लग्नाच्या शुभेच्छा, वधूवरांना द्या असे आशिर्वाद (Marriage Wishes In Marathi)

Marriage Wishes In Marathi

'विवाह' हा एक संस्कार आणि सोहळादेखील आहे. लग्नसोहळ्यामुळे वधूवरांसोबतच दोन कुटुंब एकत्र येतात. एखाद्याचं लग्न ठरलं की, त्यांच्या कुटुंबाबरोबरच जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्या आनंदाला देखील पारावार राहत नाही. जवळच्या मित्रमैत्रिणीचं अथवा भावंडाचं लग्न असेल तर कपडे, दागदागिने कोणते घालायचे, काय काय मजा करायची, कोणती भेटवस्तू द्यायची अशा गप्पा लग्नसोहळ्याच्या आधी अनेक महिन्यांपासून ठरतात. आजकाल डेस्टिनेशन वेडिंगचा जमाना असल्यामुळे तीन-चार दिवस एकत्र येऊन विवाहसोहळा साजरा केला जातो. लग्नाच्या तयारीत अनेक गोष्टींचा समावेश केला जातो. मात्र यासोबत सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे लग्नात वधूवरांना शुभेच्छा काय द्यायच्या.
लग्न ही वधूवर आणि त्यांच्या कुटुंबासाठी एक खास गोष्ट आहे. लग्नामुळे मुळे दोन जीव आयुष्यभरासाठी एकत्र येतात. त्यांच्या सहजीवनाची सुरूवात शुभेच्छा आणि आर्शिवादाने व्हावी हीच सर्वांची इच्छा असते. जसं वाढदिवसासाठी शुभेच्छा संदेश हवे असतात. तसंच अशा  वेळी वधूवरांना आर्शिवाद आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्वांना शुभेच्छा संदेश हवे असतात. भेटवस्तू अथवा भेटकार्डावर लिहण्यासाठी हे शुभेच्छा संदेश तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील. मनातील भावना शब्दात मांडण्यासाठी आम्ही तुम्हाला लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Lagnachya Shubhechha In Marathi) देत आहोत जे तुम्हाला नक्कीच आवडतील. तसंच वधूवरांसाठी अभिनंदन शुभेच्छा संदेशही महत्त्वाचे असतात. 


1. लग्नाच्या शुभेच्छा (Marriage Wishes In Marathi)
2. वधू वरांसाठी शुभेच्छा संदेश (Wedding Wishes In Marathi)
3. लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Lagnachya Shubhechha In Marathi Sms)
4. हॅपी मॅरीड लाईफ संदेश (Happy Married Life Wishes In Marathi)
5. नविन लग्नाच्या शुभेच्छा (New Marriage Wishes In Marathi)
6. लग्नाच्या शुभेच्छा कविता (Marathi Lagnachya shubhechha Kavita)
7. लग्नसोहळ्यासाठी चारोळ्या (Marathi Charoli On Wedding)


लग्नाच्या शुभेच्छा (Marriage Wishes In Marathi)


लग्नसोहळा म्हणजे आनंदाची पर्वणीच…वधू वरांसाठी त्यांच्या कुटुंबासाठी आणि मित्रमंडळींसाठीही… अशा आनंदाच्या क्षणी नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी या लग्न शुभेच्छा तुमच्या नक्कीच उपयोगी पडतील.


marriage wishes in marathi
1. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा... दोघांनाही सहजीवनाच्या हार्दिक शुभेच्छा
2. नाती जन्मोजन्मींची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेमभरल्या रेशीमगाठीत बांधलेली... लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
3. अशीच क्षणाक्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो... लग्नाच्या शुभेच्छा
4. लग्न म्हणजे नवी सुरूवात, नवीन नात्याची सुंदर गुंफण .. नांदा सौख्यभरे
5. एक स्वप्न आज पूर्ण झाले, नाते प्रेमाचे विवाहबद्ध झाले... लग्नाच्या मनापासून शुभेच्छा.


वधू वरांना देण्यासाठी शुभेच्छा संदेश (Wedding Wishes In Marathi)


लग्नात वधूवरांना शुभेच्छा आणि आर्शीवाद दिले जातात. वधूवर जेव्हा मोठ्यांना नमस्कार करतात तेव्हा, त्यांना भेटवस्तू देताना अथवा त्यांना अभिनंदन करताना या शुभेच्छा तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता.


