ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘मणिकर्णिकाः दी क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट होणार 50 देशांमध्ये प्रदर्शित

‘मणिकर्णिकाः दी क्वीन ऑफ झांसी’ चित्रपट होणार 50 देशांमध्ये प्रदर्शित

अभिनेत्री कंगना रणौतचा ‘मणिकर्णिकाः दी क्वीन ऑफ झांसी’ 25 जानेवारीला प्रदर्शित होत आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट भारतासोबतच एकुण पन्नास देशांमध्ये प्रदर्शित होत आहे. तसंच हिंदीसोबतच हा चित्रपट तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्येदेखील प्रदर्शित होत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं ही माहिती शेअर केली आहे.

राष्ट्रपतीभवनात मणिकर्णिकाचं ‘स्पेशल स्क्रिनिंग’

प्रदर्शनाआधी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग राष्ट्रपतीभवनात आयोजित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह कंगना आणि चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण टीम या खास शो साठी उपस्थित होती. 18 जानेवारीला राष्ट्रपतीभवनात हे खास स्क्रिनिंग करण्यात आलं. राष्ट्रपतीभवनाच्या कल्चरल सेंटरमध्ये या स्क्रिनिंगचं आयोजन केलं गेलं होतं.राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाला मानवंदना देण्यायासाठी आता या चित्रपटाचं  स्पेशल स्क्रिनिगदेखील थेट राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलं होतं.

kangana in manikarnika new

ADVERTISEMENT

‘मणिकर्णिका’ चित्रपटासाठी सारं काही भव्य आणि दिव्य…

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. झाशीच्या राणीची शौर्यगाथा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे या चित्रपटाचं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी असं सारं काही भव्य आणि दिव्य स्वरुपात प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटाचे सेट्स आणि लोकेशनमधून 18 व्या शतकातील काळ उभा करण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घेण्यात आली. मणिकर्णिका पाहताना चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभं राहील अशी निर्मिती करण्यात आली आहे.

kangana in manikarnika

मणिकर्णिकाच्या माध्यमातून कंगनाचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

ADVERTISEMENT

कंगनाने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे.या चित्रपटातून कंगना पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करत आहे. कंगनाने मणिकर्णिकाच्या प्रमोशनसाठी अक्षरशः कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राजेशाही भरजरी साड्या आणि पारंपरिक आभूषणांच्या वेशभूषेमध्ये जात आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंचे निरनिराळ्या वयातील विविध लुक साकारण्यासाठी फारच मेहनत घेण्यात आली. कंगनाच्या या लुक्सबाबत सगळीकडेच चर्चा सुरू आहे.राणी लक्ष्मीबाईंच्या किशोरवयीन ते योदध्याच्या भूमिकेपर्यंत सर्व लुक्ससाठी बारकाईने काम करण्यात आलं आहे.

kangana mani

मणिकर्णिकामधील ऐतिहासिक भूमिका

मणिकर्णिकामध्ये अनेक कलाकार ऐतिहासिक भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री अंकीता लोखंडे या चित्रपटात ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारत आहे. मराठी कलाकार वैभव तत्ववादी ‘पूरणसिंग’ यांची भूमिका साकारत आहे. अतुल कुलकर्णी ‘तात्या टोपे’ यांची भूमिका तर सुरेश ओबेरॉय ‘बाजीराव’,डॅनी ‘नानासाहेबां’ची भूमिका तर जिशू सेनगुप्ता ‘गंगाधररावां’ची  भूमिका साकारत आहे.

ADVERTISEMENT

ankita 1

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा-

मणिकर्णिकामध्ये कंगना साकारतेय राणी लक्ष्मीबाईंची ‘ही’ विविध रुपं

ADVERTISEMENT

राष्ट्रपतीभवनात मणिकर्णिकाचं ‘स्पेशल स्क्रिनिंग’

मणिकर्णिका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला खास ऐतिहासिक टच

मणिकर्णिकामधील ‘झलकारी बाई’ साकारण्यासाठी अंकिता लोखंडेनं घेतलं ‘हे’ खास प्रशिक्षण

23 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT