तैमूर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एंट्री

तैमूर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एंट्री

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करिना कपूरचा यांचा छोटा नवाब तैमूर अली खान त्याच्या क्युटनेसमुळे नेहमीच चर्चेत असतो. तैमूरची इतर स्टार किड्सच्या तुलनेत फारच क्रेझ आहे. पापाराझ्झी तर त्याच्या घराभोवती सतत पहारा देत असतात आणि त्याचा एकही फोटो मिस होऊ देत नाहीत. आता तैमूरची क्रेझ इतकी वाढली आहे की, तो बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याची शक्यता आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

❤️❤️❤️❤️❤️❤️


A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on
सूत्रानुसार, करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन्स निर्मित गुड न्यूजमध्ये करिना कपूर आणि अक्षय कुमार यांच्या जोडीसोबत तैमूर अली खानही कॅमिओमध्ये दिसण्याची शक्यता आहे. पण तैमूरच्या या भूमिकेबाबत अजून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.
 

 

 


View this post on Instagram


 

 

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on
या चित्रपटात करिना गर्भवती महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. सूत्रानुसार हा सिनेमा सरोगसी या विषयावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय आणि करिना मॅरिड कपल म्हणून दिसणार आहेत, जे फॅमिली प्लॅनिंगचा प्रयत्न करत आहेत. या कपलच्या मुलाच्या भूमिकेसाठी शोध सुरू होता. तेव्हाच तैमूरला या चित्रपटात घेण्याबाबत चर्चा झाल्याचं कळतंय. तसंही तैमूरला घराखाली असणाऱ्या पापाराझ्झींच्या गराड्यामुळे कॅमेरा फेस करण्याची सवय आहेच. एवढंच नाहीतर या चित्रपटासाठी तैमूर तब्बल 1 कोटी रूपये एवढं मानधन घेणार असल्याच्या बातम्या आहेत. आता तैमूरच्या लोकप्रियतेचा फायदा त्याच्या आईच्या चित्रपटालाही नक्कीच होईल, त्यामुळे तैमूरला एवढं मानधन मिळणं तर सहज शक्य आहे.


आजी शर्मिलाने केलं साराचं कौतुक तर तैमूरबाबत व्यक्त केली चिंता

गुड न्यूजमध्ये करिना आणि अक्षय कुमारसोबत कियारा अडवाणी आणि दलजीत दोसांजही यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता करणार आहेत.

या चित्रपटानंतर करिना कपूर सप्टेंबरमध्ये तख्त या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात करणार आहे. तख्त ही एक पिरीयड ड्रामा फिल्म असणार आहे. यामध्ये करिनासोबत रणवीर सिंग, विक्की कौशल, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर, आलिया भट्ट आणि अनिल कपूरही आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण जोहर करणार आहे.


हेही वाचा -


तैमूर की सारा अली खान कोण आहे सर्वाधिक लोकप्रिय


तैमूरच्या 'नॅनी'चा किती आहे पगार, करीना कपूरने केला खुलासा