करिनाने तैमूरसाठी तयार केलाय खास 'डाएट प्लॅन'

करिनाने तैमूरसाठी तयार  केलाय खास 'डाएट प्लॅन'

करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमूर नेहमी निरनिराळ्या कारणांसाठी चर्चेत असतात.सध्या सोशल मीडियावर तैमूरच्या डायट प्लॅनची चर्चा आहे. करिना आणि सैफ यांच्या फिटनेसच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. मात्र करिनाने  आता तिच्या मुलासाठीदेखील डाएट फ्लॅन तयार केला आहे. आतापासूनच ती तैमूरच्या आरोग्याबाबत सजग आहे. यावरून करिना एक उत्तम आई असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. करिना तैमूरचं जेवण स्वतःच्या हाताने तयार करते.


kareena and taimur new


करिना तैमूरला देते खिचडी आणि डोसा


एका मुलाखतीत करिनाने तैमूरचा डाएट प्लॅन  उघड केला आहे. ती त्याला बाहेरचं काहीच खाऊ देत नाही. त्याचं जेवण ती स्वतःच्या हाताने तयार करते असं तिने सांगितलं आहे. कधी कधी ती त्याच्यासाठी खिचडी तयार करते तर कधी कधी त्याला डोसा तयार करून देते. त्याच्या डाएटमध्ये ताजी फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश देखील असतो. तैमूर घरातील जेवणाशिवाय बाहेरचं काहीच खात नाही. त्याच्या डाएट प्लॅनमध्ये ती बदल करत राहते. तैमूरच्या आवडीनूसार त्याचं  जेवण तयार केल जात असल्यामुळे तो घरचं जेवण आवडीने खातो. अगदी कधीतरी त्याला फक्त थोडेसे चिप्स खाण्याची परवानगी दिली जाते. सुरूवातीला हा डाएट प्लॅन फॉलो करणं त्याच्यासाठी अवघड होतं. कारण त्याला याची सवय नव्हती मात्र आता तो आवडीने हे खाद्यपदार्थ खातो. करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान आपल्या जन्मापासूनच सोशल मीडियाचा लाडका आहे. त्यामुळे त्याच्या या डाएट प्लॅनविषयी अनेकांना अप्रूप वाटत आहे.


 


taimur new


असे पडले बेबो आणि सैफ प्रेमात


सैफिना'च्या लग्नाला आता जवळ जवळ सात वर्षे पूर्ण झाली आहेत. आज करिना कपूर आणि सैफ अली खान फिल्म इंडस्ट्रीमधील एक हॉट कपल आहे. या दोघांच्या अफेअर, लग्नाच्या चर्चा फारच रंगल्या होत्या. कारण करिनाने तिच्या करिअरच्या टॉपवर असताना दोन मुलं असलेल्या सैफशी लग्न करण्याचा निर्णय घेतला  होता. करिना आणि सैफ अली खानमधलं वयातलं अंतरही फार होतं. सहाजिकच त्यामुळे या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र करिनाच्या मते जीवनात वाईट काळ असताना तिला अनेक चांगल्या लोकांची साथ मिळाली आहे. करिअरमध्ये कठीण काळ सुरू असताना तिच्या जीवनात सैफ अली खानची एन्ट्री झाली. टशन चित्रपटाच्या दरम्यान सैफ आणि करिना एकमेकांच्या जवळ आले. त्यावेळी सैफ अली खान तिच्यापेक्षा दहा वर्षाने मोठा होता शिवाय त्याला दोन मुलंही होती. मात्र करिना आणि सैफ एकमेकांच्या प्रेमात इतके बुडाले होते की त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. डेट करता करता एक दिवस असा आला की सैफने करिनाला सांगितलं की “मी पंचवीस वर्षांचा तरूण नाही की तुला ड्रॉप करण्यासाठी रोज रात्री तुझ्या घरी येईन.” त्यानंतर सैफने बबीताला म्हणजेच करिनाच्या आईला याबाबत सांगितलं आणि त्या दोघांनी लग्न केलं. शिवाय आता तैमूरच्या येण्याने त्या दोघांचं जीवन आनंदीच झालं आहे. याबाबत खुद्द करिना कपूरनेच तिच्या एका इन्स्टा अकाऊंटवरून खुलासा केला आहे.


Kareena and saif


जुही चावलाच्या मुलाला व्हायचंय अभिनेता... जुहीने दिली माहिती


सारा आणि कार्तिकमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय... फोटो आहेत पुरावा


दीपिकाला मिळाला ‘आई’ होण्याचा आशीर्वाद, नीतू कपूरने दिला खास ‘तावीज’


फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम