मुकेश आणि अनिल अंबानी हे दोन्ही भाऊ बऱ्याच वर्षांपूर्वी वेगळे झाले हे सर्व जगाला माहीत आहे. पण ‘रक्ताचं नातं हेच खरं नातं’ असं म्हटलं जातं आणि हेच पुन्हा एकदा अनिल आणि मुकेश अंबानीने सिद्ध करून दाखवलं आहे. अनिल अंबानीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे 550 कोटी हे टेलिकॉम कंपनीला व्याजासह भरायचे होते. त्यावेळी त्याच्यामागे त्याचा भाऊ मुकेश उभा राहिला आणि त्याने ही रक्कम अनिलला दिली. यासंबंधी स्टेटमेंट अनिल अंबानी याने सोशल मीडियावर पोस्ट केले असून आपल्या भाऊ आणि वहिनीचे आभार मानले आहेत. पण असं असलं तरीही ट्विटरवर मात्र या गोष्टीची चेष्टा सुरु झाली आहे. या एका प्रकरणावरून ट्विटरवर सध्या मीम्सची खैरात चालू झाली हे नक्की.
जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचा भाऊ असण्याचा फायदा
सोशल मीडियावर स्टेटमेंट अनिल अंबानीने पोस्ट केल्यानंतर अनेकांनी यांचे मीम्स पोस्ट करायला सुरुवात केली. जगातल्या सर्वात श्रीमंत माणसाचा भाऊ असण्याचा हाच फायदा आहे असंही काही जणांनी म्हणायला कमी केली नाही. इतकंच नाही तर विजय माल्या आणि मुकेश अंबानीचे फोटो पोस्ट करून ‘मलाही आपला भाऊच समजा’ अशी खिल्लीदेखील ट्विटरवर उडवण्यात आली आहे. नुकतंच अनिल अंबानी आणि त्याचं पूर्ण कुटुंब आकाश आणि श्लोकाच्या लग्नामध्ये दिसलं होतं. अनिल आणि मुकेशमध्ये भांडण असलं तरीही त्यांनी आपलं कौटुंबिक सौख्य नेहमीच जपलं आहे. पण तरीही अनिलवर वाईट परिस्थिती ओढवल्यानंतर मुकेश अंबानी त्याच्या मागे मोठ्या भावाचं कर्तव्य करायला उभा राहिला ही गोष्ट नक्कीच मोठी आहे. हे सर्वांना जाणवलं असलं तरीही यामागे अनेक मीम्स सध्या बनवण्यात येत असून व्हायरल होत आहेत.
मीम्स बनवून सोशल मीडियावर खिल्ली
हल्ली सोशल मीडियाच्या काळात जरा कोणतीही गोष्ट पोस्ट केली की सर्वात पहिले सुरुवात होते ती मीम्सना. कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य न राहता त्याचे मीम्स बनवले जातात. अंबानी कुटुंबीयांची गोष्ट कळताच काही कालावधीतच मीम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली. यामध्ये अगदी ‘करण – अर्जुन’ या बॉलीवूडच्या जोडीपासून ते माल्यानेदेखील आपल्याला भाऊ मानावं या केलेल्या आग्रहाचे मीम्सही व्हायरल होत आहेत.
Vijay Mallya : mai bhi aapke bhai jaisa hun pic.twitter.com/OFL2VDLjwF
— Pakchikpak Raja Babu (@HaramiParindey) March 19, 2019
इतकंच नाही तर, ‘अपना टाईम आयेगा’ या गल्ली बॉयमधील गाण्याची ओळ घेऊन ‘अपना भाई आयेगा’ अशा स्वरूपाचे मीम्सही व्हायरल झाले आहेत.
Anil Ambani when in financial trouble. pic.twitter.com/zUtz2LLLVH
— डी.के. (@itsdhruvism) March 18, 2019
त्याशिवाय अगदी ‘मैं हू ना’ चित्रपटातील शाहरूखच्या तोंडी असलेला संवाद ‘तुम्हारा कोई भाई है’ पर्यंत असे जुने संवाद घेऊनही मीम्स बनवण्यात आले आहेत.
“Mukesh Ambani” Bails Out Anil Ambani in Ericsson Payout Case Day Before SC Deadline, helps pay Rs 458.77 crore.#AnilAmbani #MukeshAmbani #MukeshNitaSaveAnil pic.twitter.com/95wsGZoJeL
— atharva khandve (@atharva_khandve) March 18, 2019
तर नव्या ‘कलंक’ मधील संवाददेखील मुकेश अंबानीची सद्यस्थिती अशी असेल असं म्हणून मीम्स बनवण्यात आला आहे. ‘कुछ रिश्ते कर्ज की तरह होते है, उन्हे निभाना नही, चुकाना पडता है’ असं म्हणत या मीम्समधून टर उडवण्यात आली आहे.
Mukesh ambani ryt now.#MukeshNitaSaveAnil pic.twitter.com/K2I1R8oSf5
— Anant (@_Aawarahun) March 18, 2019
तर ‘वेलकम’ चित्रपटातील नाना पाटेकरचा संवादाचंदेखील एक मीम्स बनवण्यात आलं आहे. ‘अरे कब तक तेरी गलतियों का टोकरा मैं अपने सर पर घूमाता रहूंगा’ असं आता मुकेश अंबानी अनिल अंबानीला म्हणत असेल असं दाखवण्यात आलं आहे.
हेदेखील वाचा –
‘इन्शाअल्लाह’ सलमान आणि आलिया पहिल्यांदाच येणार एकत्र
‘कुमकुम’ उर्फ जूही परमारने केला मुलीसोबत ‘चोगाडा तारा’ हा डान्स
परवानगी शिवाय फोटो काढल्यामुळे जया बच्चन रागवल्या, चाहत्याला दिले हे उत्तर