्हा करीना कपूरचं नाव घेतं करणने सांगितलं की, मी तिला गॉसिप अफेयर खात्याची मंत्री बनवेन.
करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’चा ट्रेलर म्हणजे शिळ्या कढीला उत
करणने सांगितलं करीनाची गुपित
करीना कपूरबाबत सांगताना करण जोहर म्हणाला की, बेबो सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपल्या पीआर टीमला कॉल करते. नंतर त्यांना दिवसभरातल्या गॉसिपबाबत सर्व प्रश्न विचारते आणि नंतर दुसरा कॉल करते करण जोहरला. मग करणकडून करीना सर्व गॉसिप्स कन्फर्म करून घेते. पाहा म्हणजे फक्त तुम्हाला आणि मीडियालाच सेलेब्स गॉसिपमध्ये भरपूर इंटरेस्ट असतो असं नाही. तर स्वतः सेलिब्रिटीजनाही असतो.
तैमूर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एंट्री
करीनानंतर नंबर सोनम कपूरचा
करीना कपूरनंतर करण जोहरने नाव घेतलं ते सोनम कपूरचं. करणच्या मते, सोनम कपूरला फॅशनचं खातं दिलं पाहिजे. तर स्वतःकडे मात्र करणला गृह खातं ठेवायचं आहे.
दबंग 3 मध्ये पुन्हा करिनाच्या ‘आयटम सॉंग’ चा जलवा
करण जोहरच्या आगामी तख्तमध्ये करीना कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात करीनासोबतच रणवीर सिंग, विकी कौशल, अनिल कपूर, आलिया भट, जान्हवी कपूर आणि भूमी पेडणेकर हेही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.