MQ1


1. लग्न म्हणजे दोन जीवांची रेशीमगाठ... लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा
2. लग्न म्हणजे एक पवित्र बंधन, दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण... लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
3. लग्न, आयुष्याचा अनमोल आणि अतुट क्षण… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
4. आयुष्याच्या या पायरीवर, तुमच्या नव्या जगातील, नव्या स्वप्नांना, बहर येऊ दे...लग्नाच्या शुभेच्छा
5.  हे बंध रेशमाचे, एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले...नांदा सौख्यभरे
6. नाती जन्मोजन्मीची, परमेश्वराने ठरवलेली, दोन जीवांना प्रेम भरलेल्या रेशीमगाठीत बांधलेली, लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
7. लग्न म्हणजे दोन मनांचं जुळणं आहे, तहानलेल्या समुद्राकडे नदीने येऊन मिळणं आहे… लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
8. लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध... लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
9. विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन, सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण लग्नसोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा
10. आयुष्याच्या वेलीवरचं हळुवार पान, दोन जीवांना जोडणारा प्रेमळ धागा…. लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा


डेस्टिनेशन वेडिंगसाठी महाराष्ट्रातील ही '10' ठिकाणं आहेत परफेक्ट


लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश  (Lagnachya Shubhechha In Marathi Sms)


lagnachya shubhechha in marathi


विवाहसोहळ्याला गेल्यावर नववधू आणि वराला काय शुभेच्छा द्यावा असं तुमच्या मनात नक्कीच येईल. त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू, भेटकार्डावर हे शुभेच्छा लिहा आणि नवदापत्यांला द्या मनापासून लग्ननाच्या शुभेच्छा.
1. तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे, यश तुम्हाला भरभरून मिळू दे लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा
2. तुम्हा दोघांची सर्व स्वप्न व्हावी साकार हीच आमची इच्छा, तुम्हा दोघांना लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा
3. तुम्हा दोघांचं नातं जन्मोजन्म रहावं, परमेश्वराचे तुम्हाला सदैव आर्शिवाद मिळावे लग्नासाठी मनापासून शुभेच्छा
4. हळदीचा वास आणि मेंदीचा रंग, खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
5. आज तुमच्या सहजीवनाचा प्रवास सुरू होत आहे तुमच्या सुखी संसारासाठी मनपूर्वक शुभेच्छा.


हॅपी मॅरीड लाईफ संदेश (Happy Married Life Wishes in Marathi)


happy-married-life-wishes-in-marathi


लग्नाचा दिवस हा प्रत्येक नववधू आणि वरासाठी खास असतो.अशा क्षणी तुम्ही तुमच्या प्रेमळ शुभेच्छा त्यांचा आनंद आणखी द्विगुणित करू शकतात. यासाठीच त्यांना त्या हे हॅपी मॅरिड लाईफ संदेश.
1.तुम्हा दोघांना नव विवाहाच्या अनेक शुभेच्छा, तुमच्या भावी आयुष्यासाठी अनेक शुभआर्शिवाद
2.आयुष्यभराची साथ मिळावी आणि तुमच्या दोघांची सारी स्वप्न पूर्ण व्हावी... नांदा सौख्यभरे
3.एकमेकांचा धरत हातात हात तुम्हांस लाभो आयुष्यभर एकमेकांची साथ... लग्नाच्या मनपूर्वक शुभेच्छा
4.भविष्याची स्वप्न रंगवत, भूतकाळाचे स्मरण ठेवत करा आयुष्याची नवी सुरूवात... तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा.
5.तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे, तुमच्ा संसाराच्या वेलीवर सुखसमाधान नांदू दे... वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा.


नविन लग्नाच्या शुभेच्छा (New Marriage Wishes In Marathi) 


new-marriage-wishes-in-marathi


लग्नानंतर खऱ्या अर्थाने सहजीवनाला सुरूवात होते अशा काळात नातेवाईक, मित्रमंडळी आणि घरातील मोठ्यांचे शुभेच्छा आणि संदेश नवीन लग्न झालेल्या जोडप्याला आणखी आनंदीत करतात.
1.विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो, तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो, तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो, लग्नाच्या शुभेच्छा
2.माझ्या इवल्याशा ह्रदयात तुम्हाला दोघांसाठी खूप खूप जागा आहे, तुमचा संसार सुखाचा व्हावा हीच माझी इच्छा आहे... लग्नाच्या शुभेच्छा
3.जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे, घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे... लग्नाच्या शुभेच्छा
4.माझ्या छोट्याशा जगातील या सर्वात आनंदी जोडप्याला विवाहानिमित्त खूप मनापासून शुभेच्छा... नेहमी असेच सुखात राहा
5.आनंदाचे सारे क्षण तुमच्या वाट्याला यावे, जे जे हवे ते तुम्हाला मिळावे... हिच आमची इच्छा... लग्नानिमित्त शुभेच्छा.


