मलायकाला ‘आंटी’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

मलायकाला ‘आंटी’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना दिलं सडेतोड उत्तर

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा खूपच चर्चेत आहे. एका बाजूला अर्जुन कपूरबरोबर अफेअर असल्यामुळे तर दुसऱ्या बाजूला तिने काढलेले बोल्ड फोटोजदेखील चर्चेचा विषय ठरत आहेत. नुकतीच मलायका मालदीव्सवरून सुट्टीचा आनंद घेऊन परतली आहे. या व्हेकेशनमधील काही बोल्ड फोटो मलायकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. त्यामुळे हे फोटो आणि अर्जुन बरोबर असलेल्या नात्यामुळे मलायकाला ट्रोल केलं जात आहे. पण आता मलायकाने आपले बिकिनी फोटो पोस्ट करत त्यावर एक भारदस्त कॅप्शन देत ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे. त्यावर बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनी मलायकाच्या अॅटिट्यूडची प्रशंसा केली आहे. दिया मिर्झा, बिपाशा बासू, नीलम कोठारी, सोफी चौधरी, लिझा रे यासारख्या सेलिब्रिटींना मलायकाचा हा बोल्ड अंदाज आवडला आहे.


Malaika-arora


या फोटोमध्ये मलायकाने कलरफुल बिकिनी घातली आहे आणि त्याखाली कॅप्शन लिहिलं आहे, ‘आनंदी राहणं ही एक निवड आहे आणि मी निवडली आहे. मला वाटतं हा आनंद माझ्या चेहऱ्यावर जास्त शोभून दिसतं. त्यामुळे तुमचा सल्ला तुमच्याजवळ ठेवा आणि मला सोडा’ मलायकाने हॅशटॅग देत आपलं वय 43 सांगितलं. तर हॅशटॅगमध्ये वय सांगत तिने Happy आणि Tuesday Thoughts असंही लिहिलं आहे.


 


मलायकाने नुकतंच इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. मालदीव्सच्या फोटोमध्ये बऱ्याच ट्रोलर्सने मलायकाला ‘आंटी’ आणि ‘म्हातारी’ असंही म्हटलं होतं.


malaika arora maldives vacay pictures %282%29
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरच्या लग्नासंबंधातही रोज नव्या बातम्या येत असून रोज त्याची चर्चा आहे. पहिले हे दोघंही लपूनछपून भेटत होते. पण मागील काही दिवसात मलायका आणि अर्जुन एकदम खुलेआम रोमान्स करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी तर 19 एप्रिलला दोघं लग्न करणार आहेत अशीही बातमी आली होती. पण मलायका आणि अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी ही अफवा असल्याचं सांगितलं. त्यामुळे आता नक्की अर्जुन आणि मलायका नक्की कधी लग्न करणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


मलायकाने ख्रिश्चन लग्नावर दिलं उत्तर


बऱ्याच दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एप्रिलमध्ये ख्रिश्नन पद्धतीने लग्न करणार अशी चर्चा रंगली आहे. पण या सर्व गोष्टींवर सध्या मलायकाने पूर्णविराम लावला आहे. मलायकाने अर्जुनबरोबर आपण ख्रिश्चन पद्धतीने लग्न करणार नाही असं स्पष्ट सांगितलं आहे. सध्या दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुन कपूरबरोबर आपण अशा कोणत्याही पद्धतीने लग्न करणार नसून हे फक्त मीडियाद्वारे छापण्यात आलेल्या न्यूज असल्याचं स्पष्ट केलं आहे. मलायकाने ही गोष्ट साफ नाकारली आहे. या चर्चा केवळ अफवा असल्याचंही मलायकाने म्हटलं आहे. नात्यामध्ये असणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला आपण नात्यामध्ये असावं असं वाटतं. घटस्फोट झाल्यानंतरही तिला एकटीला राहायचं नाही. शिवाय मलायकने सांगितलं की, ‘मला लग्नानंतर इतक्या वर्षांनी घटस्फोट घेऊ नको असा सल्लाही लोकांनी दिला होता. पण मला वाटतं मी जो निर्णय घेतला तो योग्य होता. प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यात पुढे जायचं असतं. सर्व वाईट गोष्टी विसरायच्या असतात. ज्यांना आपल्या आयुष्यात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळते ते लोक नक्कीच नशीबवान असतात, असं मलायकाने मत व्यक्त केलं आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा -


अर्जुन कपूरशी ख्रिश्नन लग्नाबद्दल मलायका अरोराचा खुलासा


Wedding Bells: ‘लग्नघटिका आली समीप’, मलायका - अर्जुन चढणार बोहल्यावर


मालदीव्सच्या सुंदर किनाऱ्यावर मलायकाचा 'हॉट' योगा