लग्नाच्या शुभेच्छा कविता (Marathi Lagnachya Shubhechha Kavita)  


लग्नसोहळ्याला भेटवस्तू अथवा भेटकार्डाला अधिक आकर्षित करण्यासाठी तुम्ही लग्नावर आधारित या कविता  लिहून नवदापंत्याला लग्नाच्या शुभेच्छा कवितांच्या माध्यामातून देऊ शकता. 
1.सुखी संसाराचे गुपित
प्रेमाचे  नाते आहे तुम्हा उभयतांचे
समजंसपण हे गुपित आहे सुखी संसाराचे
संसाराची वाट कठीण आहे थोडी 
पण एकमेकांना साथ देत वाटेल त्याची गोडी
एकमेकांवरील प्रेमाचा असाच ठेवा ओलावा
ज्यामुळे सहवास तुमचा वाटेल तुम्हाला हवाहवा
तुमच्या संसाराची गोडी कामय अशीच राहो,
लग्नानिमित्त हार्दिक शुभेच्छा 


2. लग्न लग्न म्हणजे काय असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं...
त्याच्या मनातील विचाराचं 
तिच्या  चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्नाआधी त्याचं 
उत्तर तयार असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं...
त्याला लागताच ठसका
तिच्या डोळ्या पाणी तराळतं
तिला ठेच लागताच
त्याचं मन कळवळतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं...
तिने चहा केला तरी 
त्याला थंड सरबत हवं असतं. 
त्याने गजरा आणला की नेमकं
तिला फुल हवं असतं
लग्न लग्न म्हणजे नेमकं काय असतं...
त्याच्या बेफिकिरीला
तिच्या जाणिवेचं कोंदण असतं
त्याच्या चुकांवर
तिने घालतेलं पांघरूण असतं
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा


3. लग्न लग्न म्हणजे काय असतं...
दोन जीवांचा  मेळ असतो
राजा राणीचा मांडलेला
भातुकलीचा खेळ असतो
म्हणतात मुलीचं घर सोडणं
तिच्यासाठी खूप अवघड असतं
पण आपल्या जगात दुसऱ्याला आणणं
हे मुलासाठी पण सोपं नसतं
हल्ली लग्न पद्धती बदलल्या असतील
पण लग्नाचा अर्थ नाही
मग ठरवून झालं किव्हा प्रेमविवाह
त्याने काही फरक पडत नाही
मंगल अष्टकांचा गुंज झाला
जळून आले नाते प्रेमाचे
दोघांच्या सुखी संसारासाठी
टाका आशिर्वाद अक्षताचे
सप्तपदीची सात पाऊले
वचने देखील सात
प्रत्येक वचनासोबत
द्या दोघांनी एकमेकांची साथ
लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा 
कवी - राकेश शिंदे


4. लग्न म्हणजे...
एक अशी रेशीम गाठ
जशी सोनेरी किरणांची पहाट
कडू आणि गोड क्षणांची  लाट
जन्मभर समजूतदारपणाची साथ
लग्न म्हणजे...
एकमेकांना एकमेकांचा वेळ
आपुलकी आणि स्नेहाने भरलेला 
दोन कुटुंबाचा मेळ
कवी - राकेश शिंदे


5. लग्न ते सुंदर जंगल आहे जिथे
बहादुर वाघाची शिकार... हरणी करतात!!!
लग्न म्हणजे अहो ऐकलंत का? पासून...
बहिरे झाला की काय....???? पर्यंतचा  प्रवास!!!
लग्न म्हणजे तुझ्या सारखे या  जगात कुणीच नाही पासून... तुझ्यासारखे छप्पन बघितले आहेत... पर्यंतचा प्रवास!!!
लग्न म्हणजे तू राहू दे पासून....
मेहरबानी करून, तू तर राहूच दे.... पर्यंतचा प्रवास!!!
वैवाहिक जीवन म्हणजे काश्मिरसारखं आहे
कारण ते सुंदर आहेच पण त्यात आतंक पण तितकाच आहे!!!


लग्नसोहळ्यासाठी चारोळ्या (Marathi Charoli On Wedding)


लग्नसोहळ्यासाठी शुभेच्छा आणि आर्शीवाद देण्यासाठी तुम्हाला शब्द सूचत नसतील तर या लग्नसोहळ्याच्या चारोळ्यांनी द्या वधूवरांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. 


MQ2


1. लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
2. गोड गोजिरी लाड लाजिरी
लाडकी आई बाबांची
नवरी होणार आज तू
सून एका नव्या घराची
3. स्वप्न दोघांच्या लग्नाचे
मंगलाष्टकांनी पूर्ण होते
शुभ आर्शीवादाच्या साथीने
नव्या संसाराची सुरूवात होते
4. गोऱ्या गोऱ्या गालाचा रंग
आज असा पिवळा झाला
लेकीला हळद लागताना पाहून
तुझा बाप हळवा झाला
5. लग्नसोहळा हा आनंदाचा
दोन मने जुळण्याचा
मंगलाष्टक सुरू होताच
जीव कातरला आई-बापाचा
आम्ही सूचवलेले लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश (Lagnachya Shubhechha In Marathi)आणि लग्नासाठी मराठीतील चारोळ्या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा.


नववधूकरिता खास उखाणे, मराठी उखाणे नवरीसाठी


You might like these:


सुखी वैवाहिक जीवन टिप्स


भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या सप्तपदीचं महत्त्व, जाणून घ्या - Importance of Wedding Vows in Marathi


सेवानिवृत्ती शुभेच्छा संदेश आणि सेवा निवृत्ती कविता खास तुमच्यासाठी


शादी के बधाई संदेश


स्वयं की शादी की सालगिरह (हैप्पी मैरिज एनिवर्सरी)